14. कवितेची ओळख स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता सातवी मराठी | Kavitechi Olakh swadhyay prashn uttare iyatta satavi marathi

Kavitechi Olakh swadhyay iyatta satavi marathi | इयत्ता सातवी विषय मराठी कवितेची ओळख  स्वाध्याय प्रश्न उत्तरे कवितेची ओळख  स्वाध्याय ७वी मराठी
Admin

Kavitechi Olakh swadhyay iyatta satavi marathi | इयत्ता सातवी विषय मराठी कवितेची ओळख स्वाध्याय प्रश्न उत्तरे


प्र. १. खालील चौकटी पूर्ण करा.

 

(अ) आजीने काव्यप्रतिभा वाढवण्याचा सांगितलेला अर्थ.

उत्तर: कविता करण्याची व समजून घेण्याची आकलनशक्ती वाढवणे म्हणजे काव्यप्रतिभा.


(आ) सुधीरची काव्यप्रतिभा वाढवण्यासाठी कुटुंबाने केलेली मदत.

उत्तर: सगळे कवितेत संवाद करू लागले.


(इ) बाबांनी सुधीरला कवितांची पुस्तके आणून देण्याचे कारण.

उत्तर: सुधीरला कवितांचा लळा लागावा म्हणून.


(ई) कुटुंबातील सदस्यांनी सुधीरचे अभिनंदन करण्याचे कारण.

उत्तर: सुधीरला काव्यप्रतिभा म्हणजे काय हे कळले म्हणून.

 

Kavitechi Olakh swadhyay iyatta satavi marathi | इयत्ता सातवी विषय मराठी कवितेची ओळख  स्वाध्याय प्रश्न उत्तरे

प्र. २. पाठातील ‘कवितेतून बोलण्याची गंमत’ तुमच्या शब्दांत मांडा.

उत्तर:

सुधीरला काव्यप्रतिभा कळावी, म्हणून कुटुंबातील सगळेच सदस्य यमक जुळवून कवितेतून बोलू लागतात तेव्हा गंमत येते. उदाहरणार्थ, आजी ‘सांज वात आणि कांद्याची पात’ असे यमक जुळवते; तर आजोबा त्यावर ‘म्हाताऱ्याचा याढतो वात’ अशी शब्दरचना जुळवतात, तेव्हा गंमत येते. बाबांच्या अनुभात ऑफिस व बॉस असल्यामुळे ते ‘ऑफिसला जाण्याची घाई बॉंस करू देणार नाही सही’ अशी शब्दकसरत करतात. तर आई ‘ काय बाई कवितेव्ही कमाल हसतात तोंडावर धरून रुमाल’ असे यमक जुळवते. ताईला जेव्हा कवितेतून बोलायचे आहे हे कळते, तेव्हा तिच्या या पंक्तीतून भावाबद्दलचा विश्वास व ‘कवितेत मारेल तो बाजी, आई, आहे का घरात पिठाची सोजी, प्रेम व्यक्त करते. अशा प्रकारे सार्वजन कवितेतून बोलण्याची धमाल उडवून देतात.

 

प्र. ३. या पाठातील आशयाच्या आधारे तुमच्या शब्दांत एक छानशी कथा तयार करून लिहा.

उत्तर:

         एक छोटसं एकत्र कुटुंब होत. त्या कुटुंबामध्ये आजी, आजोबा, बाबा, आई, सुधीर व ताई असे घटक असतात. शाळेत सुधीरला बाईंनी काव्यप्रतिभा या विषयवरचा प्रकल्प तयार करण्यासाठी सांगितलेला असतो. सुधीरला या विषयाबाबत काहीच कल्पना नसते. सर्वांनी कवितेत समजावून सांगितले तर त्याला काही कळेल असे आजोबा सांगतात. त्या रात्री सार्वजन गद्य वाक्यात यमक जुळवून पाड्यात बोलतात. बाबा रात्रपाळीच्या ड्युटीवर जातात. दुसऱ्या दिवशी ते सकाळी श्रेष्ठ कवींच्या कवितांची पुस्तके सुधीरला देतात. ती वाचून सुधीरच्या भावना उचंबळून येतात. कविता म्हणजे काय याचा खरा अर्थ त्याला कळतो. केवळ यमक जुळवणे म्हणजे कविता नव्हे. कवितेने भावना उचंबळून आल्या पाहिजेत आणि आपल्या मनात भावनांचे हिरवे हिरवे गार गालिचे पसरलेले पाहिजेत.

