६.स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ स्वाध्याय इयत्ता आठवी इतिहास | Swatantry Chalvalichy Yugas Prarambh swadhyay prashn uttare iyatta 8vi etihas.

Swatantry Chalvalichy Yugas Prarambh swadhyay iyatta aathvi | स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ स्वाध्याय इयत्ता ८वी  इतिहास

इयत्ता आठवी इतिहास स्वाध्याय pdf | स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ प्रश्न उत्तरे |इयत्ता आठवी स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ धडा ६वा  स्वाध्याय | स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ स्वाध्याय दाखवा


प्रश्न १. (अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने  पुन्हा लिहा.

 

(१) भारत सेवक समाजाची स्थापना .......... यांनी  केली.

(अ) गणेश वासुदेव जोशी

(ब) भाऊ दाजी लाड

(क) म.गो.रानडे

(ड) गोपाळ कृष्ण गोखले

उत्तर: भारत सेवक समाजाची स्थापना गोपाळ कृष्ण गोखले यांनी  केली.

 

इयत्ता आठवी स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ धडा ६वा  स्वाध्याय स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ स्वाध्याय दाखवा इयत्ता आठवी विषय इतिहास धडा सहावा  प्रश्न उत्तरे स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ प्रश्न उत्तरे स्वाध्याय स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ८वी इतिहास

(२) राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन .......... येथे  भरवण्यात आले.

(अ) पुणे

(ब) मुंबई

(क) कोलकाता

(ड) लखनौ

उत्तर: राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन मुंबई येथे  भरवण्यात आले.

 

(३) गीतारहस्य हा ग्रंथ .......... यांनी लिहिला.

(अ) लोकमान्य टिळक

(ब) दादाभाई नौरोजी

(क) लाला लजपतराय

(ड) बिपीनचंद्र पाल

उत्तर: गीतारहस्य हा ग्रंथ लोकमान्य टिळक यांनी लिहिला.

 


प्रश्न (ब) नावे लिहा.

 

(१) मवाळ नेते

उत्तर:

१) गोपाळ कृष्ण गोखले

२) फिरोजशहा मेहता

 

(२) जहाल नेते

उत्तर:

१) लोकमान्य टिळक

२) लाला लजपतराय

 


स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ स्वाध्याय दाखवा | इयत्ता आठवी विषय इतिहास धडा सहावा  प्रश्न उत्तरे
स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ प्रश्न उत्तरे | स्वाध्याय स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ८वी इतिहास

प्रश्न २. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.

 

(१) स्वातंत्र्यलढ्यात भारतीयांची अस्मिता जागृत  झाली

उत्तर:

१)पाश्चात्त्य शिक्षणाच्या  प्रसारामुळे न्याय, स्वातंत्र्य, समता, लोकशाही अशा नव्या कल्पनांची भारतीयांना ओळख झाली.

२)एशियाटिक सोसायटी’ च्या स्थापनेमुळे अनेक भारतीय व पाश्चिमात्त्य विद्वानांनी भारतीय संस्कृतीचा अभ्यास सुरू केला.

३) संस्कृत, फारसी आणि अन्य भारतीय भाषांमधील हस्तलिखिते तपासून त्यावरील संशोधने प्रसिद्‍ध केली.

४) भारतीय विद्‍वानांनी प्राचीन भारतीय संस्कृतीचा सखोल अभ्यास केल्यानंतर आपल्याला प्राचीन समृद्‍ध वारसा लाभला आहे हे समजल्याने भारतीयांची अस्मिता जागृत झाली.

 

 (२) भारतीय राष्ट्रीय सभेत दोन गट तयार झाले.

उत्तर:

१) राष्ट्रीय सभेच्या स्‍थापनेनंतरच्या सुरुवातीच्या दशकात त्यांचे कार्य संथपणे पण सातत्याने सुरू होते. त्यांचा सनदशीर मार्गावर विश्वास होता.

