Rajyashasan swadhyay iyatta aathvi | राज्यशासन स्वाध्याय इयत्ता ८वी इतिहास
राज्यशासन स्वाध्याय दाखवा | इयत्ता आठवी विषय नागरीकशास्त्र धडा ५वा प्रश्न उत्तरे | राज्यशासन प्रश्न उत्तरे | स्वाध्याय राज्यशासन ८वी नागरीकशास्त्र
प्रश्न १. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा.
(१)
महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ......... येथे होते.
(अ) मुंबई
(ब) नागपूर
(क) पुणे
(ड) औरंगाबाद
उत्तर: महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे होते.
(२)
राज्यपालांची नियुक्ती ......... कडून होते.
(अ)
मुख्यमंत्री
(ब)
प्रधानमंत्री
(क)
राष्ट्रपती
(ड)
सरन्यायाधीश
उत्तर: राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपती कडून होते.
(३) राज्य
विधिमंडळाचे अधिवेशन बोलवण्याचा अधिकार ......... यांना असतो.
(अ)
मुख्यमंत्री
(ब) राज्यपाल
(क) राष्ट्रपती
(ड) सभापती
उत्तर: राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलवण्याचा अधिकार राज्यपाल यांना असतो.
प्रश्न २. तक्ता पूर्ण करा.
उत्तर:
अ.क्र. |
सभागृहे |
कार्यकाल |
सदस्य संख्या |
निवडणुकीचे स्वरूप |
प्रमुख |
१. |
विधानसभा |
५ वर्षे मुदतपूर्व निवडणुका होऊ शकतात. |
२८८ |
१)जनतेकडून निवड २) अँग्लो इंडियन समाजाच्या प्रतिनिधीची नियुक्ती
राज्यपाल करतात. ३) अनुसूचित जाती व जमातींसाठी जागा राखीव असतात. |
विधानसभेचे अध्यक्ष |
२. |
विधान परिषद |
प्रत्येक सभासदाचा कार्यकाल ६ वर्षे असतो. स्थायी
सभागृह |
७८ |
१) कला, साहित्य, विज्ञान, समाजसेवा या क्षेत्रांतील तज्ज्ञ व्यक्ती
राज्यपाल नेमतात. २)उरलेले प्रतिनिधी विधानसभा, स्थानिक शासनसंस्था, शिक्षक-मतदारसंघ, पदवीधर मतदारसंघ यांच्यातून निवडले जातात. |
सभापती |
इयत्ता आठवी नागरीकशास्त्र स्वाध्याय pdf | राज्यशासन प्रश्न उत्तरे | इयत्ता आठवी राज्यशासन धडा पाचवा स्वाध्याय
प्रश्न३. टीपा लिहा.
(१) राज्यपाल
उत्तर:
१)केंद्रीय पातळीवर राष्ट्रपती ज्याप्रमाणे नामधारी प्रमुख असतात त्याचप्रमाणे घटकराज्य पातळीवर राज्यपाल नामधारी प्रमुख असतात.
२) राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपतींकडून होते
३) त्यांची मर्जी असेपर्यंतच ते अधिकारावर राहू शकतात.
४) राज्यपालांना कायदेविषयक काही महत्त्वाचे अधिकार आहेत.
(२) मुख्यमंत्र्यांची कार्ये
उत्तर:
१) मंत्रिमंडळाची
निर्मती: बहुमत सिद्ध झाल्यानंतर कार्यक्षम असे मंत्रीमंडळ तयार करणे.
२) खातेवाटप
: मंत्रिमंडळाची निर्मिती केल्यानंतर निवडलेल्या मंत्र्यांमध्ये खातेवाटप
करणे.
३) खात्यांमध्ये
समन्वय : मुख्यमंत्र्यांना खात्यांमधील वाद दूर करून त्यांच्याकडून प्रभावी
काम करून घेणे.
४) राज्याचे
नेतृत्व : प्रधानमंत्री ज्याप्रमाणे देशाचे नेतृत्व करतात त्याप्रमाणे
मुख्यमंत्री राज्याचे नेतृत्व करतात. आपल्या राज्यातील लोकांचे हित, त्यांच्या समस्या व अडीअडचणी लक्षात घेऊन त्यानुसार नवीन धोरणांची
निर्मिती करणे.
8th std history digest pdf Maharashtra board \ 8vi Rajyshasan prashn uttare | Itihas swadhyay 8th
प्रश्न ४. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.
(१) विधानसभेच्या अध्यक्षांचे कार्य स्पष्ट करा.
उत्तर:
१) विधानसभेचे
कामकाज अध्यक्षांच्या नियंत्रण व मार्गदर्शनाखाली चालते.
२) सभागृहाचे
कामकाज शिस्तबद्ध पद्धतीने पार पडावे यासाठी कार्यक्रमपत्रिका तयार करणे.
३)बिगर संसदीय वर्तन करणाऱ्या सदस्यांना निलंबित करणे.
(२)
संविधानाने भारतासाठी संघराज्य व्यवस्था का स्वीकारली ?
उत्तर:
१) भारताचा
भौगोलिक विस्तार मोठा आहे आणि लोकसंख्येचे स्वरूपही बहुजिनसी आहे.
२) भाषा, धर्म, चालीरिती व प्रादेशिक स्वरूप यांत विविधता
आहे.
३)अशा वेळी
एकाच केंद्रीय ठिकाणावरून राज्यकारभार करणे सोईचे ठरणार नाही .
म्हणून
संविधानाने भारतासाठी संघराज्य व्यवस्था स्वीकारली.
(३) खातेवाटप
करताना मुख्यमंत्र्यांना कोणत्या बाबींचा विचार करावा लागतो ?
उत्तर: खातेवाटप करताना मुख्यमंत्र्यांना पुढील बाबींचा विचार करावा लागतो :
१) काही खाती ही महत्वाची असतात आणि काही खाती ही दुय्यम असतेत.
२) खातेवाटप करताना निवडलेल्या मंत्र्यांचा कामाचा अनुभव , कार्यक्षमता यांचा विचार करावा लागतो.
३) मंत्र्यांचा राजकीय अनुभव , प्रशासकीय कौशल्य विचारात घ्यावी लागतात.
४) मंत्र्यांना असलेली लोकमताची जाण, नेतृत्व इत्यादी बाबींचा विचार करावा लागतो.