 

प्र. ४. ‘आम्ही चित्र काढतो’ या विषयावर तुम्ही व तुमचे वर्गमित्र यांच्यातील संवाद कवितेच्या माध्यमातून सादर करा.

उत्तर:

राज  : हा बघ मी आणला कुंचला

           आहे की नाही तो चांगला?

श्वेता : हे पहा मी रंग आणले

          लाल, पिवळे नि निळे-जांभळे

वेदांत : मी आणला भला मोठा कागद

           श्वेता त्यावर आपण रंग चढवू आता गडद

मधुर : पण आपण कशाचे काढायचे चित्र ?

         माधवने काढले तर होईल विचित्र !

 

प्र. ५. पाठातील कोणता काव्यसंवाद तुम्हांला सर्वाधिक आवडला, ते सकारण सांगा.

उत्तर:

                आजोबा म्हणतात ; तू बनव भाजी छान चवळी, आण रे इकडे दातांची कवळी’ यावर आजी म्हणते- ‘तुमची इच्छा हाच ध्यास, भाजी बनवते चवळीची खास’ हा काव्यसंवाद मला सर्वाधिक आवडला. कारण, या संवादातून आजी –आजोबा यांचे गोड स्नेहबंध दिसून येतो. आजोबांचा मिश्कीलपणा ‘चवळी-कवळी या यमकांतून प्रकट होतो. आजीच्या अनुभवातली चवळीची भाजी व आजोबांची दातांची कवळी, यांचा मजेदार व विनोदी संगम येथे दृष्टीस पडतो. म्हणून हा काव्यसंवाद खास व गमतीशीर आहे.


 कवितेची ओळख स्वाध्याय ७वी मराठी  | ७ standard Kavitechi Olakh swadhyay Marathi


प्र. ६. खालील आकृती पूर्ण करा.


पाठात आलेल्या साहित्यिकांची नावे.

उत्तर:

१)    शांताबाई शेळके.

२)   नारायण सुर्वे

३)   ग.दि.माडगुळकर

४) बालकवी

 

खेळूया शब्दांशी

 

खालील वाक्प्रचारांचा अर्थ चौकटीतून शोधून लिहा.

(बंधनातून मुक्त होणे, नकार देणे, हट्ट करणे, भावना जागृत करणे.)


(अ) खो देणे.

उत्तर: नकार देणे


(आ) पाश सोडणे.

उत्तर: बंधनातून मुक्त होणे


(इ) हेका धरणे.

उत्तर: हट्ट करणे


(ई) भावनांचे मोहोळ चेतवणे.

उत्तर: भावना जागृत करणे

 

(अ) खालील कंसात काही म्हणी दिलेल्या आहेत. दिलेल्या वाक्यांशी संबंधित म्हण ओळखा व लिहा.

(अति तिथे माती, आगीतून उठून फुपाट्यात पडणे, पळसाला पाने तीनच, नावडतीचे मीठ अळणी, थेंबेथेंबे तळे साचे, कामापुरता मामा, गर्वाचे घर खाली)

 

(अ) फुशारकी मारणाऱ्याचा पराजय होतो.

उत्तर: गर्वाचे घर खाली

 

(आ) एखाद्याकडून काम करून घेताना गोड बोलायचे आणि काम झाले, की त्याला सोडून द्यायचे.

