11.पेशीरचना आणि सूक्ष्मजीव प्रश्न उत्तरे सातवी सामान्य विज्ञान | Peshirachana aani Sukshmajiv swadhyay prashn uttare

Peshirachana aani Sukshmajiv swadhyay prashn uttare इयत्ता सातवी सामान्य विज्ञान गाईड pdf इयत्ता सातवी सामान्य विज्ञान स्वाध्याय धडा ११
Admin

इयत्ता सातवी सामान्य विज्ञान पेशीरचना आणि सूक्ष्मजीव  स्वाध्याय प्रश्न उत्तरे | 7class science question answer in Marathi ११th  lesson


प्र.1. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

अ. पेशी म्हणजे काय?

उत्तर:

        पेशी हा सर्व सजीवांचा रचनात्मक आणि कार्यात्मक असा मुलभूत घटक आहे

.

इयत्ता सातवी सामान्य विज्ञान धडा अकरावा स्वाध्याय प्रश्न उत्तरे  इयत्ता सातवी सामान्य विज्ञान गाईड pdf  इयत्ता सातवी सामान्य विज्ञान स्वाध्याय धडा ११ पेशीरचना आणि सूक्ष्मजीव स्वाध्याय इयत्ता सातवी  ७std science question answer in Marathi medium pdf  ७ class science question answer in Marathi ११th  lesson


आ. पेशींमधील विविध अंगके कोणती आहेत?

उत्तर:

        केंद्रक, आंतरर्द्रव्यजालिका, गॉल्जीपिंड, लयकारिका, रिक्तिका, तंतुकणिका, लवके यांचा समावेश होतो. वनस्पतीं पेशींमध्ये हरितलवक असते. इत्यादी पेशींमधील विविध अंगाके आहेत.


इ. सूक्ष्मजीव म्हणजे काय?

उत्तर:

        पृथ्वीतलावर असंख्य सजीव आहेत. त्यांपैकी जे आपल्या डोळ्यांनी सहज दिसत नाहीत, ते पाहण्यासाठी सूक्ष्मदर्शकाचा वापर केला जातो. अशा सजीवांना सूक्ष्मजीव म्हणतात.


ई. सूक्ष्मजीवांचे विविध प्रकार कोणते?

उत्तर:

        उपयुक्त सूक्ष्मजीव व उपद्रवी सूक्ष्मजीव असे सूक्ष्मजीवांचे दोन प्रकार पडतात.


प्र.2. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.


अ. ............. हे अंगक फक्त वनस्पती पेशीतच असते.

उत्तर: लवके हे अंगक फक्त वनस्पती पेशीतच असते.


आ. सूक्ष्मजीवांमुळे कचऱ्या चे ............. मध्ये रूपांतर होते.

उत्तर: सूक्ष्मजीवांमुळे कचऱ्या चे खता मध्ये रूपांतर होते.


इ. पेशीमध्ये ............. मुळे प्रकाश संश्लेषण होते.

उत्तर: पेशीमध्ये हरितलवका मुळे प्रकाश संश्लेषण होते.


ई. ............. अभ्यासासाठी इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्श काचा वापर करावा लागतो.

उत्तर:  सूक्ष्मजीव/पेशी अंगकाच्या अभ्यासासाठी इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्श काचा वापर करावा लागतो.


प्र.3. आमच्यातील फरक काय आहे?


अ. वनस्पती पेशी व प्राणी पेशी

उत्तर:

वनस्पती पेशी

प्राणी पेशी

१.वनस्पती पेशींना पेशीभित्तिका असते.

१.प्राणी पेशींना पेशीभित्तिका नसते.

२.वनस्पती पेशीमध्ये लयकारिका नसतात.

२. प्राणी पेशीमध्ये लयकारिका असतात.

३.वनस्पती पेशीत लवके असतात.

३.प्राणी पेशीत लवके नसतात.

४.वनस्पती पेशीतील पेशीद्रव्य कमी कणीदार व विरळ असते.

४. प्राणी पेशीतील पेशीद्रव्य अधिक कणयुक्त व दाट असते.

५.वनस्पती पेशीत तंतुकणिकांची संख्या कमी असते.

५.प्राणी पेशीत तंतुकणिकांची संख्या जास्त असते.

