सागरी प्रवाह स्वाध्याय इयत्ता आठवी भूगोल | Sagari Pravah Swadhyay 8vi Bhugol

8th class geography chapter 5 question answer in marathi | इयत्ता आठवी सागरी प्रवाह स्वाध्याय प्रश्न उत्तरे

इयत्ता आठवी भूगोल स्वाध्याय धडा 5 | इयत्ता आठवी भूगोल गाईड pdf | सागरी प्रवाह स्वाध्याय ८वी | सागरी प्रवाह स्वाध्याय प्रश्न उत्तरे | भूगोल प्रश्न उत्तर मराठी 8th pdf

 

प्रश्न १. योग्य पर्याय निवडा.


(अ) लॅब्राडोर प्रवाह कोणत्या महासागरात आहे?

(i) पॅसिफिक

(ii) उत्तर अटलांटिक

(iii) दक्षिण अटलांटिक

(iv) हिंद

उत्तर: (ii) उत्तर अटलांटिक


(आ) खालीलपैकी कोणता प्रवाह हिंदी महासागरात आहे?

(i) पूर्व ऑस्ट्रेलिया प्रवाह

(ii) पेरू प्रवाह

(iii) दक्षिण धृवीय प्रवाह

(iv) सोमाली प्रवाह

उत्तर: (iv) सोमाली प्रवाह

 

8th class bhugol chapter 5 question answer in marathi Sagari pravah swadhyay 8th bhugol swadhyay Sagari pravah prashn uttar 8th class bhugol chapter4 swadhyay marathi

(इ) सागरी प्रवाहांच्या जवळील किनारपट्टीच्या प्रदेशात खालीलपैकी कशाचा परिणाम होत नाही?

(i) पर्जन्य

(ii) भूमीय वारे

(iii) तापमान

(iv) क्षारता

उत्तर: (ii) भूमीय वारे


8th class bhugol chapter 5 question answer in marathi | Sagari pravah swadhyay | 8th bhugol swadhyay


(ई) उष्ण व थंड सागरी प्रवाह एकत्र येतात, त्या प्रदेशांत खालीलपैकी कशाची निर्मिती होते?

(i) दव

(ii) दहिवर

(iii) हिम

(iv) दाट धुके

उत्तर: (iv) दाट धुके

 

(उ) उत्तर ध्रुवीय प्रदेशापासून अंटार्क्टिकापर्यंत वाहणारे प्रवाह कोणते?

(i) उष्ण सागरी प्रवाह

(ii) थंड सागरी प्रवाह

(iii) पृष्ठीय सागरी प्रवाह

(iv) खोल सागरी प्रवाह

उत्तर: (iv) खोल सागरी प्रवाह

 

प्रश्न २. खालील विधाने तपासा, अयोग्य विधान दुरुस्त करा.


(अ) सागरी प्रवाह पाण्याला विशिष्ट दिशा व गती देतात.

उत्तर: योग्य

 

(आ) खोल सागरी प्रवाह अत्यंत वेगाने वाहतात.

उत्तर: योग्य


(इ) पृष्ठीय सागरी प्रवाहांची निर्मिती सर्वसाधारणपणे विषुववृत्तीय प्रदेशात होते.

उत्तर: अयोग्य

पृष्ठीय सागरी प्रवाहांची निर्मिती विषुववृत्तीय प्रदेशात व त्याचप्रमाणे ध्रुवीय प्रदेशांतही होते.

 

(ई) मानवाच्या दृष्टीने सागरी प्रवाहांना मोठे महत्त्व आहे.

उत्तर: योग्य

 

(उ) हिमनगांचे वहन जलवाहतुकीच्या दृष्टीने धोकादायक नसते.

उत्तर: अयोग्य

हिमनगांचे वहन जलवाहतुकीच्या दृष्टीने धोकादायक असते.

 

(ऊ) ब्राझीलजवळ सागरी प्रवाहांमुळे पाणी उबदार होते. याउलट आफ्रिका किनाऱ्यालगत पाणी थंड होते.

उत्तर: अयोग्य

ब्राझीलजवळ सागरी प्रवाहांमुळे पाणी उबदार होते. तसेच आफ्रिका किनाऱ्यालगतही पाणी उबदार होते.


  हे सुद्धा पहा :


Sagari pravah prashn uttar | 8th class bhugol chapterswadhyay marathi | इयत्ता आठवी भूगोल स्वाध्याय धडा 5 | इयत्ता आठवी भूगोल गाईड pdf

प्रश्न ३. पुढील गोष्टींचा परिणाम सांगा.

 

(अ) उष्ण प्रवाहांचा हवामानावर-

उत्तर:

१)    उष्ण सागरी प्रवाह ज्या किनारपट्टीजवळून वाहतात त्या ठिकाणी तापमान वाढते.

२)   उष्ण सागरी प्रवाह ज्या किनारपट्टीजवळून वाहतात त्या ठिकाणी तुलनेने अधिक पाऊस पडतो.

 

(आ) शीत प्रवाहांचा हिमनगाच्या हालचालींवर-

उत्तर:

१)    शीत प्रवाहांमुळे काही हिमनग खूप अंतरापर्यंत वाहत जाऊन समुद्राच्या मध्यात येतात परिणामी सागरी वाहतुकीला अडथळे निर्माण होतात.

२)   शीत प्रवाहांमुळे हिमनगांची हालचाल देखील शीत सागरी प्रवाहांना अनुसरून होते.

 

(इ) सागरात पुढे आलेल्या भूभागांचा सागरी प्रवाहांवर-

उत्तर:

१)    सागरात पुढे आलेले भूभाग हे सागरी प्रवाहांमध्ये अडथळे निर्माण करतात.

