पृथ्वीचे अंतरंग स्वाध्याय इयत्ता आठवी भूगोल | Pruthviche Antarang Swadhyay 8vi bhugol

8th class bhugol chapter 2 swadhyay marathi इयत्ता आठवी भूगोल स्वाध्याय धडा २ इयत्ता आठवी भूगोल गाईड pdf पृथ्वीचे अंतरंग स्वाध्याय ८वी इयत्ता आठवी
Admin

8th class geography chapter 2 question answer in marathi | इयत्ता आठवी पृथ्वीचे अंतरंग स्वाध्याय प्रश्न उत्तरे

इयत्ता आठवी भूगोल स्वाध्याय धडा २ | इयत्ता आठवी भूगोल गाईड pdf | पृथ्वीचे अंतरंग स्वाध्याय ८वी


प्रश्न १. अचूक पर्यायासमोरील चौकटीत  अशी खूण करा.


(अ) भूकवचाचे हे दोन थर आहेत.

(i) बाह्य व अंतर्कवच

(ii) खंडीय व महासागरीय कवच

(iii) भूपृष्ठ व महासागरीय कवच

(iv) प्रावरण व गाभा

उत्तर: (ii) खंडीय व महासागरीय कवच

 

इयत्ता आठवी भूगोल स्वाध्याय धडा २ इयत्ता आठवी भूगोल गाईड pdf पृथ्वीचे अंतरंग स्वाध्याय ८वी पृथ्वीचे अंतरंग स्वाध्याय प्रश्न उत्तरे भूगोल प्रश्न उत्तर मराठी 8th pdf इयत्ता आठवी भूगोल पृथ्वीचे अंतरंग स्वाध्याय

(आ) प्रावरण व भूकवचात पुढीलपैकी कोणता घटक सामाईक असतो.

(i) सिलिका

(ii) मॅग्नेशिअम

(iii) अॅल्युमिनिअम

(iv) लोह

उत्तर: (ii) मॅग्नेशिअम

 

(इ) पृथ्वीच्या अंतर्गाभ्यात खालीलपैकी कोणकोणती खनिजद्रव्ये आढळतात?

(i) लोह-मॅग्नेशिअम

(ii) मॅग्नेशिअम-निकेल

(iii) ॲल्युमिनिअम-लोह

(iv) लोह-निकेल

उत्तर: लोह-निकेल

  हे सुद्धा पहा :


(ई) अंतर्गाभा खालीलपैकी कोणत्या अवस्थेत आहे?

(i) वायुरूप

(ii) घनरूप

(iii) द्रवरूप

(iv) अर्ध घनरूप

उत्तर: (ii) घनरूप

 

(उ) बाह्यगाभा खालीलपैकी कशाचा बनला आहे?

(i) लोह

(ii) सोने

(iii) हायड्रोजन

(iv) ऑक्सिजन

उत्तर: (i) लोह

 

(ऊ) आपण पृथ्वीच्या ज्या थरावर राहतो त्याला काय म्हणतात?

(i) प्रावरण

(ii) गाभा

(iii) भूकवच

(iv) खंडीय कवच

उत्तर: खंडीय कवच

 

(ए) कोणत्या भूकंप लहरी द्रवरूप माध्यमातून प्रवास करू शकतात?

(i) प्राथमिक लहरी

(ii) द्‌वितीय लहरी

(iii) पृष्ठीय लहरी

(iv) सागरी लहरी

उत्तर: (i) प्राथमिक लहरी

 

पृथ्वीचे अंतरंग स्वाध्याय ८वी | पृथ्वीचे अंतरंग स्वाध्याय प्रश्न उत्तरे | भूगोल प्रश्न उत्तर मराठी 8th pdf | इयत्ता आठवी भूगोल पृथ्वीचे अंतरंग स्वाध्याय

प्रश्न २. चूक की बरोबर ते लिहा. चुकीची विधाने दुरुस्त करा.


(अ) पृथ्वीच्या अंतरंगात विविध भागांतील पदार्थांची घनता सारखी नाही.

उत्तर: बरोबर

 

(आ) पृथ्वीच्या अंतरंगाचा गाभा कठीण खडकापासून  बनलेला आहे.

उत्तर: चूक

पृथ्वीच्या अंतरंगाचा गाभा प्रामुख्याने लोह आणि निकेल या मूलद्रव्यांपासून बनलेला आहे.


