13. बदल : भौतिक व रासायनिक प्रश्न उत्तरे सातवी सामान्य विज्ञान | Badal Bhoutik v Rasayanik Swadhyay Prashn Uttare ७vi

इयत्ता सातवी सामान्य विज्ञान धडा तेरावा स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता सातवी सामान्य विज्ञान गाईड pdf इयत्ता सातवी सामान्य विज्ञान स्वाध्याय धडा १३
Admin

इयत्ता सातवी सामान्य विज्ञान  बदल भौतिक व रासायनिक  स्वाध्याय प्रश्न उत्तरे | 7class science question answer Badal Bhoutik v Rasayanik

प्र.1. फरक स्पष्ट करा.

अ. भौतिक बदल व रासायनिक बदल

उत्तर:

भौतिक बदल

रासायनिक बदल

१)जे बदल घडताना मूळ पदार्थांचे गुणधर्म आहे तसेच राहतात. त्यांना भौतिक बदल म्हणतात.  

१)जे बदल घडल्याने मूळ पदार्थांचे रूपांतर नवीन व वेगळ्या गुणधर्माच्या पदार्थांत होते अशा बदलास रासायनिक बदल असे म्हणतात.

) भौतिक बदलांमध्ये मूळ पदार्थांचे गुणधर्म बदलत नाहीत.

) रासायनिक बदलांमध्ये मूळ पदार्थांचे गुणधर्म बदलतात.

३)भौतिक बदलात मूळ पदार्थांचे संघटन कायम राहते.

३)रासायनिक बदलात मूळ पदार्थांचे संघटन ब्दल्ल्ले जाते.

४)भौतिक बदल हे परीवर्तनीय असतात.

४)रासायनिक बदल हे अपरीवर्तनीय असतात.

५)उदा.: बाष्पीभवन , उत्कलन इ.

उदा.: क्षरण, प्रकाश संश्लेषण.

बदल : भौतिक व रासायनिक स्वाध्याय इयत्ता सातवी

इयत्ता सातवी सामान्य विज्ञान गाईड pdf  इयत्ता सातवी सामान्य विज्ञान स्वाध्याय धडा १३ बदल : भौतिक व रासायनिक स्वाध्याय इयत्ता सातवी  ७std science question answer in Marathi medium pdf  ७vi vidnyan Badal Bhoutik v Rasayanik swadhyay

आ. आवर्ती बदल व अनावर्ती बदल

उत्तर:

आवर्ती बदल

अनावर्ती बदल

१)जे बदल ठराविक कालावधीनंतर पुन्हा पुन्हा घडून येतात त्यांना आवर्ती बदल म्हणतात.

१) जे बदल ठराविक कालावधीनंतर पुन्हा घडतीलच असे निश्चित नसते त्यांना अनावर्ती बदल म्हणतात.

२) आवर्ती बदलात सातत्य असते.

२) अनावर्ती बदलात सातत्य नसते.

३)उदा.: भरती ओहोटी, घडाळ्याच्या काट्यांचे भ्रमण

३)उदा.: एखादे वादळ येणे, भूकंप

 

इ. नैसर्गिक बदल व मानवनिर्मित बदल

उत्तर:

नैसर्गिक बदल

मानवनिर्मित बदल

१)जे बदल निसर्गःतच घडून येतात त्या बदलांना नैसर्गिक बदल असे म्हणतात.

१) जे बदल मानव स्वतः घडवून आणतो अशा बदलांना मानवनिर्मित बदल म्हणतात.

२)निसर्गातल्या अनेक वस्तू आपोआप बदलत असतात.

२)मानव त्याच्या फायद्यासाठी बदल करीत असतो.

३) उदा.: झाडावरील फळे पिकणे, लोखंड गंजणे.

३)उदा.: अन्न शिजवणे, जंगल नष्ट करणे.


प्र.2. खाली दिलेले बदल कोणकोणत्या प्रकारांत मोडतात? कसे?


अ. दुधाचे दही होणे.

उत्तर: दुधाचे दही होणे हा बदल रासायनिक बदल या प्रकारात मोडतो.

दुधापासून दही हा नवीन पदार्थ तयार होतो म्हणून हा रासायनिक बदल होय.


आ. फटाका फुटणे.

उत्तर: फटाका फुटणे हा बदल रासायनिक बदल या प्रकारात मोडतो.

कारण फटाका फुटल्यावर मूळ पदार्थ बदलतो.


इ. भूकंप होणे.

उत्तर: भूकंप होणे हा बदल अनावर्ती बदल या प्रकारात मोडतो.

भूकंप हा बदल ठराविक कालावधीत घडून येत नाही.


ई. पृथ्वीचे सूर्याभोवती परिभ्रमण.

उत्तर: पृथ्वीचे भ्रमण होणे हा बदल आवर्ती बदल या प्रकारात मोडतो.

कारण पृथ्वीचे सूर्याभोवती परिभ्रमण हे ठराविक कालावधीत घडून येते.


उ. स्प्रिंग ताणणे.

उत्तर: स्प्रिंग ताणणे हा बदल भौतिक बदल या प्रकारात मोडतो.

कारण स्प्रिंग ताणल्यावर तीच्या मूळ स्वरूपात कोणताही बदल घडून येत नाही.


प्र.3. कारणे लिहा.

std science question answer in Marathi medium pdf

अ. हवाबंद अन्नपदार्थ विकत घेताना त्यांच्या वेष्टनावरील मुदतीची तारीख तपासून घ्यावी.

