Salam Namaste swadhyay iyatta satavi marathi | इयत्ता सातवी विषय मराठी सलाम-नमस्ते स्वाध्याय प्रश्न उत्तरे
प्र. १. खालील वाक्यांमधून पाठातील त्या त्या व्यक्तीचा दिसणारा गुण लिहा.
(अ) लेखिका झोपडपट्टीतील शाळकरी मुलांमध्ये वह्या वाटत.
उत्तर: परोपकार
(आ) ‘माझ्यापेक्षा त्यांनाच याची गोडी जास्त.’
उत्तर: मायाळू
(इ) ‘‘मॅडम, माझ्यापेक्षा गरीब लोकांना तुमच्या
मदतीची जास्त गरज आहे.’’
उत्तर: सहानुभूती
(ई) ‘‘मॅडम, तुम्हांला सलाम करण्याची झुबेदाची इच्छा
होती.’’
उत्तर: कृतज्ञता
(उ) त्या अनाथ मुलीकडे बघून मला वाईट वाटलं.
उत्तर: सहसंवेदना
प्र. २. स्वभाववैशिष्ट्ये लिहा.
झुभेदाराचा
भाऊ – शेख महंमद यांची स्वभाववैशिष्ट्ये
उत्तर:
१)प्रामाणिकपणा
२) माणुसकी
३)कष्टाळू
वृत्ती
४) दुःखाविषयी
तळमळ
प्र. ३. शेख
महंमदमार्फत झुबेदाने उरलेले पैसे लेखिकेला परत केले, ही घटना तुम्हांला काय शिकवते?
उत्तर:
खर्च भागवल्यावर उरलेले पैसे प्रामाणिकपणे
परत द्यायला हवेत. तसेच ज्या हेतूसाठी पैसे कर्जावू घेतले, तो हेतू सफल व्हायला
हवा. उसने घेतलेल्या पैशांबद्दल नेहमी कृतज्ञ असायला हवे. ही शिकवण झुबेदाराच्या
कृत्यातून मिळते.
प्र. ४. लेखिकेची तबस्सुमविषयीची भावना तुमच्या शब्दांत सांगा.
उत्तर:
लेखिकेच्या मते तबस्सुम ही गोड मुलगी
होती. तिची आई वारल्यामुळे ती पोरकी होती. ऑफिसमध्ये ती बावरली होती. लेखिकांना
तिच्याकडे पाहून वाईट वाटले. तिच्या नशिबी पुढे काय असेल, याची तिला कल्पना
नव्हती, म्हणून लेखिका चिंतित झाल्या.
खेळूया
शब्दांशी
खालील इंग्रजी शब्दांसाठी वापरले जाणारे मराठी भाषेतील शब्द लिहा.
(१) ऑफिस- कार्यालय
(२) चेक-
धनादेश
(३)
हॉस्पिटल- दवाखाना
(४) ॲडव्हान्स-
आगाऊ रक्कम
(५) ऑपरेशन-
शस्त्रक्रिया
(६) कॅन्सर-
कर्करोग
विचार करा.
सांगा.
या पाठातील कोणत्या व्यक्तिरेखा तुम्हांला आवडल्या व त्या का आवडल्या याबद्दल तुमचे मत सांगा.
उत्तर:
या पाठातील शेख महंमद ही व्यक्तिरेखा मला
खूप आवडली; कारण शेख महंमद हा खूप कष्टाळू आणि प्रामाणिक आहे. संकोची असलेला शेख
लेखिकेविषयी कृतज्ञ आहे.
या पाठातील दुसरी व्यक्तिरेखा मला
लेखिकेची आवडली कारण; त्या सेवाभावी संस्थेमध्ये काम करतात व त्यांचे हृदय सहानुभूतीने
भरलेले आहे. लोकांच्या अडीअडचणीमध्ये त्या मदत करतात.
या पाठातून मिळणारा संदेश तुमच्या शब्दांत सांगा.
उत्तर:
या पाठातून पुढील संदेश मिळतो, नेहमी
सत्याच्या मार्गाने चालावे, लोकांचे दुखः कमी करण्यासाठी आपापल्या परीने प्रयत्न
करावा. गरजू लोकांना यथाशक्ती मदत करावी. सहानुभूती व सहसंवेदना मनामध्ये जागृत
असावी. आपल्याला जमेल तशी समाजसेवा करावी.
माहिती
मिळवूया
खालील चित्रे पाहून आपल्या भावना व्यक्त करणारी वाक्ये लिहा.
उत्तर:
मोर हा
राष्ट्रीय पक्षी आहे. त्याचा पिसारा किती सुंदर सातो! मला मोराचा नाच पाहायचा आहे.
फुटबॉल हा
माझा आवडता खेळ आहे. मोकळ्या मैदानात हा खेळ खेळताना छान व्यायाम होतो.
खालील वाक्यांत योग्य केवलप्रयोगी अव्यये लिहा.
(अ) .............. काय सुंदर आहे ताजमहाल!
उत्तर: अहाहा!
काय सुंदर आहे ताजमहाल
(आ) .......... किती जोरात ठेच लागली!
उत्तर: आई ग
! किती जोरात ठेच लागली!
(इ) .............. किती उंच आहे ही इमारत !
उत्तर: अबब !
किती उंच आहे ही इमारत !