(इ) बाह्य गाभ्यातून दुय्यम लहरी जाऊ शकत नाही.

उत्तर: बरोबर

 

(ई) खंडीय कवच हे सिलिका व मॅग्नेशिअम यांचे बनले आहे.

उत्तर: चूक

खंडीय कवच हे सिलिका व अॅल्युमिनिअम यांचे बनले आहे.

 

प्रश्न ३. उत्तरे लिहा.


(अ) भूकवचाचे दोन भाग कोणते? त्यांच्या वर्गीकरणाचा आधार काय?

उत्तर:

१)    खंडीय आणि महासागरीय कवच हे भूकवचाचे दोन भाग आहेत.

२)   पाणी आणि जमीन हा त्यांच्या वर्गीकरणाचा आधार आहे.

३)   भूकवचावरील विस्तीर्ण जमिनीच्या भागाला खंडीय कवच असे म्हणतात.

४) भूकवचावर ज्या ठिकाणी विस्तीर्ण महासागर आहे, त्या भागाला महासागरीय कवच म्हणून ओळखले जाते.


(आ) प्रावरणाला दुर्बलावरण असे का म्हणतात?

उत्तर:

१)    उच्च प्रावरण हे जास्त प्रवाही असते.

२)   याच भागात शिलारस कोठी आढळतात. ज्यामधून ज्वालामुखीच्या उद्रेकादरम्यान हा शिलारस पृथ्वीपृष्ठावर येतो.

३)   प्रावरणातील अंतर्गत शक्तीमुळे होणाऱ्या हालचालींतून भूपृष्ठावर पर्वत निर्मिती, द्रोणी निर्मिती, ज्वालामुखी, भूकंप यांसारख्या प्रक्रिया घडतात. अनके प्रकारच्या हालचाली आणि भौगोलिक क्रिया सातत्याने घडून येत असल्यामुळे प्रावारणाला दुर्बलावरण  असे म्हणतात.

 

(इ) पृथ्वीचे चुंबकावरण हा परिवलनाचा परिणाम आहे.  स्पष्ट करा.

उत्तर:

१)    पृथ्वीच्या अंतरंगातील द्रवरूप बाह्य गाभ्याचे तापमान सुमारे ५०००अंश  से. आहे. तर अंतर्गाभ्यातील तापमान सुमारे ६०००० अंश से आहे.

२)   बाह्यगाभा व अंतर्गाभा यांच्या तापमानातील फरकामुळे ऊर्ध्वमुखी प्रवाह तयार होतात.

३)   पृथ्वीच्या परिवलनामुळे या प्रवाहांना भोवऱ्यांप्रमाणे गती प्राप्त होते.

४) चक्राकार गतीमुळे भोवऱ्यांमध्ये चुंबकीय क्षेत्र निर्माण होते. पृथ्वीवर निर्माण झालेल्या या चुंबकीय क्षेत्राला चुंबकावरण असे म्हणतात.

अशा प्रकारे चुबकावरण हा परीवलनाच परिणाम आहे.

 

8th class bhugol chapter 2 question answer in marathi | Pruthviche Antarang swadhyay | 8th bhugol swadhyay \ Pruthviche Antarang prashn uttar


प्रश्न ४. सुबक आकृत्या काढून नावे द्या.


(अ) पृथ्वीचे अंतरंग

उत्तर:

th class bhugol chapter 2 question answer in marathi Pruthviche Antarang swadhyay 8th bhugol swadhyay Pruthviche Antarang prashn uttar 8th class bhugol chapter 2 swadhyay marathi इयत्ता आठवी भूगोल स्वाध्याय धडा २ इयत्ता आठवी भूगोल गाईड pdf


(आ) चुंबकीय ध्रुव व विषुववृत्त

उत्तर:

पृथ्वीचे अंतरंग स्वाध्याय ८वी पृथ्वीचे अंतरंग स्वाध्याय प्रश्न उत्तरे भूगोल प्रश्न उत्तर मराठी 8th pdf इयत्ता आठवी भूगोल पृथ्वीचे अंतरंग स्वाध्याय

 

प्रश्न ५. भौगोलिक कारणे लिहा.

 

(अ) पृथ्वीच्या अंतरंगात फरक आढळतो.

उत्तर:

१) पृथ्वीच्या अंतरंगातील भूकवच, प्रावरण आणि गाभा या प्रमुख तीन थरांमध्ये आढळणाऱ्या मूलद्रव्ये, खनिजे, दाब आणि तापमान यांमध्ये भिन्नता आढळते.

