सागरतळरचना स्वाध्याय इयत्ता आठवी भूगोल | Sagartalrachana 8vi bhugol swadhyay

Sagartalrachana prashn uttar 8th class bhugol chapter4 swadhyay marathi इयत्ता आठवी भूगोल स्वाध्याय धडा 4 इयत्ता आठवी भूगोल गाईड pdf सागरतळरचना
Admin

8th class geography chapter 4 question answer in marathi | इयत्ता आठवी सागरतळरचना  स्वाध्याय प्रश्न उत्तरे

इयत्ता आठवी भूगोल गाईड pdf | सागरतळरचना स्वाध्याय ८वी | सागरतळरचना  स्वाध्याय प्रश्न उत्तरे | भूगोल प्रश्न उत्तर मराठी 8th pdf

 

प्रश्न १. योग्य पर्याय निवडा.

 

(अ) जमिनीवरील भूरूपांप्रमाणेच सागरातही जलमग्न भूरूपे आढळतात कारण....

(i) पाण्याखाली जमीन आहे.

(ii) पाण्याखाली ज्वालामुखी आहेत.

(iii) जमीन सलग असून तिच्या सखल भागात पाणी आहे.

(iv) जमीन सलग असूनही पाण्याप्रमाणे तिची पातळी सर्वत्र सारखी नाही.

उत्तर: (iv) जमीन सलग असूनही पाण्याप्रमाणे तिची पातळी सर्वत्र सारखी नाही.

 

8th class bhugol chapter 4 question answer in marathi Sagartalrachana swadhyay 8th bhugol swadhyay Sagartalrachana prashn uttar 8th class bhugol chapter4 swadhyay marathi

(आ) मानव सागरतळरचनेचा कोणता भाग प्रामुख्याने वापरतो?

(i) भूखंडमंच

(ii) खंडान्त उतार

(iii) सागरी मैदान

(iv) सागरी डोह

उत्तर: (i) भूखंडमंच

 


(इ) खालीलपैकी कोणता पर्याय सागरी निक्षेपाशी निगडित आहे?

(i) नद्या, हिमनद्या, प्राणी-वनस्पती अवशेष

(ii) ज्वालामुखीय राख, भूखंडमंच, प्राणी- वनस्पती अवशेष

(iii) ज्वालामुखीय राख, लाव्हारस, मातीचे सूक्ष्मकण

(iv) ज्वालामुखीय राख, सागरी प्राणी-वनस्पतींचे अवशेष, सागरी मैदाने

उत्तर: (iii) ज्वालामुखीय राख, लाव्हारस, मातीचे सूक्ष्मकण

 

8th class bhugol chapter 4 question answer in marathi | Sagartalrachana swadhyay


प्रश्न २. (अ) खालील आराखड्यात दाखवलेल्या भूआकारांना योग्य नावे द्या

सागरतळरचना  स्वाध्याय इयत्ता आठवी भूगोल | Sagartalrachana 8vi bhugol swadhyay


उत्तर:

 १) सागरी डोह 

२) सागरी पर्वत 

३) सागरी पठार 

४) सागरी गर्ता 

५) खंडांन्त उतार 

६) भूखंड मंच 

 


(आ) वरील आराखड्यातील कोणती भूरूपे सागरातील  अतिखोलीच्या संशोधनास उपयुक्त आहेत?

उत्तर: सागरी पठार व सागरी गर्ता ही वरील आराखड्यातील भूरूपे सागरातील अतिखोलीच्या संशोधनास उपयुक्त आहेत.

 

(इ) कोणती भूरूपे सागरी सीमांचे संरक्षण व नौदलाच्या तळ उभारणीस योग्य आहेत?

उत्तर: भूखंडमंच हे भूरूप सागरी सीमांचे संरक्षण व नौदलाच्या तळ उभारणीस योग्य आहे.


  हे सुद्धा पहा :

8th bhugol swadhyay | Sagartalrachana prashn uttar | 8th class bhugol chapterswadhyay marathi


प्रश्न ३. भौगोलिक कारणे द्या.


(अ) सागरतळरचनेचा अभ्यास मानवास उपयुक्त आहे.

उत्तर:

१)    खनिजे, मूलद्रव्ये, अतिसूक्ष्म मातीचे कान आणि खडक इत्यादी घटक सागरतळात मोठ्या प्रमाणावर आढळतात.

