Kendriy karyakari Mandal swadhyay iyatta aathvi | केंद्रीय कार्यकारी मंडळ स्वाध्याय इयत्ता ८वी नागरिकशास्त्र
8th std history digest pdf Maharashtra board | 8vi Kendriy karyakari Mandal prashn uttare Itihas swadhyay 8th
प्रश्न १. योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करून पुन्हा लिहा.
(१) भारतातील
कार्यकारी सत्ता ......... यांच्याकडे असते.
(राष्ट्रपती, प्रधानमंत्री, सभापती)
उत्तर: भारतातील कार्यकारी सत्ता राष्ट्रपती यांच्याकडे असते.
(२) राष्ट्रपतीचा
कार्यकाल ....... वर्षांचा असतो.
(तीन, चार, पाच)
उत्तर: राष्ट्रपतीचा कार्यकाल पाच वर्षांचा असतो.
(३)
मंत्रिमंडळाचे नेतृत्व .......... करतात.
(पक्षप्रमुख, प्रधानमंत्री, राष्ट्रपती)
उत्तर: मंत्रिमंडळाचे नेतृत्व प्रधानमंत्री करतात.
प्रश्न २. ओळखा आणि लिहा.
(१)
राष्ट्रपती, प्रधानमंत्री, मंत्रिमंडळ
यांचा भारताच्या ज्या मंडळात समावेश असतो त्या मंडळाचे नाव -
उत्तर:
कार्यकारी मंडळ
(२) अधिवेशन काळातील दुपारी १२ चा काळ हा या नावाने ओळखतात -
उत्तर: शून्य
प्रहर
केंद्रीय कार्यकारी मंडळस्वाध्याय | इयत्ता आठवी विषय नागरिकशास्त्र धडा तिसरा प्रश्न उत्तरे
केंद्रीय कार्यकारी मंडळप्रश्न उत्तरे | स्वाध्याय केंद्रीय कार्यकारी मंडळ८वी नागरिकशास्त्र
प्रश्न ३. पुढील संकल्पना तुमच्या शब्दांत लिहा.
(१) महाभियोग प्रक्रिया
उत्तर:
संविधानाचे रक्षण करण्याची जबाबदारी राष्ट्रपतींवर असते, परंतु त्यांचे एखादे वर्तन संविधानाचा भंग करणारे ठरल्यास राष्ट्रपतींना
त्यांच्या पदावरून दूर करण्याचा अधिकार संसदेला असतो. या प्रक्रियेला ‘महाभियोग’
प्रक्रिया असे म्हणतात.
ही प्रक्रिया
पुढील प्रमाणे असते :
१. राष्ट्रपतींकडून संविधानाचा भंग झालेला
असल्यास तसा आरोप कोणतेही एक सभागृह ठेवते.
२. त्या आरोपांची चौकशी दुसरे सभागृह
करते.
३. दोन्ही सभागृहांच्या विशेष बहुमताने
(२/३) ठराव संमत झाल्यास त्यानंतर राष्ट्रपती पदावरून दूर होतात.
(२) अविश्वास ठराव
उत्तर:
१)लोकसभेत जोपर्यंत बहुमत असते तोपर्यंतच सरकार कार्य करू शकते. हे बहुमत संसद सदस्यांनी काढून घेतल्यास सरकार किंवा मंत्रिमंडळ सत्तेवर राहू शकत नाही.
२) ‘आमचा मंत्रिमंडळावर विश्वास नाही’ असे म्हणून संसद सदस्य अविश्वासाचा ठराव मांडू शकतात.
३) तो बहुमताने संमत झाल्यास मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो.
४) मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवण्याचा हा एक अत्यंत प्रभावी मार्ग आहे.
(३) जम्बो मंत्रिमंडळ
उत्तर:
१)जम्बो मंत्रिमंडळ म्हणजे खूप मोठे मंत्रिमंडळ.
२)आपल्या देशात मंत्रिमंडळाचा आकार मोठा ठेवण्याकडे कल होता.
