स्थानिक वेळ व प्रमाण वेळ स्वाध्याय इयत्ता आठवी भूगोल | Sthanik Vel v Praman Vel 8vi bhugol swadhyay

१. इयत्ता आठवी स्थानिक वेळ व प्रमाण वेळ स्वाध्याय प्रश्न उत्तरे | 8th class geography chapter 1 question answer in marathi

इयत्ता आठवी भूगोल स्वाध्याय धडा १ | इयत्ता आठवी भूगोल गाईड pdf | स्थानिक वेळ व प्रमाण वेळ स्वाध्याय ८वी | स्थानिक वेळ व प्रमाण वेळ स्वाध्याय प्रश्न उत्तरे


 प्रश्न १. योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा.


(अ) पृथ्वीच्या परिवलनास २४ तासांचा कालावधी लागतो. एका तासात पृथ्वीवरील ...............

(i) ०५ रेखावृत्ते सूर्यासमोरून जातात.

(ii) १० रेखावृत्ते सूर्यासमोरून जातात.

(iii) १५ रेखावृत्ते सूर्यासमोरून जातात.

(iv) २० रेखावृत्ते सूर्यासमोरून जातात.

उत्तर: (iii) १५ रेखावृत्ते सूर्यासमोरून जातात.


8th class bhugol chapter 1 question answer in marathi sthanik vel v praman vel swadhyay 8th bhugol swadhyay sthanik vel v praman vel prashn uttar 8th class bhugol chapter 1 swadhyay marathi


(आ) पृथ्वीवरील कोणत्याही दोन ठिकाणांच्या स्थानिक वेळेतील फरक समजण्यासाठी ...........

(i) दोन्ही ठिकाणची मध्यान्हाची वेळ माहीत असावी लागते.

(ii) दोन्ही ठिकाणांच्या रेखावृत्तांतील अंशात्मक अंतरातील फरक माहीत असावा लागतो.

(iii) दोन्ही ठिकाणांच्या प्रमाण वेळेतील फरक माहीत असावा लागतो.

(iv) आंतरराष्ट्रीय वाररेषेनुसार बदल  करावे लागतात.

उत्तर: (ii) दोन्ही ठिकाणांच्या रेखावृत्तांतील अंशात्मक अंतरातील फरक माहीत असावा लागतो.


(इ) कोणत्याही दोन लगतच्यारेखावृत्तांच्या स्थानिक वेळेत ..........

(i) १५ मिनिटांचा फरक असतो.

(ii) ०४ मिनिटांचा फरक असतो.

(iii) ३० मिनिटांचा फरक असतो.

(iv) ६० मिनिटांचा फरक असतो.

उत्तर: (ii) ०४ मिनिटांचा फरक असतो.



 हे सुद्धा पहा :


प्रश्न २. भौगोलिक कारणे लिहा.


(अ) स्थानिक वेळ मध्यान्हावरून निश्चित केली जाते.

उत्तर:

१) सर्वसाधारणपणे मध्यान्हाच्या वेळी सूर्य जास्तीत जास्त उंची गाठतो व त्या वेळी निम्मा वेळ पूर्ण झाला असे गृहीत धरले जाते.

२) जेव्हा बरोबर सूर्यासमोर एखादे रेखावृत्त येते त्या वेळी रेखावृत्तावर मध्यान्ह झाल्याचे गृहीत धरले जाते.

३) पृथ्वीवर मध्यान्ह वेळ एका रेखावृत्तावर म्हणजेच उत्तर ध्रुववृत्तापासून ते दक्षिण ध्रुववृत्तापर्यंत सर्वत्र सारखी असते, म्हणून स्थानिक वेळ ही मध्यान्हावरून निश्चित केली जाते.

 

(आ) ग्रीनीच येथील स्थानिक वेळ जागतिक प्रमाण वेळ मानली जाते.

उत्तर:

१)० अंश रेखावृत्ताच्या संदर्भामध्ये जागतिक प्रमाणवेळ ठरवली जाते.