 

आ. आदिकेंद्रकी पेशी व दृश्यकेंद्रकी पेशी

उत्तर:

आदिकेंद्रकी पेशी

दृश्यकेंद्रकी पेशी

१. आदिकेंद्रकी पेशी आकाराने लहान असतात.

१. दृश्यकेंद्रकी पेशी आकाराने मोठ्या असतात.

२. आदिकेंद्रकी पेशीतील पेशीअंगके पटलविरहित असतात.

२. दृश्यकेंद्रकी पेशीतील पेशी अंगकांना पटल असतात.

३. आदिकेंद्रकी पेशीत तंतुकणिका नसतात.

३. दृश्यकेंद्रकी पेशीत तंतुकणिका असतात.

४. आदिकेंद्रकी पेशीत सुस्पष्ट केंद्रक नसतो.

४. दृश्यकेंद्रकी पेशीत केंद्रकपटल, केंद्रकी आणि केंद्रकद्रव्य असलेले केंद्रक असते.

५. आदिकेंद्रकी पेशीत केंद्रकपटल नसल्याने केद्रकद्रव्याचा पेशीद्रव्याशी थेट संबंध येतो.

५. दृश्यकेंद्रकी पेशीत केंद्रकपटल असल्याने केद्रकद्रव्याचा पेशीद्रव्याशी थेट संबंध येत नाही.

4. वनस्पती पेशी व प्राणी पेशी यांच्या आकृत्या काढून त्यांचे वर्णन तुमच्या शब्दांत लिहा.

उत्तर:

वनस्पती पेशी

11.पेशीरचना आणि सूक्ष्मजीव प्रश्न उत्तरे सातवी सामान्य विज्ञान |  Peshirachana aani Sukshmajiv swadhyay prashn uttare


१.वनस्पती पेशींना पेशीभित्तिका असते.

२.वनस्पती पेशीमध्ये लयकारिका नसतात.

३.वनस्पती पेशीत लवके असतात.

४.वनस्पती पेशीतील पेशीद्रव्य कमी कणीदार व विरळ असते.

५.वनस्पती पेशीत तंतुकणिकांची संख्या कमी असते.


प्राणी पेशी

11.पेशीरचना आणि सूक्ष्मजीव प्रश्न उत्तरे सातवी सामान्य विज्ञान |  Peshirachana aani Sukshmajiv swadhyay prashn uttare


१. दृश्यकेंद्रकी पेशी आकाराने मोठ्या असतात.

२. दृश्यकेंद्रकी पेशीतील पेशी अंगकांना पटल असतात.

३. दृश्यकेंद्रकी पेशीत तंतुकणिका असतात.

४. दृश्यकेंद्रकी पेशीत केंद्रकपटल, केंद्रकी आणि केंद्रकद्रव्य असलेले केंद्रक असते.

५. दृश्यकेंद्रकी पेशीत केंद्रकपटल असल्याने केद्रकद्रव्याचा पेशीद्रव्याशी थेट संबंध येत नाही.

 

5. सूक्ष्म जीवांची उपयुक्तता व हानिकारकता स्पष्ट करा.

उत्तर:

१) सूक्ष्म जीवांची उपयुक्तता

·   कडधान्यांच्या रोपट्यांच्या मुळांवरील गाठीत, तसेच मातीत असणारे काही सूक्ष्मजीव हवेतील नायट्रोजनचे त्याच्या संयुगांत रूपांतर या संयुगांमुळे जमिनीची सुपीकता वाढते.

·  रोगप्रतिकार क्षमता वाढवणारी लस प्रयोगशाळेत सूक्ष्मजीवांच्या मदतीने तयार करतात.

·       कातडी कमावणे, घायपातापासून धागे मिळवणे ह्या प्रक्रियांमध्येही सूक्ष्मजीवांचा उपयोग करून घेतला जातो.

·   तेलावर वाढणाऱ्या सूक्ष्मजीवांच्या  मदतीने समुद्रात तेलगळतीमुळे आलेला तेलाचा तवंग काढून पाणी स्वच्छ केले जाते.

·  सूक्ष्मजीवांच्या मदतीने बायोगॅस संयंत्रांच्या माध्यमातून जैववायू व खतनिर्मिती केली जाते.