२)   सागरी प्रवाहांची दिशा आणि वेग या घटकांत सागरात पुढे आलेल्या भूभागांमध्ये बदल होतो.

 

(ई) उष्ण व शीत प्रवाहांच्या संगमाचे प्रदेश-

उत्तर:

१)    उष्ण व शीत प्रवाहांच्या संगमाच्या प्रदेशामध्ये दाट धुके तयार होते.

२) या प्रवाहांच्या संगमाच्या प्रदेशांत मोठ्या प्रमाणावर शेवाळ, वनस्पती, प्लवंक हे माशाचे खाद्य मोठ्या प्रमाणवर उपलब्ध असते त्यामुळे तेथे मासेमारी व्यवसाय भरभराटीस येतो.

 

(उ) सागरी प्रवाहांची वहनशक्ती-

उत्तर:

१)    खोल सागरी प्रवाहांमुळे सागराच्या पृष्ठीयभागातील उष्ण पाणी सागराच्या तळाकडे व सागराच्या तळाकडील थंड पाणी हे सागराच्या पृष्ठभागाकडे येते.

२) पृष्ठीय सागरी प्रवाहांच्या वहनशक्तीमुळे किनारपट्टी भागात तापमानात व पर्जन्यमानात फरक पडतो.

 

(ऊ) खोल सागरी प्रवाह

उत्तर:

१)   खोल सागरी प्रवाहांमुळे सागराच्या पृष्ठीयभागातील उष्ण पाणी सागराच्या तळाकडे व सागराच्या तळाकडील थंड पाणी हे सागराच्या पृष्ठभागाकडे येते.

२)   खोल सागरी प्रवाहांमुळे सागरजलाचे पुनर्वितरण घडून येते.


प्रश्न ४. सागरी प्रवाहांचा नकाशा पाहून पुढील प्रश्नांची उत्तरे द्या.

 

(अ) हंबोल्ट प्रवाहाचा दक्षिण अमेरिकेच्या किनाऱ्यावरील हवामानावर काय परिणाम होत असेल?

उत्तर: हंबोल्ट हा शीत प्रवाह आहे. त्यामुळे दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर तापमानाचे व पर्जन्याचे प्रमाण कमी राहील.

 

(आ) प्रति विषुववृत्तीय प्रवाह कोणकोणत्या महासागरांत दिसत नाहीत व का?

उत्तर: आर्क्टिक महासागरात आणि दक्षिण महासागरात प्रति विषुववृत्तीय प्रवाह दिसत नाहीत कारण हे महासागर ध्रुवीय प्रदेशांत आहेत त्यमुळे त्यांत व्यापारी वार्यांचा प्रभाव तुलनेने कमी असतो.

 

(इ) उत्तर हिंदी महासागरात कोणते प्रवाह नाहीत व का?

उत्तर:

१)    शीत प्रवाह उत्तर हिंदी महासागरात नाहीत . कारण उत्तर हिंदी महासागराचा भाग हा उष्ण कटीबंधात येतो.

 

(ई) उष्ण व शीत प्रवाह एकत्र येणारी क्षेत्रे कोठे आहेत?

उत्तर: उष्ण व शीत प्रवाह एकत्र येणारी क्षेत्रे पुढील ठिकाणी आहेत :

उत्तर अटलांटिक महासागरात गल्फ आणि  ल्याब्राडोर प्रवाह, उत्तर पॅसिफिक  महासागरात क्युरोशिओ प्रवाह व ओयाशिओ प्रवाह, दक्षिण अटलांटिक महासागरात ब्राझील प्रवाह , दक्षिण पॅसिफिक  महासागरात पूर्व ऑस्ट्रेलिया प्रवाह व दक्षिण ध्रुवीय प्रवाह इ.

 

 

इयत्ता आठवी भूगोल गाईड pdf | सागरी प्रवाह स्वाध्याय ८वी | सागरी प्रवाह स्वाध्याय प्रश्न उत्तरे

प्रश्न ५. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

 

(अ) खोल सागरी प्रवाह निर्मितीची कारणे कोणती?

उत्तर:

१)    महासागरातील वेगवेळ्या भागांतील पाण्याच्या तापमानामध्ये आणि घनतेमध्ये तफावत आढळते.

२)   सागराच्या पाण्याच्या तापमानाधील आणि घनतेमधील या तफावतीमुळे अभिसरण घडून येते. याला उष्णता- क्षारता अभिसरण असे म्हणतात.

३)   उष्णता-क्षारता अभिसरणामुळे खोल सागरी प्रवाह निर्माण होतात.

 

(आ) सागरजल गतिशील कशामुळे होते?

उत्तर:

१)    सागरजल ग्रहीय वाऱ्यांमुळे गतिशील होते.


(इ) सागरी प्रवाहांना वाऱ्यामुळे कशी दिशा मिळते?

उत्तर: सागरी प्रवाहांना वाऱ्यामुळे दक्षिण गोलार्धात घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेप्रमाणे आणि उत्तर गोलार्धात घड्याळाच्या काट्याच्या दिशेप्रमाणे दिशा मिळते.

 

(ई) कॅनडाच्या पूर्वकिनाऱ्यावरील बंदरे हिवाळ्यात का गोठतात?

उत्तर:

१)    कॅनडाच्या पूर्वकिनाऱ्याजवळ ल्याब्राडोर हा शीत प्रवाह वाहतो.

२)   शीत प्रवाहामुळे पूर्व किनाऱ्याजवळील सागराच्या तापमानामध्ये घट होते.

३)   सागरजलाच्या तापमानात घट झाल्यामुळे सागरातील पाणी गोठू लागते. त्यामुळे कॅनडाच्या पूर्वकिनाऱ्यावरील बंदरे हिवाळ्यात गोठतात.


 

                        समाप्त

  हे सुद्धा पहा :

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.