२)० अंश रेखावृत्त हे इंग्लंडच्या ग्रीनीच या शहराजवळून जाते. जगातील विविध देशातील व्यवहारांमध्ये सुरुत्रता आणण्यासाठी ग्रीनीच येथील स्थानिक वेळ जागतिक प्रमाणवेळ म्हणून मानली जाते.

 

(इ) भारताची प्रमाण वेळ ८२अंश ३०' पूर्व रेखावृत्तावरील  स्थानिक वेळेनुसार निश्चित केली आहे.

उत्तर:

१)    ८२अंश ३०' पूर्व हे रेखावृत्त भारतच्या माधावर्ती भागातून जाते.

२)   या रेखा वृत्तावरील स्थानिक वेळेत आणि देशातील इतर कोणत्याही पश्चिम किंवा पूर्वेकडील रेखावृत्तांच्या स्थानिक वेळेत एक तासापेक्षा अधिक कालावधीचा फरक पडत नाही. त्यामुळे, भारताची प्रमाणवेळ ८२अंश ३०' पूर्व रेखावृत्तावरील स्थानिक वेळेनुसार निश्चित केली जाते.

 

8th class bhugol chapter 1 question answer in marathi | sthanik vel v praman vel swadhyay | 8th bhugol swadhyay 

(ई) कॅनडा या देशात सहा वेगवेगळ्या प्रमाण वेळा  आहेत.

उत्तर:

१) कॅनडा या देशाचा रेखावृत्तीय विस्तार हा ५२ अंश ३७’पूर्व रेखावृत्त ते १४१ अंश पश्चिम रेखावृत्त इतका आहे.

२) कॅनडा देशाच्या अतिपूर्वेकडील आणि अतिपश्चिमेकडील रेखावृत्तांमधील अंशात्मक फरक हा सुमारे ८८ अंशांचा आहे.

३)  कॅनडा देशाच्या अतिपूर्वेकडील आणि अतिपश्चिमेकडील रेखावृत्तांवरील स्थानिक वेळेत सुमारे ५  तास ५२ मिनिटांचा फरक पडतो. त्यामुळे येथे एकच प्रमाणवेळ संपूर्ण देशात मानणे हे गैरसोयीचे ठरते. म्हणून दैनंदिन व्यवहारंत सुरुत्रता आणण्यासाठी कॅनडा या देशात सहा वेगवेगळ्या प्रमाण वेळा आहेत.

 

sthanik vel v praman vel prashn uttar | 8th class bhugol chapter 1 swadhyay marathi


प्रश्न ३. थोडक्यात उत्तरे लिहा.


(अ) ६०° पूर्व रेखावृत्तावर दुपारचे बारा वाजले असतील,  तर ३०° पश्चिम रेखावृत्तावर किती वाजले असतील  ते स्पष्ट करा.

उत्तर:

१)    ६०° पूर्व रेखावृत्त आणि ३०° पश्चिम रेखावृत्त यांमधील अंशात्मक फरक ९० अंश इतका आहे.

२)   या दोन रेखावृत्तांमधील एकूण वेळेतील फरक:

= ९० x  

= ३६० मिनिटे

= ६ तास .

३)   पुर्वेडील रेखावृत्तावरील स्थानिक वेळ हे पश्चिम रेखावृत्ताच्या स्थानिक वेळेच्या पुढे असते.

४) म्हणजेच , ६०° पूर्व रेखावृत्तावर दुपारचे बारा वाजले असतील,  तर ३०° पश्चिम रेखावृत्तावर सकाळचे ६ वाजले असतील. ( ६ तास मागे)



(आ) एखाद्या प्रदेशाची प्रमाण वेळ कशी निश्चित केली जाते?

उत्तर:

१)    देशात प्रत्येक ठिकाणाच्या स्थानिक वेळेनुसार व्यवहार केल्यास वेळेची विसंगती निर्माण होऊन दैनंदिन व्यवहारात गैरसोय होईल म्हणून देशाच्या सर्वसाधारण मध्यवर्ती ठिकाणाहून जाणाऱ्या रेखावृत्ताची स्थानिक वेळ ही प्रमाणभूत मानण्यात येते.

