17. थेंब आज हा पाण्याचा स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता सातवी मराठी | Themb Ha Panyacha swadhyay prashn uttare iyatta satavi marathi

Themb Ha Panyacha swadhyay iyatta satavi marathi | इयत्ता सातवी विषय मराठी थेंब आज हा पाण्याचा कोळीण  स्वाध्याय प्रश्न उत्तरे थेंब आज हा पाण्याचा
Admin

Themb Ha Panyacha swadhyay iyatta satavi marathi | इयत्ता सातवी विषय मराठी थेंब आज हा पाण्याचा कोळीण स्वाध्याय प्रश्न उत्तरे


प्र. १. कवयित्रीने असे का म्हटले असावे ते तुमच्या शब्दांत लिहा.


(अ) या मोत्यांचा (पाण्याचा) संचय कर.

उत्तर:

        पावसातून धरणीवर येणारे पाणी अत्यंत मौल्यवान आहे, माणूस पशु-पक्षी व निसर्ग यांना जगण्यासाठी पाणी अत्यंत गरजेचे आहे म्हणून आभाळातून बरसण्याच्या या मोतीरूपी थेंबांचा संग्रह कर असे कवयित्रीने म्हटले आहे.

 

(आ) निसर्गाला जे कळते ते माणसाला कळत नाही.

उत्तर:

        माणूस सोन्या नाण्यांचा संचय करतो परंतु बहुमोल पाणी मात्र वाया घालतो. सोन्याच्या घोटाने तहान शमत नाही. निसर्ग पाणी मातीमध्ये साठवतो व त्यातून मोत्यांसारखे पिक येते म्हणून निसर्गाला जे कळते, ते माणसाला कळत नाही, असे कवयित्रीने म्हटले आहे.

 
Themb Ha Panyacha swadhyay iyatta satavi marathi | इयत्ता सातवी विषय मराठी थेंब आज हा पाण्याचा कोळीण  स्वाध्याय प्रश्न उत्तरे

प्र. २. खाली दिलेल्या अर्थाच्या ओळी कवितेतून शोधून लिहा.

 

(अ) आकाशातून पडणाऱ्या पावसाच्या थेंबाने धान्य पिकते.

उत्तर: आभाळातिल ह्या मोत्याचे, मातीमधुनी पिकती मोती.

 

(आ) मनुष्य खणखणत वाजणाऱ्या नाण्यांचा तिजोरीत संग्रह करतो.

उत्तर: संचय करता तिजोरीतल्या, खणखणत्या त्या नाण्यांचा

 

(इ) निसर्गाचे मोल न जाणणे हे स्वत:ला फसवण्यासारखे आहे.

उत्तर: कशास ऐसा वेडाचाळा, स्वतः होऊनी ठगण्याचा

 

प्र. ३. संकल्पना स्पष्ट करा.

 

(अ) आभाळातील मोती.

उत्तर: आभाळातून बरसणाऱ्या पावसाच्या थेंबांना मोती म्हटले आहे. पावसाचे थेंब मानवी जीवनासाठी मोत्यांइतके बहुमोल आहेत.

 

(आ) मातीतील मोती.

उत्तर: पावसामुळे शेतात धान्य पिकते. त्यामुळे माणसाची भूक भागते.  पिकाच्या या दाण्यांना मातीमधले मोती असे म्हटले आहे.

 

(इ) मोत्यांचा संचय.

उत्तर: पावसाच्या थेंबांना मोठी म्हटले आहे. या मोत्यांचा संग्रह करा, असे सुचवले आहे. कारण पाणी हे जीवनावश्यक आहे.

 

(ई) बहुमोल थेंब.

उत्तर: पावसाच्या सरीतून येणारे पाण्याचे थेंब माणसाला व सृष्टीला जगवतात; म्हणून त्यांना बहुमोल म्हणजे अत्यंत मोलाचे म्हटले आहे.

 

प्र. ४. खाली दिलेल्या ओळींतील विचार सांगा.

 

तहानेसाठी सांग पुरे का घोट तुला रे सोन्याचा?

आभाळातिल बहुमोलाचा, थेंब आज हा पाण्याचा ।।

उत्तर:

        माणूस हा सोन्या-नाण्यांचा संग्रह करतो. पण सोन्याचा घोट माणसाची तहान शमवू शकत नाही. पाणी हे जीवन आहे. सोन्या-नाण्यांपेक्षा ते अमुल्य आहे. आभाळातून येणारा हा पाण्याचा थेंब आज बहुमोलाचा आहे.

 

प्र. ५. माणसाने निसर्गाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा. या वाक्याचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.

उत्तर:

        निसर्ग माणसाला भरभरून मदत करतो, पण माणूस निसर्गाची कदर करीत नाही. उलट वारेमाप जंगलतोड, जलप्रदूषण, वायुप्रदूषण यांसारखे गुन्हे करतो. निसर्गाकडे दुर्लक्ष करून त्याला लुबाडले, तर माणूस वाचणार नाही. म्हणजेच निसर्गाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा, त्यासाठी पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करायला हवे.

 

प्र. ६. फरक स्पष्ट करून तक्ता पूर्ण करा.


 

माणसाचे धन

निसर्गाचे धन

कोणते?

सोने-नाणी

शेतातील पिक

कोठे ठेवतात?

तिजोरीत

घरात

उपयोग

वस्तू विकत घेणे

माणसाला जगवणे.



खेळूया शब्दांशी.

 

(अ) खालील शब्दांचे अर्थ समजून घेऊन त्यांचा वाक्यांत उपयोग करा.

उदा., मोल-बहुमोल, अनमोल.

मोल-मातीमोल, कवडीमोल.


१) मोल – अमुल्य

वाक्य : आईच्या प्रेमाचे मोल नाही.

 

२) बहुमोल – अमुल्य

वाक्य : वृक्ष आपली बहुमोल संपत्ती आहे.


३) अनमोल – ज्याची किंमत करता येत नाही असा.

वाक्य : पाणी हे अनमोल जीवन आहे.

 

४) मातीमोल – शुल्लक किमतीचे.

वाक्य : पुरामध्ये पिक मातीमोल झाले.

 

५) कवडीमोल – अगदी शुद्र किमतीचे.

वाक्य : आईवडील-गुरुजन यांचा जो आदर राखत नाही, त्याचे जिणे कवडीमोल ठरते.

 

(आ) माती-मोती अशा शब्दांच्या अर्थात केवळ एका मात्रेमुळे खूप फरक होतो. अशा शब्दांच्या जोड्या शोधा व लिहा.

उत्तर:

१)   माता – मात

२)   शास्त्र – शस्त्र

३)   नार – नारा

४)   घार – घोर

५)   चार- चारा

६)   सार – सारा


Themb Ha Panyacha swadhyay iyatta satavi marathi
 इयत्ता सातवी विषय मराठी थेंब आज हा पाण्याचा कोळीण स्वाध्याय प्रश्न उत्तरे

Post a Comment

प्रिय मित्रांनो आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडल्यास, उपयोगी पडल्यास आम्हाला नक्की comment करून सांगा. धन्यवाद.