उद्योग स्वाध्याय इयत्ता आठवी भूगोल | Udyog Swadhyay 8 vi bhugol

Udyog 8th class geography chapter 8 question answer in marathi | इयत्ता आठवी उद्योग स्वाध्याय प्रश्न उत्तरे

8th class bhugol chapter question answer in marathi | Udyog swadhyay | 8th bhugol swadhyay | Udyog prashn uttar | 8th class bhugol chapter 8 swadhyay marathi

 

प्रश्न १. अचूक पर्यायांसमोरील चौकटींत अशी खूण करा.

 

(अ) औद्योगिक विकासावर खालीलपैकी कोणता घटक  प्रत्यक्ष परिणाम करत नाही?

(i) पाणी

(ii) वीज

(iii) मजूर

(iv) हवा

उत्तर: हवा

 

(आ) खालीलपैकी कोणता उद्योग हा लघुउद्योग आहे?

(i) यंत्रसामग्री उद्योग

(ii) पुस्तकबांधणी उद्योग

(iii) रेशीम उद्योग

(iv) साखर उद्योग

उत्तर: (ii) पुस्तकबांधणी उद्योग


इयत्ता आठवी भूगोल स्वाध्याय धडा 8 इयत्ता आठवी भूगोल गाईड pdf उद्योग स्वाध्याय ८वी उद्योग स्वाध्याय प्रश्न उत्तरे भूगोल प्रश्न उत्तर मराठी 8th pdf



(इ) खालीलपैकी कोणत्या शहरात माहिती तंत्रज्ञानाचे केंद्र नाही?

(i) जुनी दिल्ली

(ii) नवी दिल्ली

(iii) नोएडा

(iv) बंगळुरू

उत्तर: (i) जुनी दिल्ली

 

(ई) उद्योगांना नफ्यातील दोन टक्के रक्कम कशासाठी वापरणे अनिवार्य आहे?

(i) आयकर

(ii) उद्योगांचे सामाजिक दायित्व

(iii) वस्तूव सेवा कर

(iv) विक्री कर

उत्तर: (ii) उद्योगांचे सामाजिक दायित्व

 

 

प्रश्न २. खालील विधाने सत्य की असत्य ते लिहा. असत्य विधाने दुरुस्त करा.

 

(अ) देशातील लघु व मध्यम उद्योग अवजड उद्योगांना मारक ठरतात.

उत्तर: असत्य

देशातील लघु व मध्यम उद्योग अवजड उद्योगांना पूरक ठरतात.

 

(आ) देशातील कारखानदारी देशाच्या आर्थिक विकासाचे निर्देशक आहे.

उत्तर: सत्य

 

(इ) औद्योगिक विकास महामंडळाच्या स्थापनेचा उद्देश उद्योगधंद्यांचे विकेंद्रीकरण करणे हा आहे.

उत्तर: सत्य

 

(ई) उद्योगांचे सामाजिक दायित्व हे प्रत्येक उद्योगधंद्यासाठी अनिवार्य आहे

उत्तर: असत्य

उद्योगांचे सामाजिक दायित्व हे प्रत्येक उद्योगांसाठी अनिवार्य नाही.

 

प्रश्न ३. खालील प्रश्नांची उत्तरे तीन ते चार ओळींत लिहा.

 

(अ) औद्योगिक क्षेत्रासाठी सरकारकडून कोणकोणत्या सुविधा उपलब्ध होतात?

उत्तर:

1) औद्योगिक क्षेत्रासाठी सरकारकडून उद्योगांना वीज, पाणी, कर यांमध्ये विशेष सवलती दिल्या जातात.

2) औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांना सरकारकडून सवलतीच्या दरात जमीन उपलब्ध करून दिली जाते.

 

(आ) औद्योगिक विकासाचा राष्ट्रीय विकासावर कसा  परिणाम होतो हे तुमच्या शब्दांत लिहा.

उत्तर:

1) औद्योगिक विकासामुळे रोजगाराच्या निर्मितीमध्ये भर पडते.

2) देशातील नागरिकांना रोजगार मिळतो, त्यांचे राहणीमान उंचावते, देशाचे दरडोई उत्पन्न वाढते त्यामुळे राहणीमान उंचावते.

3) स्थूल राष्ट्रीय उत्पन्नात भर पडते.

4) देशाच्या पक्क्या मालाच्या निर्यातीत वाढ झाली असता त्यापासून देशाला परकीय चलन प्राप्त होते. अशा प्रकारे, औद्योगिक विकासाचा राष्ट्रीय विकासावर परिणाम होतो.