२) सर्वसाधारणपणे तास-दोन तासाच्या फरकापेक्षा जास्त रेखावृत्तीय विस्तार असलेल्या देशासाठी एक प्रमाण वेळ मानली जाते.

३)   परंतु त्यापेक्षा जास्त रेखावृत्तीय (पूर्व-पश्चिम) विस्तार असल्यास तेथे एकच प्रमाण वेळ मानणे  सोयीचे नसते, त्यामुळे अशा प्रदेशांत एकापेक्षा अधिक प्रमाण वेळा मानल्या जातात.

 

(इ) ब्राझीलमध्ये सावो पावलो येथील फुटबॉल सामना भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी ६ वाजता सुरू  झाला. तेव्हा सावो पावलो येथील स्थानिक वेळ काय असेल ते स्पष्ट करा.

उत्तर:

१) सावो पावलो हे ठिकाण भारताच्या पश्चिमेकडील रेखावृत्तावर आहे, कोणत्याही रेखावृत्ताच्या पश्चिमेकडे प्रत्येक रेखावृत्तावर स्थानिक वेळ ही ४ मिनिटांनी कमी होते.

२)   सावो पावलो व भारत या ठिकाणांच्या रेखावृत्तांमधील अंशात्मक फरक १२७अंश ३०’ इतका आहे.

३)   एकूण वेळीतील फरक :

= १२७.५ X ४

= ५१० मिनिटे

= ८ तास ३० मिनिटे.

४) कोणत्याही रेखावृत्ताच्या पूर्वेकडील रेखावृत्तांवरील वेळ पुढे असते, तर पश्चिमेकडील रेखावृत्तांवरील वेळ मागे असते.

५)  म्हणजेच भारतात सकाळचे सहा वाजले असतील, ब्राझीलमध्ये सावो पावलो येथील फुटबॉल सामना भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी ६ वाजता सुरू  झाला. तेव्हा सावो पावलो येथील स्थानिक आदल्या दिवसाच्या रात्रीचे ९ वाजून ३० मिनिटे इतकी असेल.

स्थानिक वेळ व प्रमाण वेळ स्वाध्याय ८वी | स्थानिक वेळ व प्रमाण वेळ स्वाध्याय प्रश्न उत्तरे भूगोल प्रश्न उत्तर मराठी 8th pdf | इयत्ता आठवी भूगोल स्थानिक वेळ व प्रमाण वेळ स्वाध्याय


प्रश्न ४. मूळ रेखावृत्तावर २१ जून रोजी रात्रीचे १० वाजले तेव्हा अ,,क या ठिकाणची वेळ व दिनांक कोष्टकात लिहा.

उत्तर:


ठिकाण

रेखावृत्त

दिनांक

वेळ

१२०० पूर्व

२२ जून

सकाळचे ६.

१६०० पश्चिम

२१ जून

सकाळचे ११वाजून १० मिनिटे 

६०० पूर्व

२२ जून

पहाटेचे २ .


प्रश्न ५. खालीलपैकी वेगवेगळ्या स्थिती ‘क’ या ठिकाणी  कोणकोणत्या आकृतींत दिसून येतात ते आकृतींखालील  चौकटींत लिहा.


स्थानिक वेळ व प्रमाण वेळ स्वाध्याय इयत्ता आठवी भूगोल | Sthanik Vel v Praman Vel Swadhyay


उत्तर:  (ii) मध्यरात्र


स्थानिक वेळ व प्रमाण वेळ स्वाध्याय इयत्ता आठवी भूगोल | Sthanik Vel v Praman Vel Swadhyay


उत्तर: (iv) सूर्यास्त

स्थानिक वेळ व प्रमाण वेळ स्वाध्याय इयत्ता आठवी भूगोल | Sthanik Vel v Praman Vel Swadhyay


उत्तर: (i)सूर्योदय

स्थानिक वेळ व प्रमाण वेळ स्वाध्याय इयत्ता आठवी भूगोल | Sthanik Vel v Praman Vel Swadhyay

उत्तर: (iii) मध्यान्ह


 

समाप्त

 

हे सुद्धा पहा :


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.