२) सूक्ष्म जीवांची हानिकारकता

·       कचऱ्याचे ढीग, गटारे, साठलेले पाणी या ठिकाणी डासांची पैदास वाढते. डासांच्या माद्यांच्या दंशांतून हिवताप (मलेरिया), डेंग्यू, हत्तीरोग, पीतज्वर,चिकुनगुनिया, झिका ताप इत्यादी रोगांना कारणीभूत सूक्ष्मजीव मानवी शरीरात प्रवेश करू शकतात.

·       श्वसनमार्गाचे रोग झालेल्या व्यक्तीच्या खोकण्यातून व शिंकण्यातून त्या रोगाचे सूक्ष्मजीव हवेत मिसळतात. श्वासावाटे निरोगी व्यक्तीच्या श्वसनमार्गात जाऊन सर्दी, खोकला, घटसर्प, न्यूमोनिया, क्षय असे रोग होऊ शकतात.

·       सूक्ष्मजिवांमुळे अन्न खराब होते.

·       सूक्ष्मजीव विषारी पदार्थ (एन्टेरोटॉक्झिन्स) ची निर्मिती करून अन्न दुषित करतात.

इयत्ता सातवी सामान्य विज्ञान धडा अकरावा स्वाध्याय प्रश्न उत्तरे


6. कारणे लिहा.


अ. महापूर, अतिवृष्टी या काळांत रोगप्रसार होतो.

उत्तर:

१)   सूक्ष्मजीवांच्या प्रसारामुळे रोगप्रसार होतो.

२)   महापूर, अतिवृष्टीच्या काळात पाणी दुषित होते,  काही ठिकाणी पाणी साठून राहिलेल्या पाण्यात रोगकारक सूक्ष्मजीव असतात.

३)   या दुषित पाण्यावर बसलेल्या माश्या अन्नावर बसल्याने अन्न सूक्ष्मजीवांमुळे दुषित होते. यामुळे रोग प्रसार होतो.

४)   तसेच साचलेल्या पाण्याच्या ठिकाणी डासांची पैदास वाढते. डासांच्या माद्यांच्या दंशातून हानिकारक सूक्ष्मजीव मानवी शरीरात प्रवेश करतात.

            म्हणून महापूर, अतिवृष्टी या काळांत रोगप्रसार होतो.

 

आ. शिळे अन्न खाल्ल्याने विषबाधा होण्याची शक्यता असते.

उत्तर:

१)   शिळ्या, ओलसर अन्नावर बुरशी येते.

२)   स्वतःचे पोषण करताना काही सूक्ष्मजीव विषारी पदार्थ (एन्टेरोटॉक्झिन्स) अन्नात मिसळतात.

३)   ह्या पदार्थांनी अन्न दूषित होते.

            म्हणून दूषित अन्नाचे सेवन केल्यास आपल्याला विषबाधा होण्याची शक्यता असते.


इ. जमीन मशागतीमध्ये माती खाली-वर करतात.

उत्तर:

१)   मातीत असणाऱ्या सूक्ष्मजिवांमुळे खत निर्मिती होते.

२)   मातीत असणारे काही सूक्ष्मजीव हवेतील नायट्रोजनचे त्याच्या संयुगांत रूपांतर करतात. या संयुगांमुळे जमिनीची सुपीकता वाढते.

३)   त्यामुळे पिकांची नायट्रोजनची आवश्यकता भागते.

            म्हणून पिकांची वाढ योग्य प्रमाणात होण्यासाठी जमीन मशागतीमध्ये माती खाली-वर करतात.


ई. बुरशी ओलसर जागी चटकन वाढते.

उत्तर:

१)   सूक्ष्मजीवांची वाढ व प्रजनन होण्यासाठी एका ठराविक परिस्थितीची आवश्यकता असते.

२)   कोरड्या जागेमध्ये बुरशी वाढत नाही.

३)   बुरशीच्या वाढीसाठी ओलसर , उबदार व दमट जागा आवश्यक असते.

        म्हणून, बुरशी ओलसर जागी चटकन वाढते.

 

उ. घराघरांमध्ये शीतकपाटांचा वापर करतात.

उत्तर:

१)   सूक्ष्मजीवांची वाढ होण्यासाठी १५C ते ३५ C इतके तापमान आवश्यक असते.

२)   थंड तापमानात सूक्ष्मजीवांची वाढ होत नाही.

