६. नोकरशाही स्वाध्याय इयत्ता आठवी नागरीकशास्त्र | Nokarshahi swadhyay prashn uttare iyatta 8vi

Nokarshashi swadhyay iyatta aathvi | नोकरशाही स्वाध्याय इयत्ता ८वी  इतिहास

8th std history digest pdf Maharashtra board | 8vi Nokarshashi prashn uttare | Itihas swadhyay 8th



प्रश्न १. पुढील विधाने चूक की बरोबर ते ओळखून चुकीची  विधाने दुरुस्त करून लिहा.


(१) संसदीय लोकशाहीत लोकांनी निवडून दिलेले  प्रतिनिधी आणि मंत्री यांच्यावर प्रशासनाची  जबाबदारी असते.

उत्तर:बरोबर

 

(२) केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) महाराष्ट्रातील  सनदी सेवांसाठी स्पर्धा परीक्षेद्वारे उमेदवार

उत्तर:चूक

केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) अखिल भारतीय सेवा व केंद्रीयसेवांसाठी स्पर्धा परीक्षेद्वारे उमेदवार निवडतो.


इयत्ता आठवी नागरीकशास्त्र स्वाध्याय pdf नोकरशाही प्रश्न उत्तरे इयत्ता आठवी नोकरशाही धडा सहावा स्वाध्याय नोकरशाही स्वाध्याय दाखवा




२. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.


(१) सनदी सेवांमध्येही राखीव जागांचे धोरण आहे.

उत्तर:

१) अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती, महिला, इतर मागासवर्गीयांना आणि दिव्यांग हा मोठा दुर्बल घटक आहे.

२) नोकरशाही आणि सनदी सेवांमधूनही समाजातील सर्व घटकांना संधी मिळणे आवश्यक होते.

३) सामाजिक विषमतेमुळे दुर्बल घटक सनदी सेवेतील संधींपासून वंचित राहून नयेत.

म्हणून सनदी सेवांमध्येही राखीव जागांचे धोरण तरतूद करण्यात आली आहे.

 

 

(२) सनदी सेवकांनी राजकीयदृष्ट्या तटस्थ असणे  गरजेचे आहे.

उत्तर:

१)लोकशाहीमध्ये दर पाच  वर्षांनी नवीन सरकार सत्तेत येते परंतु नोकरशाही कायम असते.

२) आधीच्या व नवीन शासनाच्या धोरणांची अंमलबजावणी नोकरशाहीने त्याच कार्यक्षमतेने व निष्ठेने करणे अपेक्षित आहे.

३) सनदी सेवकांनी राजकीय भूमिका घ्यायच्या नाहीत अथवा आपल्या राजकीय मतांनुसार काम करायचे नाही.

४)सनदी सेवकांनी राजकीय दृष्ट्या प्रेरित होऊन काम केल्यास कामकाजात अडथला निर्माण होईल म्हणून सनदी सेवकांनी राजकीयदृष्ट्या तटस्थ असणे गरजेचे असते.

 

इयत्ता आठवी नागरीकशास्त्र स्वाध्याय pdf | नोकरशाही प्रश्न 


उत्तरे| इयत्ता आठवी नोकरशाही धडा सहावा स्वाध्याय | नोकरशाही स्वाध्याय दाखवा

३. खालील प्रश्नांची २५ ते ३० शब्दांत उत्तरे लिहा.

 

(१) खात्याचा कारभार कार्यक्षमतेने चालण्यामागील मंत्री व सनदी सेवकांची भूमिका स्पष्ट करा.

उत्तर: मंत्री  व खात्याचे सनदी सेवक यांच्यातील संबंध परस्पर पूरक असल्यास त्या कोणत्याही खात्याचा कारभार कार्यक्षमतेने चालतो.

१)    खात्यासंबंधी निर्णय मंत्री घेतात, परंतु त्यांना निर्णय घेण्यासाठी आवश्यक ती सर्व माहिती सनदी सेवक देतात.

२)   सनदी सेवकांचे अर्थात नोकरशाहीचे माहितीवर पूर्ण नियंत्रण असते.

३) एखाद्या योजनेसाठी किती आर्थिक तरतूद उपलब्ध आहे हे सनदी सेवकच सांगू शकतात.

४) धोरणांच्या यशापयशाचा इतिहासही त्यांना माहीत असतो.

५)  त्यामुळे मंत्री मोठ्या प्रमाणावर सनदी सेवकांवर अवलंबून असतात.

६)मंत्र्यांनीही सनदी सेवकांशी संवाद राखल्यास व परस्परांच्या संबंधात विश्वास, पारदर्शकता असल्यास खात्याचा कारभार कार्यक्षम रीतीने होऊ शकतो.

 

(२) नोकरशाहीमुळे राज्यव्यवस्थेला स्थैर्य कसे लाभते हे स्पष्ट करा

उत्तर:

१)मंत्रिमंडळाने घेतलेले निर्णयांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याचे काम नोकरशाही करीत असते.

२) स्वातंत्र्योत्तर काळापासून नोकरशाहीने धोरणांची अंमलबजावणी प्रभावीपणे केली आहे त्यामुळे आज  चांगले सामाजिक बदल पाहायला मिळतात.

३) नोकरशाहीमुळे पाणीपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता, वाहतूक, आरोग्य, शेती सुधारणा, प्रदूषणास प्रतिबंध अशा अनेक सेवा आपल्याला सातत्याने विनाखंड मिळत असतात.

४) नोकरशाहीची समाजाच्या लोकशाहीकरणाच्या प्रक्रियेतही महत्त्वाची भूमिका असते.

अशा रीतीने नोकरशाहीमुळे राज्यव्यवस्थेला स्थैर्य लाभते.


8th std history digest pdf Maharashtra board | 8vi Nokarshashi prashn uttare Itihas swadhyay 8th



प्रश्न ४.पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.

उत्तर:

 

६. नोकरशाही स्वाध्याय इयत्ता आठवी नागरीकशास्त्र  | Nokarshahi swadhyay prashn uttare iyatta 8vi



 


प्रश्न ५. नोकरशाहीचे स्वरूप स्पष्ट करा.

उत्तर: भारतातील नोकरशाहीची रचना अतिशय व्यापक व गुंतागुंतीची आहे.

१) शासनाची धोरणे प्रत्यक्षात अंमलात आणणारी प्रशासकीय यंत्रणा म्हणजे नोकरशाही होय.

२)मंत्रीमंडळ दर पाच वर्षांनी बदलले तरीही नोकरशाहीचे अस्तित्व कायमस्वरूपी असते.

३)   नोकरशाही राजकीयदृष्ट्या तटस्थ राहून कामे पार पाडत असते.

४) खात्याच्या अकार्यक्षमतेबाबत थेट नोकरशाहीला जबाबदार न धरता, त्या खात्याच्या मंत्र्याला जबाबदार धरले अज्ते व नोकरशाहीला अनामिक ठेवले जाते.

इयत्ता आठवी विषय नागरीकशास्त्र धडा ६  प्रश्न उत्तरे | नोकरशाही प्रश्न उत्तरे | स्वाध्याय नोकरशाही ८वी नागरीकशास्त्र



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.