लोकसंख्या स्वाध्याय इयत्ता आठवी भूगोल | Loksankhya Swadhyay 8vi Bhugol

8th bhugol swadhyay Loksankhya prashn uttar 8th class bhugol chapter 7 swadhyay marathi इयत्ता आठवी भूगोल स्वाध्याय धडा 7 इयत्ता आठवी भूगोल गाईड pdf
Admin

Loksankhya 8th class geography chapter 7 question answer in marathi | इयत्ता आठवी लोकसंख्या स्वाध्याय प्रश्न उत्तरे

Loksankhya prashn uttar | 8th class bhugol chapter 7 swadhyay marathi | इयत्ता आठवी भूगोल स्वाध्याय धडा 7 | इयत्ता आठवी भूगोल गाईड pdf

प्रश्न १. खालील विधाने पूर्ण करा.


(अ) जन्मदर हा मृत्युदरापेक्षा अधिक असल्यास लोकसंख्या......

(i) कमी होते.

(ii) वाढते.

(iii) स्थिर होते.

(iv) अतिरिक्त होते.

उत्तर: (अ) जन्मदर हा मृत्युदरापेक्षा अधिक असल्यास लोकसंख्या वाढते.

 

(आ) .........वयोगटांतील लोकांचा समावेश कार्यकारी लोकसंख्येत होतो.

(i) ० ते १४

(ii) १४ ते ६०

(iii) १५ ते ६०

(iv) १५ ते ५९

उत्तर:  १५ ते ५९ वयोगटांतील लोकांचा समावेश कार्यकारी लोकसंख्येत होतो.

 

लोकसंख्या स्वाध्याय ८वी लोकसंख्या स्वाध्याय प्रश्न उत्तरे भूगोल प्रश्न उत्तर मराठी 8th pdf

(इ) समाजात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार........... घटकावर अधिक अवलंबून असतो.

(i) लिंग गुणोत्तर

(ii) जन्मदर

(iii) साक्षरता(iv) स्थलांतर

उत्तर: समाजात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार साक्षरता घटकावर अधिक अवलंबून असतो.

 

लोकसंख्या स्वाध्याय ८वी | लोकसंख्या स्वाध्याय प्रश्न उत्तरे | भूगोल प्रश्न उत्तर मराठी 8th pdf

प्रश्न २. खालील विधाने तपासा व अयोग्य विधाने दुरुस्त करा.

 

(अ) प्रदेशाच्या क्षेत्रफळावरून लोकसंख्येची घनता  समजते.

उत्तर: अयोग्य

प्रदेशाचे क्षेत्रफळ व तेथील एकूण लोकसंख्या या बाबींच्या आधारावरून लोकसंख्येचे घनता समजते.

 

(आ) साक्षरतेमुळे प्रदेशातील लोकसंख्येची गुणवत्ता ठरते.

उत्तर: योग्य

 

(इ) ज्या प्रदेशातून लोकसंख्येचे स्थलांतर होते, त्या प्रदेशातील मनुष्यबळावर विपरीत परिणाम होतो.

उत्तर: योग्य

 

(ई) अधिक आर्थिक सुबत्ता म्हणजे प्रदेशाचा विकास  होय.

उत्तर: अयोग्य

अधिक आर्थिक सुबत्ता व त्याचप्रमाणे लोकसंख्येचे उच्च जीवनमान, जीवनाची अधिक गुणवत्ता, समान संधींची उपलब्धता आणि स्वातंत्र्य म्हणजे विकास होय.

 

(उ) विकसनशील देशांचा मानव विकास निर्देशांक एक असतो.

उत्तर: अयोग्य

विकसनशील देशांचा मानव विकास निर्देशांक ०.५०० ते ०.६०० च्या दरम्यान असतो.


  हे सुद्धा पहा :



प्रश्न ३. थोडक्यात उत्तरे लिहा.


(अ) लोकसंख्या रचनेच्या अभ्यासात कोणत्या बाबी विचारात घेतल्या जातात?

उत्तर: लोकसंख्या रचनेच्या अभ्यासात पुढील बाबी विचारात घेतल्या जातात :

1) लिंग गुणोत्तर: लोकसंख्येचे स्त्री व पुरुष याप्रमाणे लिंगानुसार लोकसंख्या रचनेच्या अभ्यासात वर्गीकरण केले जाते.

2) वयोगट रचना: १५ वर्षांखालील, १५ ते ५९ आणि ६० वर्षांवरील अशा वयोगटानुसार लोकसंख्येचे वर्गीकरण केले जाते.

3) कार्यानुसार रचना : प्रदेशातील लोकसंख्येचे कार्यकारी व अकार्यकारी अशा गटांत वर्गीकरण केले जाते.

4) निवासस्थानानुसार रचना: प्रदेशातील लोकसंख्येची विभागणी ग्रामीण अथवा नागरी अशा निवासी गटांत केली जाते.

