५.सामाजिक व धार्मिक प्रबोधन स्वाध्याय इयत्ता आठवी इतिहास | Samajik v Dharmik Prabodhan swadhyay prashn uttare iyatta 8vi etihas.

सामाजिक व धार्मिक प्रबोधन स्वाध्याय दाखवा इयत्ता आठवी विषय इतिहास धडा ५वा प्रश्न उत्तरे सामाजिक व धार्मिक प्रबोधन प्रश्न उत्तरे
Admin

Samajik v Dharmik Prabodhan swadhyay iyatta aathvi | सामाजिक व धार्मिक प्रबोधन स्वाध्याय इयत्ता ८वी  इतिहास

Itihas swadhyay 8th | Samajik v Dharmik Prabodhan  Swadhyay | इयत्ता आठवी इतिहास स्वाध्याय pdf | इयत्ता आठवी इतिहास स्वाध्याय pdf | सामाजिक व धार्मिक प्रबोधन प्रश्न उत्तरे


प्रश्न १. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने  पुन्हा लिहा.

(सर सय्यद अहमद खान, स्वामी विवेकानंद, महर्षी  विठ्ठल रामजी शिंदे)


(१) रामकृष्ण मिशनची स्थापना .......... यांनी केली.

उत्तर: रामकृष्ण मिशनची स्थापना स्वामी विवेकानंद यांनी केली.


(२) मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना .......... यांनी केली.

उत्तर: मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना सर सय्यद अहमद खान यांनी केली.


(३) डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना ..........  यांनी केली.

उत्तर: डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना महर्षी  विठ्ठल रामजी शिंदे यांनी केली.

 

8th std history digest pdf Maharashtra board 8vi Samajik v Dharmik Prabodhan  prashn uttare इयत्ता आठवी सामाजिक व धार्मिक प्रबोधन धडा पाचवा स्वाध्याय


प्रश्न २. पुढील तक्ता पूर्ण करा.


समाज-सुधारकाचे

नाव

संस्था

वृत्तपत्र/

पुस्तक

संस्थेची

कार्ये

राजा राममोहन रॉय

ब्राह्मो समाज

संवादकौमुदी

१)               कर्मकांडास विरोध केला.

२)               उच्च-नीच असा भेदभाव पाळण्यास विरोध केला.

३)              सतीप्रथा, बालविवाह पद्धती यांना विरोध केला.

४)             विधवा विवाह व स्त्रियांचे शिक्षण यांना पाठींबा दिला.

स्वामी दयानंद सरस्वती

आर्यसमाज

सत्यार्थ प्रकाश

१)    स्त्री-पुरुष समानता

२)   जातीभेत पाळायचे नाहीत.

३)   वैदिक धर्मांचा प्रसार

४) ‘वेदांकडे परत चला’ हे संस्थेचे ब्रीदवाक्य होते.

महात्मा फुले

सत्यशोधक समाज

गुलामगिरी

१)    स्पृश्यास्पृश्यतेला विरोध.

२)   बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना.

३)   समतेच्या आधारावर समाजाची उभारणी करण्याचा प्रयत्न

४) अनेक ग्रंथांद्वारे समाज प्रबोधन केले.

 


सामाजिक व धार्मिक प्रबोधन स्वाध्याय दाखवा | इयत्ता आठवी विषय इतिहास धडा ५वा  प्रश्न उत्तरे
सामाजिक व धार्मिक प्रबोधनप्रश्न उत्तरे | स्वाध्याय सामाजिक व धार्मिक प्रबोधन ८वी इतिहास



प्रश्न ३. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.

 

(१) भारतात सामाजिक, धार्मिक परिवर्तनाच्या चळवळी सुरू झाल्या.

उत्तर:

१) इंग्रजी शिक्षणाच्या प्रसाराबरोबर नवे विचार, नवीन कल्पना, नवीन तत्त्वज्ञान यांचा प्रसार झाला.

२)  तसेच पाश्चिमात्य विचार, संस्कृती याची भारतीयांना ओळख झाली.

३) भारतीय समाजातील दोष व अनिष्ट प्रवृत्तींचे निर्मूलन करून मानवता, समता, बंधुता या तत्त्वांवर आधारित नवसमाज निर्माण करण्याची आवश्यकता सुशिक्षित वर्गाला वाटत होती.

४) अंधश्रद्‍धा, रूढिप्रियता, जातिभेद, उच्च-नीचतेच्या भ्रामक कल्पना, चौकस व चिकित्सक वृत्तीचा अभाव यांत आहे, याची जाणीव सुशिक्षित समाजाला होऊ लागली. या जाणिवेतूनच धार्मिक परिवर्तनाच्या चळवळी सुरु झाल्या.

 

(२) महात्मा फुले यांनी नाभिकांचा संप घडवून  आणला.

उत्तर:

१) समाजनिर्मिती ही समतेच्या तत्वावर आधारित झाली पाहिजे, असा महात्मा फुले यांचा आग्रह होता.

२)   त्यांनी स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला.

३)   स्त्रियांवर अन्याय करणाऱ्या रूढी परंपरा यांना त्यांनी जोरदार विरोध केला.

४)  केशवपनासारख्या क्रूर चालीला विरोध करण्यासाठी महात्मा जोतीराव फुले यांनी नाभिकांचा संप घडवून आणला.

 


8th std history digest pdf Maharashtra board | 8vi Samajik v Dharmik Prabodhan  prashn uttare | इयत्ता आठवी सामाजिक व धार्मिक प्रबोधन धडा पाचवा स्वाध्याय

प्रश्न ४. टीपा लिहा.

 

(१) रामकृष्ण मिशन

उत्तर:

१) रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य स्वामी विवेकानंद यांनी इ.स.१८९७ मध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना केली.

२)   रामकृष्ण मिशनने लोकसेवेची कार्ये केली.

३)   दुष्काळग्रस्तांना मदत, रोगी, दीनदुबळ्यांना औषधोपचार, स्त्रीशिक्षण, आध्यात्मिक उन्नती या क्षेत्रांत मिशनने कार्य केले व आजही करत आहे.

४) हिंदू धर्माची शिकवण देणे आणि समाजप्रबोधन करणे या उद्देशाने रामकृष्ण मिशनची स्थापना झाली.

 

(२) सावित्रीबाई फुले यांच्या स्त्रीविषयक सुधारणा

उत्तर:

१) सावित्रीबाईफुले यांनी महात्मा फुले यांच्या बरोबरीने स्त्रीविषयक सुधारणेचे कार्य केले.

२)   महात्मा फुले यांनी सुरु केलेल्या मुलींच्या पहिल्या शाळेत सावित्रीबाईंनी शिक्षणाचे कार्य केले.

३) समाजातील कर्मठ लोकांच्या टीकेला, निंदा, नालस्तीला तोंड देऊन ज्ञानदानाचे कार्य केले.

४) महात्मा फुले यांनी स्वतःच्या घरात बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केले या कार्यात सावित्रीबाईंनी त्यांची साथ दिली.

५)  स्त्रियांचे प्रबोधन करून त्यांना वाईट रूढी विरोधात संघर्ष करण्यास प्रवृत्त केले.


 

Post a Comment

प्रिय मित्रांनो आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडल्यास, उपयोगी पडल्यास आम्हाला नक्की comment करून सांगा. धन्यवाद.