२) पृथ्वीच्या अंतरंगामध्ये १)खंडीय कवच व महासागरीय कवच २) भूकवच व प्रावरण३) उच्च प्रावरण व निन्म प्रावरण ४) प्रावरण व गाभा ५) बाह्यगाभा व अंतर्गाभा यांना एकमेकांपासून विलग करणारे

 

(आ) मुलद्रव्यांची घनता आणि अंतरंगातील त्यांचे स्थान यांचा सहसंबंध आहे.

उत्तर:

१)   तुलेनेने कमी घनता असलेली सिलिका, मॅग्नेशिअमआणि ॲल्युमिनिअम ही मूलद्रव्ये पृथ्वीच्या प्रावारणात व भूकवचात आढळतात.

२) लोह व निकेल यांसारखी जास्त घनता असेलेली मूलद्रव्ये ही पृथ्वीच्या गाभ्यात आढळतात. म्हणजेच पृथ्वीच्या अंतरंगात जस जसे खोल जाऊ तस तसे तेथे आढळणाऱ्या मुलद्रव्यांची घनता ही वाढत जाते.

३)   अशा प्रकारे मुलद्रव्यांची घनता आणि त्यांचे अंतरंगातील स्थान यांमध्ये सहसंबंध आहे.

 

(इ) प्रावरण हे भूकंप व ज्वालामुखीचे केंद्र आहे.

उत्तर:

१) प्रावरणातील प्रचंड तापमानामुळे तेथील खडक वितळतात आणि तेथे शिलारस तयार होतो.

२) उच्च प्रावरण हे जास्त प्रवाही असते. ज्यामधून ज्वालामुखीच्या उद्रेकादरम्यान हा शिलारस पृथ्वीपृष्ठावर येतो.

३) प्रावरणातील अंतर्गत शक्तीमुळे होणाऱ्या हालचालींतून भूपृष्ठावर पर्वत निर्मिती, द्रोणी निर्मिती, ज्वालामुखी, भूकंप यांसारख्या प्रक्रिया घडतात.

अशा प्रकारे प्रावरण हे भूकंप व ज्वालामुखीचे केंद्र आहे.

 

(ई) भूपृष्ठापेक्षा सागरपृष्ठाखाली अंतरंगाच्या थराची जाडी कमी आढळते.

उत्तर:

1)भूखंडीय कवचाची घनता २.६५ ते २.९० ग्रॅम/ घसेमी इतकी आहे तर महासागरीय कवचाची घनता २.९ ग्रॅम/घसेमी ते ३.३ ग्रॅम/घसेमी इतकी आहे.

2)भूपृष्ठाखालील अंतरंगाची घनता ही तुलनेने कमी असल्यामुळे खंडीय कवच प्रावरणावर सहजपणेतरंगत राहते . त्यामुळे ते प्रावरणात विलीन होत नाही.

3) सागर भूपृष्ठाखालील अंतरंगाची घनता ही तुलनेने अधिक असल्यामुळे महासागरीय कवच कवचाचा काही थर सातत्याने प्रावरणात विलीन होत राहतो व त्याची जाडी तुलनेने कमी होत राहते.

त्यामुळे , भूपृष्ठापेक्षा सागरपृष्ठाखाली अंतरंगाच्या थराची जाडी कमी आढळते.

 

(उ) चुंबकावरणामुळे पृथ्वीचे संरक्षण होते.

उत्तर:

१) पृथ्वीच्या सभोवताली असणारा ओझोन ठार सूर्यापासून उत्सार्जीत होणरी अतिनील किरणे शोषून घेतो . त्यामुळे पृथ्वीचे रक्षण होते.

२)   पृथ्वीच्या भोवती असणाऱ्या चुंबकावरणामुळे सौर वातांमधून वाहणारे भारीत कण ओझोन थरात प्रवेश करू शकत नाहीत व त्यामुळे ओझोन थराचे रक्षण होते. अशा प्रकारे,  चुंबकावरणामुळे पृथ्वीचे संरक्षण होते.

 

समाप्त

 हे सुद्धा पहा :

Post a Comment

प्रिय मित्रांनो आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडल्यास, उपयोगी पडल्यास आम्हाला नक्की comment करून सांगा. धन्यवाद.