१.संसदीय शासन पद्धतीची ओळख स्वाध्याय इयत्ता आठवी | Sansadiy Shasan Padhatichi Olakh swadhyay prashn uttare iyatta 8vi

Sansadiy Shasan Padhatichi Olakh swadhyay iyatta aathvi | संसदीय शासन पद्धतीची ओळखस्वाध्याय इयत्ता ८वी  इतिहास

इयत्ता आठवी नागरिकशास्त्र  स्वाध्याय pdf | संसदीय शासन पद्धतीची ओळख प्रश्न उत्तरे | इयत्ता आठवी संसदीय शासन पद्धतीची ओळख धडा पहिला स्वाध्याय | संसदीय शासन पद्धतीची ओळख स्वाध्याय दाखवा





प्रश्न १. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा.


(१) संसदीय शासन पद्धती ......... येथे विकसित  झाली.

(अ) इंग्लंड

(ब) फ्रान्स

(क) अमेरिका

(ड) नेपाळ

उत्तर: संसदीय शासन पद्धती इंग्लंड येथे विकसित  झाली.

 

8th std history digest pdf Maharashtra board 8vi Sansadiy Shasan Padhatichi Olakh prashn uttare Nagarikshastra swadhyay 8th इयत्ता आठवी नागरिकशास्त्र  स्वाध्याय pdf संसदीय शासन पद्धतीची ओळख प्रश्न उत्तरे इयत्ता आठवी संसदीय शासन पद्धतीची ओळख धडा पहिला स्वाध्याय

 

(२) अध्यक्षीय शासन पद्धतीत ......... हे कार्यकारी प्रमुख असतात.

(अ) प्रधानमंत्री

(ब) लोकसभा अध्यक्ष

(क) राष्ट्राध्यक्ष

(ड) राज्यपाल

उत्तर: अध्यक्षीय शासन पद्धतीत राष्ट्राध्यक्ष हे कार्यकारी प्रमुख असतात.

 

8th std history digest pdf Maharashtra board | 8vi Sansadiy Shasan Padhatichi Olakh prashn uttare | Nagarikshastra swadhyay 8th | इयत्ता आठवी नागरिकशास्त्र  स्वाध्याय pdf



प्रश्न२. खालील तक्त्यातील माहिती पूर्ण करा.


अ.

क्र

मंडळाचे नाव

कार्ये

१.

कायदेमंडळ

कायद्यांची निर्मिती करणे.

२.

कार्यकारी मंडळ

१)कायद्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणे.

राज्यकारभाराविशयीची धोरणे ठरवणे.

३.

न्यायमंडळ

न्यायदान करणे.

 

 



प्रश्न ३. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.


(१) भारताने संसदीय शासनपद्धतीचा स्वीकार केला.

उत्तर: भारताने संसदीय शासनपद्धतीचा स्वीकार केला कारण:

१) ब्रिटीश राजवतीच्या काळात भारतात संसदीय संस्थांची निर्मिती झाली होती. ब्रिटिशांनी या पद्धतीने राज्यकारभार करण्यास सुरुवात केली होती.

२)   संसदीय शासन पद्धतीचा भारतीयांना परिचय झाला होता.

३)   संविधान सभेत या पद्धतीवर पूर्ण चर्चा होऊन त्यावर निर्णय घेण्यात आला.

            यामुळे भारतीय संविधानकर्त्यांनी भारताला अनुकूल ठरेल असा बदल करून संसदीय शासनपद्धतीचा स्वीकार केला.

 

(२) संसदीय शासनपद्धतीत चर्चा व विचारविनिमय महत्त्वाचे असते.

उत्तर: संसदीय शासनपद्धतीत चर्चा व विचारविनिमय महत्त्वाचे असते कारण,

१) संसदीय शासनपद्धतीत चर्चा, विचारविनिमय करून अंतिम निर्णय घेतले जातात.