 

(इ) उद्योगांच्या सामाजिक दायित्वाच्या उपयुक्तेबाबत तुमचे मत थोडक्यात व्यक्त करा.

उत्तर:

1) उद्योजक व्यक्ती अथवा उद्योगसमूहाने समाजहित तसेच पर्यावरण संतुलनासाठी केलेली कृती उद्योगांचे सामाजिक दायित्व म्हणून समजली जाते

2) उद्योगांच्या सामाजिक दायित्वात उद्योजक अथवा उद्योग समूह अ) शैक्षणिक किंवा आरोग्य विषयक सुविधा पुरवू शकतात. ब) समाजातील निराधारांसाठी, अपंगांसाठी , गरजू व्यक्तींसाठी मार्गदर्शन केंद्रे चालवू शकतात.क) एखादे गाव दत्तक घेऊन त्या गावाच्या विकासास हातभार लावू शकतात.

3) उद्योगांच्या सामाजिक दायित्वामुळे परिसरातील लोकांच्या कल्याणात भर पडू शकते.

 

(ई) लघुउद्योगाची तीन वैशिष्ट्ये सांगा.

उत्तर:

1) लघुउद्योगांना जागा, यंत्रसामग्री आणी भांडवल यांची तुलनेने कमी प्रमाणात आवश्यकता असते.

2) लघुउद्योगांसाठी तुलनेने मनुष्यबळ आवश्यक असते.

लघुउद्योगातील उत्पादित वस्तूंची बाजारपेठ तुलनेने मर्यादित असते.

 

इयत्ता आठवी भूगोल स्वाध्याय धडा 8 | इयत्ता आठवी भूगोल गाईड pdf | उद्योग स्वाध्याय ८वी | उद्योग स्वाध्याय प्रश्न उत्तरे | भूगोल प्रश्न उत्तर मराठी 8th pdf

प्रश्न ४. खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा.


(अ) औद्योगिक विकासावर परिणाम करणारे घटक स्पष्ट  करा.

उत्तर: औद्योगिक विकासावर पुढील घटक परिणाम करतात:

1) कच्चा माल , पाणी पुरवठा, प्रकृतीक रचना, बाजारपेठ , भांडवल, वाहतुकीच्या सोईसुविधा, शासकीय धोरणे, राजकीय परिस्थिती इत्यादी घटक एखाद्या प्रदेशातील औद्योगिक विकासावर परिणाम करतात.

2) उदा. पर्वतीय प्रदेश, घनदाट प्रदेश, वाळवंटी प्रदेश इत्यादी ठिकाणी प्रतिकूल प्राकृतिक रचनेमुळे आणि वाहतुकीच्या सोयीसुविधा मर्यादित प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे औद्योगिक विकास पुरेशा प्रमाणात होत नाही.

3) उदा, सुपीक मैदानी प्रदेशामध्ये शेती व्यवसाय भरभराटीस येतो. शेतमाल इतर अनेक व्यवसायांत कच्चा माल म्हणून उपयोग होत असल्यामुळे अशा प्रदेशात इतर उद्योगांच्या विकासास चालना मिळते.

 

(आ) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे फायदे  लिहा.

उत्तर:

1) महाराष्ट्र राज्यात राज्य सरकारने १ ऑगस्ट १९६२ रोजी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना केली.

2) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातर्फे प्रत्येक जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्रांची निर्मिती करण्यात आली.

3) औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांना सरकारकडून जमिनीचे दर, वीज, पाणी, कर यांमध्ये सवलती दिल्या जातात, त्यामुळे उद्योगांना चालना मिळते.

4) महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली असल्यामुळे उद्योगांच्या विकेंद्रीकरणास चालना मिळते.

5) राज्यातील रोजगार पटली, व्यापार व लोकांचे राहणीमान उंचावण्यात महाराष्ट्र औद्योगिक महामंडळ महत्वपूर्ण ठरते.

 

(इ) माहिती तंत्रज्ञान उद्योगाचे महत्त्व सांगा.

उत्तर:

1) माहिती तंत्रज्ञान उद्योगामध्ये तांत्रिक माहिती शोधणे, मिळवणे, विश्लेषण करणे व संग्रहित करणे, आलेखांच्या स्वरूपात मांडणे, मागणीनुसार ती पुरवणे इत्यादी कामे केली जातात. परिणामी माहिती तंत्रज्ञान उद्योगांद्वारे जगातील कोणत्याही गोष्टीची सहजपणे माहिती उपलब्ध होऊ शकते.