उत्तर:

        कोणताही खाद्यपदार्थ हा ठराविक काळापर्यंतच टिकून राहतो. तो पदार्थ किती काळ टिकून राहील हे त्या खाद्यपदार्थाच्या वेष्टनावर नमूद केलेले असते. हा कालावधी संपला की त्या पदार्थामध्ये रासायनिक आणि अपरिवर्तनीय बदल घडून येतात. मुदत संपून गेलेले पदार्थ खाल्ल्यास अपाय होण्याचा धोका असतो म्हणून हवाबंद अन्नपदार्थ विकत घेताना त्यांच्या वेष्टनावरील मुदतीची तारीख तपासून घ्यावी.


आ. लोखंडी वस्तूस रंग लावावा.

उत्तर:

        हवेतील ऑक्सिजन, आर्द्रता, रसायनांची प्रक्रिया, वाफ यांची प्रक्रिया होऊन लोखंडावर गंज चढतो. यालाच क्षरण असे म्हणतात. लोखंडी वस्तूवर रंग लावल्याने लोखंडाचा हवेतील ऑक्सिजन, आर्द्रता, वाफ यांच्याशी संपर्क तुटतो आणि क्षरण प्रक्रिया थांबते म्हणून लोखंडी वस्तूचे क्षरण रोखण्यासाठी लोखंडी वस्तुंवर रंग लावावा.


इ. लाकडी वस्तूस पॉलिश करावे.

उत्तर:

        लाकडी वस्तूचे लाकूड हा सेंद्रिय पदार्थ आहे. त्याच्यावरील बदल हे नैसर्गिक आहेत परंतु हे अपरीवर्तनीय आहे. लाकडी वस्तूवर पॉलिश लावल्याने लाकडामध्ये नैसर्गिक बदल होण्याची प्रक्रिया मंदावते म्हणून लाकडी वस्तूस पॉलिश करावे.


ई. तांबे, पितळ अशा प्रकारच्या भांड्यांना कल्हई करावी.

उत्तर:

        ऑक्सिजन, आर्द्रता , रसायने इत्यादी हवेतील घटकांची तांबे पितळ अशा धातूंवर प्रक्रिया होते व त्यावर हिरवट रंगाचा थर तयार होतो. हा एक क्षरणाचा प्राकार आहे. हे क्षरण रोखण्यासाठी तांबे पितळ अशा प्रकारच्या भांड्यांना कल्हई करावी.


उ. कोरडा रुमाल पाण्यात बुडवला तर लगेच ओला होतो, परंतु ओला रुमाल वाळण्यास वेळ लागतो.

उत्तर:

        कोरडा रुमाल पाण्यात बुडवला असता तो पाणी शोषून घेतो. शीघ्र बदल झाल्याने हा रुमाल ओळ होतो. रुमाल वाळणे ही सावकाश चालणारी प्रक्रिया आहे. यात रुमालातून पाण्याचे बाष्पीभवन होते. बाष्पीभवन हा भौतिक बदल वातावरणाच्या तापमानावर व आर्द्रतेवर अवलंबून असतो, म्हणून कोरडा रुमाल पाण्यात बुडवला तर लगेच ओला होतो, परंतु ओला रुमाल वाळण्यास वेळ लागतो.


प्र.4. कशाचा विचार कराल?

अ. पदार्थांमध्ये  झालेला भौतिक बदल ओळखायचा आहे.

उत्तर:

        पदार्थांच्या गुणधर्मात आणि संघटनात बदल झाले आहेत का, हे लक्षात घेतले जाईल. जर हे दोन्ही बदल झाले नसतील तर तो भौतिक बदल ठरेल.


आ. पदार्थांमध्ये झालेला रासायनिक बदल ओळखायचा आहे.

उत्तर:

        पदार्थात काय फरक झाला आहे? त्याचे मूळ गुणधर्म बदलले आहेत का? त्याचे संघटन बदलले आहे का? त्याच्यात झालेला बदल अपरिवर्तनीय आहे का हे लक्षात घेतले जाईल. या सर्व बाबी घडत असतील तर तो बदल रासायनिक बदल असेल.


प्र.5. परिच्छेद वाचून बदलाचे विविध प्रकार नोंदवा.

            संध्याकाळचे सहा वाजायला आले होते. सूर्य मावळत होता. मंद वारा सुटला होता. झाडाची पाने हलत होती. साहिल अंगणात मातीचे गोळे बनवून त्यापासून वेगवेगळी खेळणी तयार करत बसला होता. भूक लागली म्हणून तो घरात गेला. आईने कणीक भिजवून पुऱ्या तळल्या . गरमागरम पुऱ्या खाताना त्याचे लक्ष खिडकीबाहेर गेले. पाऊस सुरू झाला होता. विजा चमकत होत्या . मंद प्रकाशात साहिल  जेवणाचा आनंद घेत होता.

उत्तर:

१)संध्याकाळचे सहा वाजायला आले होते. (वेळ-आवर्ती, परिवर्तनीय)

२)सूर्य मावळत होता.( सूर्यास्त- आवर्ती, परिवर्तनीय)

३)मंद वारा सुटला होता . ( वारा वाहणे- भौतिक, अनावर्ती)

४) झाडाची पाने हलत होती. ( वाऱ्याने हालचाल - भौतिक, अनावर्ती)

५)भूक लागली म्हणून तो घरात गेला. (भूक लागणे – आवर्ती )

६) आईने कणिक भिजवून पुऱ्या तळल्या. (तळणे – भौतिक , अपरीवर्तनीय)

७) पाउस सुरु झाला होता. (पाऊस पडणे – भौतिक , आवर्ती)

८) विजा चमकत होत्या .(वीज चमकणे – भौतिक, रासायनिक , शीघ्र)

**********

vi vidnyan Badal Bhoutik v Rasayanik swadhyay

Post a Comment

प्रिय मित्रांनो आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडल्यास, उपयोगी पडल्यास आम्हाला नक्की comment करून सांगा. धन्यवाद.