5) साक्षरतेनुसार रचना : लोकसंख्या रचनेच्या अभ्यासामध्ये लोकसंख्येचे साक्षर व निरक्षर असे साक्षरतेनुसार वर्गीकरण केले जाते.

 

(आ) लोकसंख्या वितरणावर परिणाम करणाऱ्या अनुकूल  व प्रतिकूल घटकांची यादी तयार करा.

उत्तर:

१] लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे अनुकूल घटक :

(१) स्थान (२) प्राकृतिक रचना (३) हवामान (४) मृदा (५) खनिज संपत्ती (६) शेती (७) कारखानदारी (८) नागरीकरण (९) वाहतूक (१०) बाजारपेठा (११) अंतरराष्ट्रीय शांतता (१२) अनुकूल सामाजिक रूढी व परंपरा.

२] लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे प्रतिकूल घटक :

(१) स्वच्छ हवा, पाणी व सूर्यप्रकाश या घटकांचा तुटवडा (२) पर्वतीय व दुर्गम प्रदेश. (३) नापिक मृदा (४) खनिज संपत्तीचा तुटवडा (५) वाहतुकीच्या सोयींचा अभाव (६) राजकीय अस्थिरता (७) प्रतिकूल राजकीय धोरण. (८) कारखान्यांचा अपुरा विकास (९) आंतरराष्ट्रीय अशांतत किंवा युद्ध. (१०) अनुकूल सामाजिक रूढी व परंपरा.

 


(इ) लोकसंख्येची घनता अधिक असलेल्या प्रदेशांत  कोणत्या समस्या असतील?

उत्तर: लोकसंख्येची घनता अधिक असलेल्या प्रदेशांत पुढील समस्या असतात.

1) दारिद्र्य समस्या वाढते.

2) बेरोजगारीचे प्रमाण वाढते.

3) गुन्हेगारीची समस्या वाढते.

4) जल, वायू, हवा व मृदा यांचे प्रदूषण वाढते.

5) कमी आर्थिक विकास इत्यादी समस्यांना तोंड द्यावे लागते.

6) निवासाच्या समस्या निर्माण होतात.

 

 

(ई) लिंग गुणोत्तर कमी असलेल्या प्रदेशांत कोणत्या समस्या जाणवतात?

उत्तर: लिंग गुणोत्तर कमी असलेल्या प्रदेशांमध्ये पुढील समस्य जाणवतात.

1) लिंग गुणोत्तर कमी असलेल्या प्रदेशांत स्त्रियांचा जन्मदर कमी असतो.

2) स्त्रियांवरील अत्याचारांत वाढ होते.

 


प्रश्न ४. भौगोलिक कारणे द्या.

 

(अ) लोकसंख्या हे एक महत्त्वाचे संसाधन आहे.

उत्तर:

1) एखाद्या प्रदेशाच्या विकासासाठी लोकसंख्या हा एक महत्त्वाचा घटक आहे.

2) लोकसंख्येची एकूण संख्या व एकूण गुणवत्ता या घटकांवर कोणत्याही देशाचा सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक विकास अवलंबून असतो.

3) ज्या देशांची लोकसंख्या ही प्रमाणापेक्षा अधिक असेल आणि लोकसंख्येचे गुणवत्ता कमी असेल , तर त्या देशाचा विकास हा संथ गतीने होतो.

4) ज्या देशांची लोकसंख्या ही पर्याप्त असेल आणि लोकसंख्येचे गुणवत्ता उच्च असेल , तर त्या देशाचा विकास हा जलद गतीने होतो.

अशा प्रकारे, लोकसंख्या हे एक महत्वाचे संसाधन आहे.

 


(आ) कार्यकारी लोकसंख्या गट महत्त्वाचा असतो.

उत्तर:

1) कार्यकारी लोकसंख्या वयोगटात १५ ते ५९ या वयोगटातील लोकसंख्येचा समावेश होतो.

2) १५ पेक्षा कमी आणि ६० पेक्षा जास्त या अकार्यक्षम वयोगटातील व्यक्ती या कार्यकारी लोकसंख्येवर अवलंबून असतात.

3) देशातील कार्यकारी व्यक्ती व्यवसाय किंवा नोकरी करतात आणि त्याद्वारे देशाच्या आर्थिक विकासात महत्वाची भूमिका बजावतात.

4) कार्यकारी लोकसंख्या अधिक असेल तर देशाचा विकास जलद गतीने होण्यास मदत होते. म्हणून कार्यकारी लोकसंख्या गट हा महत्वाचा असतो.

 


(इ) वयोगटरचनेचा अभ्यास आवश्यक आहे.

उत्तर:

1) वयोगट रचनेच्या अभ्यासातून देशातील बालक, युवक , तरुण, प्रौढ तसेच वृद्धांचे प्रमाण समजते.