2) या उद्योगामध्ये मोबाईल फोन, संगणक , इंटरनेट इत्यादी साधनांचा माहितीशी संबंधित कार्यांसाठी मोठ्या प्रमाणवर वापर केला जातो. या साधनांद्वारे तुलनेने कमी खर्चांत, कमी वेळेत आणि कमी कष्टात हवी असलेली माहिती उपलब्ध होते.

3) माहिती तंत्रज्ञान उद्योगातून मिळालेल्या माहितीच्या आधारे वैयक्तिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक प्रगती करणे शक्य होते.  

 

(ई) भारतातील लोकसंख्येचा विचार करता उद्योग निर्मिती हा बेरोजगारीवरील एक चांगला उपाय आहे. स्पष्ट करा.

उत्तर:

1) भारताची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार १२१ कोटी इतकी होती.

2) भारतातील बहुतांश लोकांचा शेती हा मुख्य व्यवसाय असून ते हंगामी स्वरुपाची शेती करतात, त्यामुळे भारतात बेरोजगारीचे प्रमाण जास्त आहे. म्हणून भारतात मोठ्या प्रमाणवर उद्योगनिर्मिती करणे आवश्यक आहे.

3) मोठ्या प्रमाणवर लघुउद्योग आणि मध्यम उद्योग निर्माण केले असता, बेरोजगार व्यक्तींना, स्त्रियांना मोठ्या प्रमाणवर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.

4) उद्योगांच्या निर्मिती केल्यास , नागरीकरणास चालना मिळेल व ग्रामीण भागातून शहरी भागाकडे होणारे लोकसंख्येचे स्थलांतर थांबवणे शक्य होईल, राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होऊन, बेरोजगारीचे दृष्टचक्र भेदणे शक्य होईल.

 

प्रश्न ५. खालील विधानासाठी ओघतक्ता तयार करा.

 

(अ) आपण जे कपडे वापरतो त्यांचा शेतापासून आपल्यापर्यंत झालेला प्रवास लिहा.

उत्तर:

 

उद्योग स्वाध्याय इयत्ता आठवी भूगोल | Udyog Swadhyay 8 vi bhugol


(ब) एखाद्या उद्योगाच्या स्थानिकीकरणासाठी आवश्यक घटक लिहा.

उत्तर:


उद्योग स्वाध्याय इयत्ता आठवी भूगोल | Udyog Swadhyay 8 vi bhugol





प्रश्न ६. फरक स्पष्ट करा.

 

इयत्ता आठवी भूगोल स्वाध्याय धडा 8 | इयत्ता आठवी भूगोल गाईड pdf | उद्योग स्वाध्याय ८वी | उद्योग स्वाध्याय प्रश्न उत्तरे | भूगोल प्रश्न उत्तर मराठी 8th pdf

(अ) मध्यम उद्योग - अवजड उद्योग

उत्तर:

मध्यम उद्योग

अवजड उद्योग

१.अवजड उद्योगांच्या तुलनेत मध्यम उद्योगांना कमी प्रमाणात, भांडवल, जागा, मनुष्यबळ, यंत्रसामग्री यांची आवश्यकता असते.

१.मध्यम उद्योगांच्या तुलनेत अवजड उद्योगांना जास्त प्रमाणात, जागा, भांडवल, मनुष्यबळ, यंत्रसामग्री यांची आवश्यकता असते.

२.उदा, फळप्रक्रिया उद्योग, गुऱ्हाळ इत्यादी.

२.उदा, कापडनिर्मिती, वाहननिर्मिती, औषधनिर्मिती इत्यदी.

 

(आ) कृषीपूरक उद्योग - माहिती तंत्रज्ञान उद्योग

उत्तर:

कृषीपूरक उद्योग

माहिती तंत्रज्ञान उद्योग

१.सर्वसाधारणपणे कृषीपूरक उद्योगांचे ग्रामीण भागात स्थानिकीकरण आढळते.

१.सर्वसाधारणपणे माहिती तंत्रज्ञान उद्योगांचे नागरी भागात स्थानिकीकरण आढळते.

२.कृषीपूरक उद्योगांचा पारंपारिक उद्योगांत समावेश होतो.

२.माहिती तंत्रज्ञान उद्योगांचा आधुनिक उद्योगांत समावेश होतो.

 


 

                        समाप्त

 

 हे सुद्धा पहा :


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.