२)   प्राणी व वनस्पती यांचे अवशेष देखील सागरतळाशी मोठ्या प्रमाणावर आढळतात.

३)   खनिजसंपत्ती, वनस्पती आणि प्राणीसंपत्ती तसेच ज्वालामुखींचा उद्रेक इत्यादींच्या अभ्यासासाठी सागरतळाचा अभ्यास मानवास उपयुक्त आहे.

 

(आ) भूखंडमंच हे मासेमारीसाठी नंदनवन आहे.

उत्तर:

१)    किनाऱ्यालगत असलेला व समुद्रात बुडालेला जमिनीचा भाग म्हणजे भूखंड मंच होय.

२)   भूखंडमंच हा भाग उथळ असल्याने सूर्यकिरण तळापर्यंत पोहोचतात

३)   तेथे शेवाळ, प्लवंक यांची निर्मिती होते हे  माशांचे खाद्य असल्याने भूखंडमंचावर मोठ्या प्रमाणात मासे आढळतात.

४) भूखंडाच्या भागात मोठ्या प्रमाणावर माशांचे प्रजनन होते. अशा प्रकारे भूखंडमंच मासेमारीसाठी नंदनवन आहे.

 

(इ) काही सागरी बेटे ही सागरी पर्वतरांगांची शिखरे असतात.

उत्तर:

१)    सागरतळावर हजारो किमी लांब, शेकडो किमी रुंद व हजारो मीटरउंचीच्या पर्वतरांगा असतात. या पर्वतरंगांना म्हणतात.

२)   काहित ठिकाणी या सागरपर्वतरांगांची शिखरे समुद्राच्या पाण्याच्या पातळीच्या वर येतात. अशा ठिकाणी चारही बाजूंना पाणी व मध्यभागी जमीन असे भूरूप तयार होते. अशा भूरुपाला सागरी बेट म्हणतात. अशा प्रकारे काही सागरी बेटे ही सागरपर्वतरांगांची शिखरे असतात.


(ई) खंडान्त उतार ही भूखंडांची सीमारेषा मानतात.

उत्तर:

१)    खंडान्त उतार हा भूखंडमंचानंतर सुरु होतो.

२)   खंडान्त उताराच्या अधः सिमेनंतर सागरी मैदानाचा अत्यंत खोल भाग सुरु होतो. म्हणून , खंडान्त उतार ही भूखंडांची सीमारेषा मानतात.

 

(उ) मानवाकडून सागरात होणारे टाकाऊ पदार्थांचे  विसर्जन हे पर्यावरणाच्या दृष्टीने हानिकारक असते.

उत्तर:

१)    मानवाकडून होणाऱ्या टाकावू पदार्थांचे विसर्जन सागरात केल्याने सागरातील पाण्याच्या प्रदूषणाचे प्रमाण मोठ्या प्रमाणवर वाढते.

२)   सागरातील जलचर वनस्पती आणि प्राणी यांचा विनाश होण्यास हे सागरी प्रदूषण कारणीभूत ठरते.

अशा प्रकारे, मानवाकडून होणारे टाकावू पदार्थांचे विसर्जन हे पर्यावरणाच्या दृष्टीने हानिकारक असते.

 

प्रश्न ४. पृष्ठ क्रमांक २७ वरील ‘पहा बरे जमते का?’ मधील नकाशाचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

 

(अ) मादागास्कर आणि श्रीलंका हे सागरतळरचनेच्या कोणत्या भूरूपांशी संबंधित आहे?

उत्तर: मादागास्कर आणि श्रीलंका हे सागरतळरचनेच्या बेट भूरूपांशी संबंधित आहे.

 

(आ) हे भूभाग कोणकोणत्या खंडाजवळ आहेत?

उत्तर: मादागास्कर हा भूभाग अक्रिका खंडाजवळ आहे तर श्रीलंका भूभाग हा आशिया खंडाजवळ आहे.

 

(इ) आपल्या देशातील कोणती बेटे जलमग्न पर्वतशिखरांचे भाग आहेत?

उत्तर: आपल्या देशातील अंदमान आणी निकोबार ही बेटे जलमग्न पर्वतशिखरांचे भाग आहेत.

 


                        समाप्त

  हे सुद्धा पहा :



Post a Comment

प्रिय मित्रांनो आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडल्यास, उपयोगी पडल्यास आम्हाला नक्की comment करून सांगा. धन्यवाद.