२) या चर्चेत विरोधी पक्षांचे सभासदही भाग घेतात आणि ते शासनाच्या धोरणातील त्रुटी दाखवून देऊ शकतात.

४) सार्वजनिक हिताच्या प्रश्नांवर संसदेत चर्चा होते आणि मगच कायदेनिर्मिती होते.

५) संसदेला अधिक निर्दोष कायदे तयार करण्यासाठी चर्चा व विचारविनिमय होणे महत्वाचे असते.

 

 

 



 

प्रश्न ४. खालील प्रश्नांची २५ ते ३० शब्दांत उत्तरे लिहा.

 

(१) जबाबदार शासनपद्धती म्हणजे काय ?

उत्तर:

१) प्रधानमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ आपल्या सर्व कृती आणि धोरणांसाठी पुन्हा कायदेमंडळालाच जबाबदार असतात अशा पद्धतीला जबाबदार शासनपद्धती असे म्हणतात.

२)या पद्धतीत कायदेमंडळाला विश्वासात घेऊनच मंत्रिमंडळाला राज्यकारभार करावा लागतो.

३) एखाद्या खात्याचा निर्णय हा राज्याचा निर्णय मानला जातो. या निर्णयाची जबाबदारी संपूर्ण मंत्रिमंडळाची असते.

४) सामूहिक जबाबदारी हे संसदीय शासन पद्धतीचे आणखी एक खास वैशिष्ट्य आहे.

        मंत्रीमंडळाच्या या सामुहिक जबाबदारीच्या पद्धतीलाच जबाबदार शासनपद्धती असे म्हणतात.

 

 

(२) अध्यक्षीय शासनपद्धतीची वैशिष्ट्ये स्पष्ट करा.

उत्तर: अध्यक्षीय शासनपद्धतीची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत:

१) ज्या पद्धतीत कार्यकारी प्रमुख (राष्ट्राध्यक्ष) थेट जनतेकडून निवडला जातो, ती पद्धत म्हणजे अध्यक्षीय शासनपद्धती होय.

२)अध्यक्षीय शासनपद्धतीत कायदेमंडळ व कार्यकारी मंडळ थेटपणे परस्परांवर अवलंबून नसतात. तरीही त्यांच्यात परस्परांवर नियंत्रण असते.

३)   राष्ट्राध्यक्ष कार्यकारी प्रमुख असतात व त्यांच्या हाती कायद्यांच्या अंमलबजावणीसह अन्य अनेक अधिकार असतात.

 



संसदीय शासन पद्धतीची ओळख स्वाध्याय दाखवा | इयत्ता आठवी विषय नागरिकशास्त्र   धडा पहिला प्रश्न उत्तरे
संसदीय शासन पद्धतीची ओळख प्रश्न उत्तरे | स्वाध्याय संसदीय शासन पद्धतीची ओळख ८वी नागरिकशास्त्र 

प्रश्न ५. विरोधी पक्षांची भूमिका महत्त्वपूर्ण का असते?  याबाबत तुमचे मत लिहा

उत्तर:संसदीय व अध्यक्षीय शासनपद्धतींमध्ये विरोधी पक्षांची भूमिका महत्वाची असते.

१) सार्वजनिक हिताच्या प्रश्नांवर संसदेत चर्चा होताना, या चर्चेत विरोधी पक्षांचे सभासदही भाग घेतात.

२) योग्य ठिकाणी शासनाला सहकार्य करणे, धोरणातल्या किंवा कायद्यातील त्रुटी दाखवून देणे, प्रश्नांची अभ्यासपूर्ण मांडणी करणे इत्यादी बाबी विरोधी पक्ष करू शकतात.

३)   विरोधी पक्षांच्या दबावामुळे मंत्रीमंडळ मनमानी कारभार करू शकत नाही.

४) विरोधी पक्षांमुळे अधिक निर्दोष कायदे करणे शक्य होते.

            म्हणून शासनपद्धतींमध्ये विरोधी पक्षांची भूमिका महत्वपूर्ण असते. 




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.