३)त्यामुळे मंत्रिमंडळ मर्यादित आकारमानाचे असावे म्हणून संविधानात दुरुस्ती करण्यात आली.
४) त्यानुसार मंत्रिमंडळाची संख्या लोकसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या १५ टक्क्यांपेक्षा अधिक असणार नाही असे निश्चित करण्यात आले. यामुळ प्रमाणापेक्षा जास्त मंत्र्यांवर होणारा शासनाचा खर्च वाचला.
प्रश्न ४. थोडक्यात उत्तरे लिहा.
(१) मंत्रिमंडळाची कार्ये स्पष्ट करा.
उत्तर:
१) मंत्रिमंडळ कायद्यांच्या निर्मितीत पुढाकार घेते. त्याचा आराखडा तयार करते.
२) त्या आराखड्यावर चर्चा करते आणि नंतर ते संसदेच्या सभागृहात मांडण्याचे कार्य करते.
३) शिक्षण, शेती, उद्योग, आरोग्य, परराष्ट्र व्यवहार अशा अनेक विषयांवर मंत्रिमंडळ एक निश्चित धोरण मांडते व संसदेची त्याला मान्यता मिळवून घेण्याचा प्रयत्न करते.
४) मंत्रिमंडळाची मुख्य जबाबदारी धोरणांच्या अंमलबजावणीची असते.
(२) संसद
मंत्रिमंडळावर कशाप्रकारे नियंत्रण ठेवते?
उत्तर: संसद मंत्रिमंडळावर पुढीलप्रकारे नियंत्रण ठेवते.
(१) चर्चा आणि विचारविनिमय :कायद्याच्या निर्मितीच्या दरम्यान संसद सदस्य चर्चा आणि विचारविनिमय करून मंत्रिमंडळाला धोरणातील अथवा कायद्यातील त्रुटी दाखवून देतात. कायदा निर्दोष होण्याच्या दृष्टीने ही चर्चा खूप महत्त्वाची असते.
(२)प्रश्नोत्तरे : संसदेचे अधिवेशन चालू असताना कामकाजाची सुरुवात संसद सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांनी होते. या प्रश्नांना संबंधित मंत्र्यांनी समाधानकारक उत्तरे द्यायची असतात.
(३) शून्य प्रहर : अधिवेशन काळातील दुपारी १२ चा काळ शून्य प्रहर म्हणून ओळखला जातो. या काळात सार्वजनिकदृष्ट्या कोणत्याही महत्त्वाच्या प्रश्नावर चर्चा करतात.
(४) अविश्वासाचा ठराव : ‘आमचा मंत्रिमंडळावर विश्वास नाही’ असे म्हणून संसद सदस्य अविश्वासाचा ठराव मांडू शकतात. तो बहुमताने संमत झाल्यास मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो.
अशा प्रकारे संसद मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवते.
इयत्ता आठवी नागरिकशास्त्र स्वाध्याय pdf | केंद्रीय कार्यकारी मंडळप्रश्न उत्तरे | इयत्ता आठवी केंद्रीय कार्यकारी मंडळ धडा तिसरा स्वाध्याय
प्रश्न ५. पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.
उत्तर:
भारताच्या राष्ट्रपतींची कार्य :
१) संसदेचे अधिवेशन बोलावणे, स्थगित करणे, संसदेला संदेश पाठवणे.
२) लोकसभा मुदतीनंतर किंवा मुदतीपूर्वी बरखास्त करणे.
३) संसदेने संमत केलेल्या विधेयकावर स्वाक्षरी करणे.
४) प्रधानमंत्र्यांची व मंत्रीमंडळाची नेमणूक करणे.
५) सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक करणे.
६) राज्यांचे राज्यपाल, मुख्य निवडणूक आयुक्त व अन्य महत्त्वाच्या पदांवरील व्यक्तींची नेमणूक करणे.
७) तिन्ही सेनाध्यक्षांची नेमणूक करणे. युद्ध व शांतात प्रस्थापित करणे.
८) संकट काळात देशात आणीबाणी पुकारणे.