उत्तर: कामापुरता मामा

 

(इ) सर्वत्र परिस्थिती समान असणे.

उत्तर: पळसाला पाने तीनच

 

(ई) थोडे थोडे जमवून मोठा संचय करणे.

उत्तर: थेंबेथेंबे तळे साचे

 

(उ) एका संकटातून बचावणे व दुसऱ्या संकटात सापडणे.

उत्तर: आगीतून उठून फुपाट्यात पडणे

 

(ऊ) कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो.

उत्तर: अति तिथे माती

 

(ए) न आवडणाऱ्या माणसाने कितीही चांगली गोष्ट केली, तरी ती पसंत पडत नाही.

 उत्तर: नावडतीचे मीठ अळणी

 

(आ) खाली काही वाक्ये दिली आहेत. त्यामध्ये एकच शब्द वेगवेगळ्या अर्थाने वापरला आहे. खालील वाक्ये वाचा त्यातील ठळकपणे दाखवलेल्या शब्दांचे अर्थ समजून घ्या. तुम्हीही याप्रमाणे वाक्ये तयार करण्याचा प्रयत्न करा.

 

(१) आमचे मराठीचे सर इतके छान शिकवायचे, की अन्य शिक्षकांना त्यांची सर येत नसे.

(२) सकाळचा चहा मला कपात काठोकाठ भरलेला लागतो. त्यात कपात केलेली मला चालत नाही.

(३) एकदा एका शिक्षकांचा मला दूरध्वनी आला. दूरध्वनीवर ते मला म्हणाले, ‘‘सर, आपण आमच्या शाळेला भेट द्या.’’ मी त्यांना विचारले, ‘‘काय भेट देऊ?’’ ते शिक्षक म्हणाले, ‘‘ते शाळेला भेट दिल्यानंतर ठरवा.’’

 

उत्तर:

रमा देवाकडे कर जोडून प्रार्थना कर .

 

आपण समजून घेऊया


(१) विधानार्थी वाक्य

 ही वाक्येवाचा.

(अ) माझे घर दवाखान्याजवळ आहे.

(आ) तो रोज व्यायाम करत नाही.

 या प्रकारच्या वाक्यांत केवळ विधान केलेले

असते.

 

(२) प्रश्नार्थी वाक्य

 ही वाक्येवाचा.

(अ) तुला लाडू आवडतो का?

(आ) तुम्ही सकाळी कधी उठता?

 या प्रकारच्या वाक्यांत प्रश्न विचारलेला असतो.

 

(३) उद्गारार्थी वाक्य

 ही वाक्येवाचा.

(अ) अरेरे ! फार वाईट झाले.

(आ) शाबास ! चांगले काम केलेस.

 या प्रकारच्या वाक्यांत भावनेचा उद्गार

 काढलेला असतो.

 

(४) आज्ञार्थी वाक्य

ही वाक्येवाचा.

(अ) मुलांनो, रांगेत चला.

(आ) उत्तम आरोग्यासाठी व्यायाम करा.

या प्रकारच्या वाक्यांत आज्ञा किंवा आदेश असतो.


  •  वर दिलेल्या चारही प्रकारांतील वाक्यांचे नमुने तयार करा.


१)   विधानार्थी वाक्ये:

·       काल खूप पाऊस पडला.

·       गुलाबाचे फुल सुंदर आहे.


२)  प्रश्नार्थी वाक्ये.

·       काल किती पाऊस पडला ?

·       कोणते फुल  सुंदर आहे?


३)  उद्गारार्थी वाक्ये:

·       बापरे! किती पाऊस पडला काय!

·       अहाहा! किती सुंदर आहे हे फुल !


४)आज्ञार्थी वाक्ये:

·       छत्री घेऊन जा.

·       ते फुल इकडे घेऊन ये.

*****

Post a Comment

प्रिय मित्रांनो आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडल्यास, उपयोगी पडल्यास आम्हाला नक्की comment करून सांगा. धन्यवाद.