२) स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सरकारविरुद्ध संघर्ष अधिक तीव्र केला पाहिजे, असे काही नेत्यांना वाटू लागले.

३) राष्ट्रीय सभेची उद्‌दिष्टे व सनदशीर मार्गांनी चळवळ पुढे नेण्यावर त्यांचे एकमत असले तरीही कार्यपद्‍धतीबाबत त्यांच्यात मतभेद होते.

४) हे मतभेद तात्त्विक स्वरूपाचे होते. राजकीय चळवळीतील या मतभेदांवरून मवाळ गट आणि जहाल गट असे दोन प्रमुख राजकीय गट तयार झाले.

 

(३) लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी करायचे ठरवले.

उत्तर:

१) हिंदू-मुस्लिमांत फूट पाडून स्वतंत्रता चळवळ दुर्बल करणे हा इंग्रजांचा मुख्य हेतू होता.

२) हिंदू-मुस्लीम समाजात दुहीचे बीज पेरून ‘फोडा आणि राज्य करा’ या नीतीचा वापर करून इंग्रज सत्ता अधिक मजबूत करण्याचे लॉर्ड कर्झन याने ठरवले.

३) बंगाल हा एक मोठा प्रांत होता. या प्रांताचा कारभार करणे प्रशासकीयदृष्ट्या अवघड असल्याचे कारण पुढे करून लॉर्ड कर्झन याने १९०५ मध्ये बंगाल प्रांताची फाळणी जाहीर केली.

 

 


8th std history digest pdf Maharashtra board | 8vi Swatantry Chalvalichy Yugas Prarambh prashn uttare
Itihas swadhyay 8th | Swatantry Chalvalichy Yugas Prarambh Swadhyay

प्रश्न ३. टीपा लिहा.


(१) राष्ट्रीय सभेची उद्‌दिष्टे

उत्तर:

१) भारताच्या निरनिराळ्या भागांतील लोकांना धर्म, वंश, जात, भाषा, भौगोलिक प्रदेश असे भेद विसरून एका व्यासपीठावर आणणे.

२)  परस्परांच्या समस्या जाणून घेऊन विचारविमर्श करणे.

३)    लोकांमध्ये ऐक्यभावना वृद्‌धिंगत करणे.

४) राष्ट्राच्या उन्नतीसाठी प्रयत्न करणे.

            ही राष्ट्रीय सभेची उद्‌दिष्टे होती.

 

(२) वंगभंग चळवळ

उत्तर:

१) लॉर्ड कर्झन याने १९०५ मध्ये बंगाल प्रांताची फाळणी जाहीर केली या फाळणी विरोधात जनमत जागृत झाले.

२) १६ ऑक्टोबर हा फाळणीचा दिवस राष्ट्रीय शोकदिन म्हणून पाळण्यात आला. भारतभर निषेधसभांद्‍वारे सरकारचा निषेध केला गेला.

३)  ‘वंदे मातरम्’ हे गीत सर्वत्र गायले जाऊ लागले. ऐक्याचे प्रतीक म्हणून रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेण्यात आला.

४) सरकारी शाळा, महाविद्यालयांवर बहिष्कार टाकून मोठ्या संख्येने विद्यार्थी या चळवळीत सामील झाले.

५)  चतुः सूत्री कार्यक्रमाधरीत सुरु झालेली ही  एक राष्ट्रीय चळवळ बनली.

६)   असंतोषाची तीव्रता पाहून १९११ साली ब्रिटिशांनी बंगालची फाळणी रद्‍द केली.


(३) राष्ट्रीय सभेची चतुःसूत्री

उत्तर: १९०६ साली झालेल्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशानामध्ये चतुः सूत्री कार्यक्रमाचा स्वीकार केला गेला. ही चतुः सूत्री पुढील प्रमाणे होती.

