15. असे जगावे स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता सातवी मराठी | Ase Jagave swadhyay prashn uttare iyatta satavi marathi

Ase Jagave swadhyay iyatta satavi marathi | इयत्ता सातवी विषय मराठी असे जगावे  स्वाध्याय प्रश्न उत्तरे असे जगावे  स्वाध्याय ७वी मराठीsatavi ase jagave
Admin

Ase Jagave swadhyay iyatta satavi marathi | इयत्ता सातवी विषय मराठी असे जगावे स्वाध्याय प्रश्न उत्तरे


प्र. १. जोड्या लावा.

 

‘अ’ गट

‘ब’ गट (उत्तरे)

(१) कवेत अंबर घेताना

(ई) पाय जमिनीवर असावेत.

(२) काळीज काढून देताना

 (इ) ओठांवर हसू असावे.

(३) शेवटचा निरोप देताना

(अ) जगाला गहिवर यावा.

(४) इच्छा दांडगी असेल तर

(आ) अनेक मार्ग मिळतात.

 

15. असे जगावे स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता सातवी मराठी | Ase Jagave swadhyay prashn uttare iyatta satavi marathi

 

प्र. २. खालील ओळींचा तुम्हांला समजलेला अर्थलिहा.


करून जावे असेही काही, दुनियेतून या जाताना

गहिवर यावा जगास साऱ्या, निरोप शेवट देताना

उत्तर:

        या जगाचा शेवटचा निरोप घेताना, म्हणजेच दुनियेतून निघून जाताना, मृत्यू येताना असे काहीतरी भव्य-दिव्य कर्तृत्व करून जावे, की सारे जग तुमच्या जाण्याने हळहळले पाहिजे. तुमची आठवण यावी, अशी काहीतरी कामगिरी करून जा.

 

प्र. ३. संकटात कसे वागावे हे कवितेच्या आधारे तुमच्या शब्दांत लिहा.

उत्तर:

        संकटाना निर्भयपणे सामोरे जावे. त्यांना अत्तरासारखे छातीवर झेलावे. डोळ्याला डोळा भिडवून निडरपणे संकटाचा सामना करावा. संकटांना जशास तसे उत्तर द्यावे.

 

प्र. ४. ‘संकटांना न घाबरता तोंड द्यावे’, याविषयी तुमच्या वाचनात आलेल्या एखाद्या प्रसंगाचे वर्णन करा.

उत्तर:

        सुप्रसिद्ध कथा-कादंबरीकार वि.स.खांडेकर यांची हरिणी व पारधी ही एक रूपक कथा आहे.

        हरिणी जीवाच्या आकांताने धावत होती. तिच्यामागे एक पारधी बाण रोखून तिचा पाठलाग करीत होता. धावत धावत ती एक पहाडाच्या टोकावर आली. पुढे दरी होती आणि मागे पारधी, पुढे जावे तर दरीत कोसळून मरण येणार आणि थांबावे तर पारधी बाण रोखून उभा होता. हरिणी क्षणभर विचार करून थांबली आणि पारध्यासमोर डोळे रोखून उभी राहिली. तिचे ते धैर्य पाहून पारध्याच्या हातातील बाण गळून पडला.

 

प्र. ५. कवीने या कवितेतून दिलेला संदेश तुमच्या शब्दांत लिहा.

उत्तर:

        निर्भयपणे संकटांचा सामना करत हसतमुख जगावे. दिव्य कामगिरी करताना देखील वास्तवाचे भान ठेवावे, परोपकार करताना ओठी हास्य ठेवावे. जगातून निघून जात असताना सगळ्यांच्या स्मरणात राहील, अशी मोठी कामगिरी करावी. हा संदेश कवींनी या कवितेच्या माध्यमातून दिला आहे.

 

खेळूया शब्दांशी

 

(अ) खालील वाक्प्रचार व अर्थ यांच्या जोड्या लावा.

‘अ’ गट

‘ब’ गट (उत्तरे)

(१) नजर रोखणे.

(इ) निर्भयपणे पाहणे.

(२) पाय जमिनीवर असणे.

(अ) वास्तवाचे भान ठेवणे.

(३) गगन ठेंगणे होणे.

(ई) खूप आनंद होणे.

(४) कवेत अंबर घेणे.

(उ) अशक्य गोष्ट शक्य करणे.

(५) काळीज काढून देणे.

(आ) प्रिय गोष्ट दुसऱ्याला देणे.

 

 असे जगावे स्वाध्याय ७वी मराठी | ७ standard Ase Jagave swadhyay Marathi

 (आ) कवितेतील यमक जुळणारे शब्द लिहा.

(१) अत्तर : सत्तर/बेहत्तर

(२) ताऱ्यांची : स्वप्नांची

(३) जाताना : देताना

 

(इ) खालील अधोरेखित शब्दांसाठी समानार्थी शब्द वापरून ओळी पुन्हा लिहा.

(१) पाय असावे जमिनीवरती, कवेत अंबर घेताना.

(२) असे जगावे, छाताडावर आव्हानाचे लावून अत्तर.

(३) असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळती सत्तर.

(४) नजर रोखुनी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर.

(५) स्वर कठोर त्या काळाचाही, क्षणभर व्हावा कातर कातर.

उत्तर:

(१) पाय असावे जमिनीवरती, कवेत आकाश घेताना.

(२) असे जगावे, छाताडावर संकटांचे लावून अत्तर.

(३) असे दांडगी इच्छा ज्याची, वाटा तयाला मिळती सत्तर.

(४) नजर रोखुनी नजरेमध्ये, जीवनाला द्यावे उत्तर.

(५) स्वर कठोर त्या काळाचाही, क्षणभर व्हावा कापरा कापरा.


*****

Post a Comment

प्रिय मित्रांनो आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडल्यास, उपयोगी पडल्यास आम्हाला नक्की comment करून सांगा. धन्यवाद.