2) वयोगट रचनेच्या अभ्यासातून, देशातील अकार्यक्षम आणि कार्यक्षम लोकसंख्येचे प्रमाण समजते.

म्हणून वयोगट रचनेचा अभ्यास आवश्यक आहे.



(ई) साक्षरतेचा विकासाशी थेट संबंध असतो.

उत्तर:

१) साक्षरतेचे प्रमाण अधिक असलेला देश आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अधिक प्रगत होतो.

२) साक्षरतेचे प्रमाण कमी असलेला देश आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या कमी प्रगत असतो.

३) जीवनमान, जीवनाची गुणवत्ता, उपलब्ध संधी आणि स्वातंत्र्य या घटकांशी साक्षरतेच प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे संबंध असतो.

अशा प्रकरे , साक्षरतेच विकासासाठी थेट संबंध असतो.

 

(उ) मानवी विकास निर्देशांकामुळे देशातील नागरिकांची खरी प्रगती कळते.

उत्तर:

१) आरोग्य, शिक्षण आणि आर्थिक हे तीन निकष मानवी विकास निर्देशांक ठरवताना विचारात घेतले जातात.

२) देशातील राष्तीर्य उत्पन्नाच्या, आयुर्मानाच्या आणि साक्षरतेच्या आधारे देशाच्या मानव विकास निर्देशांकाचे मूल्य ठरवले जाते.

३) मानव विकास निर्देशांक देशातील नागरिकांचे जीवनमान, नागरिकांना मिळणाऱ्या संधी, सामाजिक कल्याण, जीवनमनाची गुणवत्ता, नागरीकांचे स्वातंत्र्य, लोकांचे समाधान इ . घटक निर्देशित करतो. म्हणून मानव विकास निर्देशांकामुले देशातील नागरिकांची खरी प्रगती कळते.

 

8th class bhugol chapter 7 question answer in marathi | Loksankhya swadhyay | 8th bhugol swadhyay

प्रश्न ५. टिपा लिहा.

 

(अ) लिंग गुणोत्तर

उत्तर:

१) एखाद्या प्रदेशातील दर हजारी पुरुषांच्या तुलनेत असलेली स्त्रियांची संख्या म्हणजे लिंग गुणोत्तर होय.

२) लिंग गुणोत्तर पुढील सूत्राद्वारे काढले जाते:

लिंग गुणोत्तर प्रमाण = स्त्रियांची एकूण संख्या / पुरुषांची एकूण संख्या X १००००

३) दरहजारी पुरुषांमागे स्त्रियांची संख्या कमी असल्यास त्यास लिंग गुणोत्तर कमी आहे असे मानतात, तर दरहजारी पुरुषांमागे स्त्रियांचे प्रमाण जास्त असल्यास हे लिंग गुणोत्तर जास्त आहे असे माबह नतात.

४) लिंग गुणोत्तरावर पुरुषांचे बहिःस्थलांतर, स्त्रियांचा जन्मदर इत्यादी घटक परिणाम करतात.

 

(आ) वयोगट रचना

उत्तर:

१) एखाद्या प्रदेशातील लोकसंख्येतील उपघटक जेव्हा वयोगटांनुसार विचारात घेतले जातात तेव्हा त्यास लोकसंख्येची वयोगट रचना असे समजले जाते.

२) वयोगट रचनेच्या अभ्यासातून देशातील बालक, युवक , तरुण, प्रौढ तसेच वृद्धांचे प्रमाण समजते.

३) वयोगट रचनेच्या अभ्यासातून, देशातील अकार्यक्षम आणि कार्यक्षम लोकसंख्येचे प्रमाण समजते.

४) शासनाची विविध धोरणे ठरवत असताना वयोगट रचना उपयुक्त ठरते.

 

(इ) साक्षरता

उत्तर:

१) समाजामध्ये काही लोक साक्षर असतात तर काही निरक्षर असतात. आपल्या देशांत व्यक्तीस लिहिता-वाचता येत असेल तर तिला साक्षर समजले जाते.

२) साक्षरतेचे शेकडा प्रमाण हे त्या प्रदेशातील लोकसंख्येच्या गुणवत्तेवर प्रकाश टाकते.

३) वय वर्षे ०७ पेक्षा अधिक वयोगटांतील लोकांचे वर्गीकरण साक्षर किंवा निरक्षर अशा गटात केले जाते.

४) साक्षरता हा घटक सामाजिक व आर्थिक प्रगतीचा निर्देशक समजला जातो.

५) साक्षरतेचे प्रमाण अधिक असल्यास देश सामाजिक व आर्थिकदृष्ट्या प्रगत होतो.

६) साक्षरतेमुळे सुसंस्कृत व प्रगतशील समाज निर्माण होतो

 


                        समाप्त

  हे सुद्धा पहा :

Post a Comment

प्रिय मित्रांनो आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडल्यास, उपयोगी पडल्यास आम्हाला नक्की comment करून सांगा. धन्यवाद.