१) स्वदेशी : स्वदेशीच्या मार्गाने जाण्यासाठी आपल्या देशातील साधनसामग्री आणि भांडवल , मनुष्यबळ यांचा वापर करून आपले उद्योग वाढवायचे.  स्वयंपूर्ण व स्वावलंबी होऊन देशाचे हित साधायचे हा स्वदेशीचा अर्थ आहे.

२) बहिष्कार : परदेशी वस्तू व मालावर बहिष्कारामुळे ब्रिटिश साम्राज्याच्या मुळावरच घाव घातला जाईल.

३) स्वराज्य : देशाला स्वातंत्र्य मिळवून देणे हे अंतिम उद्दिष्ट असेल.

४) राष्ट्रीय शिक्षण : ज्या शिक्षणातून जनतेत राष्ट्राभिमान जागृत होईल, असे शिक्षण द्यायचे त्यासाठी भारतीयांनी राष्ट्रीय शाळांची स्थापना करायची.

            असा चतुःसूत्री कार्यक्रम होता.

 


Itihas swadhyay 8th | Swatantry Chalvalichy Yugas Prarambh Swadhyay | इयत्ता आठवी इतिहास स्वाध्याय pdf | स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ प्रश्न उत्तरे

प्रश्न ४. भारतीय राष्ट्रीय सभेच्या स्थापनेची पार्श्वभूमी पुढील  मुद्‌द्यांच्या आधारे स्पष्ट करा.

प्रशासकीय केंद्रीकरण

• आर्थिक शोषण

• पाश्चात्त्य शिक्षण

• भारताच्या प्राचीन इतिहासाचा अभ्यास

• वृत्तपत्रांचे कार्य

उत्तर: भारतीय राष्ट्रीय सभेच्या स्थापनेची पार्श्वभूमी पुढीलप्रमाणे :

१) प्रशासकीय केंद्रीकरण : ब्रिटिश प्रशासनामुळे भारतात खऱ्या अर्थाने एकछत्री अंमल सुरू झाला. देशभर समान धोरणे, कायद्यासमोर सर्वांना समान दर्जा यामुळे लोकांमध्ये एकराष्ट्रीयत्वाची भावना विकसित झाली.

२) आर्थिक शोषण : इंग्लंडच्या साम्राज्यवादी धोरणामुळे भारताचे आर्थिक शोषण होऊ लागले. पारंपरिक उदयोगधंद्यांचा ऱ्हास झाल्याने बेकारी वाढली. यामुळे लोकांच्या मनात असंतोष खदखदत होता.

३)पाश्चात्त्य शिक्षण: पाश्चात्त्य शिक्षणाच्या प्रसारामुळे न्याय, स्वातंत्र्य, समता, लोकशाही अशा नव्या कल्पनांची भारतीयांना ओळख झाली. बुद्‌धिनिष्ठा, विज्ञाननिष्ठा, मानवता, राष्ट्रवाद अशी मूल्ये भारतीयांनी आत्मसात केली. त्यामुळे आपल्या देशाचा कारभार करण्यासाठी आपण सक्षम असून या मूल्यांच्या आधारावर आपल्या देशाची उन्नती साधावी अशी भावना रुजू लागली.

४) भारताच्या प्राचीन इतिहासाचा अभ्यास : भारतीय विद्‍वानांनी प्राचीन भारतीय संस्कृतीचा सखोल अभ्यास केल्यानंतर आपल्याला प्राचीन समृद्‍ध वारसा लाभला आहे हे समजल्याने भारतीयांची अस्मिता जागृत झाली.

५)वृत्तपत्रांचे कार्य: याच काळात इंग्रजी व प्रादेशिक भाषांमधून वृत्तपत्रे व नियतकालिके प्रसिद्‍ध होऊ लागली. या वृत्तपत्रांमधून राजकीय व सामाजिक जागृती होऊ लागली. अशा वृत्तपत्रांतून सरकारच्या धोरणावर टीका होऊ लागली.


 



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.