३)   शीतकपाटातील तापमान हे ५C पेक्षा कमी असते. त्यामुळे शीतकपाटात सूक्ष्मजीवांची वाढ होत नाही.

            म्हणून , अन्नपदार्थ टिकवून ठेवण्यासाठी घराघरांमध्ये शीतकपाटांचा वापर करतात.


ऊ. पाव तयार करताना फुगतो.

उत्तर:

१)   सूक्ष्मजीवांच्या क्रियेमुळे काही कार्बनी पदार्थांचे दुसऱ्या कार्बनी पदार्थांत रूपांतर होण्याच्या रासायनिक क्रियेला किण्वन असे म्हणतात.

२)   या क्रियेत उष्णता निर्माण होऊन, कार्बन डायऑक्साइड व इतर वायू तयार होतात. हे वायू पदार्थांचे आकारमान वाढवतात.

३)   हे वायू बाहेर पडताना पदार्थ फसफसतात.

४)   पाव तयार करताना कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर पडून गेल्याने पाव फुगतो.

 

ए. दुभत्या जनावरांना आंबोण देण्यापूर्वी ती भिजवून ठेवतात.

उत्तर:

१)   आंबोण देण्यापूर्वी ती भिजवून ठेवल्यामुळे ते आंबून त्यामध्ये उपयुक्त सूक्ष्मजीवांची वाढ होऊन त्यातील अन्नघटक वाढतात.

२)   जीवनसत्वांची वाढ  होते.

३)   दुभत्या जनावरांना चांगले दुध यावे आणि त्यांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी या खाद्याच्या माध्यमातून त्यांचे चांगले पोषण केले जाते.

                म्हणून , दुभत्या जनावरांना आंबोण देण्यापूर्वी ती भिजवून ठेवतात.

std science question answer in Marathi medium pdf

प्र.7. साधा व संयुक्त सूक्ष्म दर्शक तुम्ही कशासाठी वापराल? कसा ते सविस्तर लिहा.

उत्तर:

१)   साधा सूक्ष्मदर्शक कमी वर्धनाचा असल्याने त्याच्याखाली कीटकांचे शरीर, फुलांचे अवयव इ. निरीक्षणे करता येतात.

२)   जे सूक्ष्मजीव डोळ्यांनी दिसू शकत नाही अशा सूक्ष्मजीवांचा अभ्यास करण्यासाठी संयुक्त सूक्ष्मदर्शकाचा वापर केला जातो.

३)   संयुक्त सूक्ष्मदर्शकामध्ये १०० ते ४५० पट इतके प्रतिमावर्धन  शक्य असल्याने पेशी उती अशा निरीक्षणासाठी उपयुक्त आहे.

४)   संयुक्त सूक्ष्मदर्शकामध्ये ज्याचे आपल्याला निरीक्षण करायचे आहे ती गोष्ट आपल्याला काचपट्टीवर ठेवावी लागते.  तर साध्या सूक्ष्मदर्शका मध्ये थेट मंचावर आपल्याला निरीक्षण नमुना ठेवता येतो.

५)   संयुक्त सूक्ष्मदर्शकाच्या सहाय्याने निरीक्षण करण्यासाठी नमुन्याचे पातळ काप काचपट्टीवर घेवून त्यावर अच्छादन काच घातली जाते .

६)   मंचाखालील प्रकाशस्त्रोताचा आरसा अगोदर जुळवून घ्यावा लागतो.

७)   नेत्रभिंग आणी वस्तुभिंग एका सरळ रेषेत आणून त्याची एकत्रित वर्धित प्रतिमा आपल्याला दिसते. अगोदर स्थूल समायोजक आणि नंतर अचूक निरीक्षणासाठी सूक्ष्म समायोजकाची हालचाल करावी लागते.

८)   आपल्याला दिसणाऱ्या प्रतिमेवर आपण किरणसंपात स्थानात दृष्टी एकाग्र करू शकतो.

९)   अशा पद्धतीने आपण सध्या सूक्ष्मदर्शकाच्या सहायाने ढोबळ निरीक्षण आणि संयुक्त सूक्ष्मदर्शकाच्या सहाय्याने अचूक निरीक्षण करू शकतो. 

**********


Post a Comment

प्रिय मित्रांनो आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडल्यास, उपयोगी पडल्यास आम्हाला नक्की comment करून सांगा. धन्यवाद.