Vadani Kaval Gheta swadhyay iyatta satavi marathi | इयत्ता सातवी विषय मराठी वदनी कवळ घेता.. स्वाध्याय प्रश्न उत्तरे
प्र. १. श्रुतीच्या नाराजीबाबत तुमचे मत लिहा.
उत्तर:
३१ डिसेंबरला वर्गात मॅडमनी श्रुतीला तिचा
नववर्षाचा संकल्प विचारला. वेगळा संकल्प न सांगता आल्यामुळे श्रुती नाराज झाली;
कारण सर्वजण ठराविक संकल्प सांगतात. काहीतरी वेगळा नवीन संकल्प तिला सांगायचा होता.
आयत्या वेळी तिची बुद्धी चालली नाही; म्हणून ती नाराज झाली.
प्र. २. आई
श्रुतीवर का रागावली?
उत्तर: श्रुतीने
अनेक अन्नपदार्थांमधला एकच पदार्थ खाल्ला व उरलेली डिश बेसिनमध्ये टाकून दिली.
श्रुतीने अन्न वाया घालवले म्हण्यून आई श्रुतीवर रागावली.
वदनी कवळ घेता.. स्वाध्याय ७वी मराठी | 7 vi Marathi Vadani Kaval Gheta swadhyay
प्र. ३.
श्रुतीला नवीन वर्षाचा कोणता संकल्प सुचला?
उत्तर:
या पुढे कधीही पानात अन्न शिल्लक ठेवणार
नाही, हा नवीन वर्षाचा संकल्प श्रुतीला सुचला.
प्र. ४. खालील ओळींचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
मुखी घास
घेता करावा विचार ।
कशासाठी हे
अन्न मी सेविणार ।।
उत्तर:
जेवताना, तोंडात घास घेताना नेहमी असा
विचार करा की, पुढ्यातले अन्न मी कशासाठी खाणार आहे.
खाली काही कृती दिलेल्या आहेत. त्या योग्य की अयोग्य आहेत ते ठरवा. पुढे दिलेल्या चौकटींमध्ये ते नोंदवा.
(अ) वैभवी शाळेत येताना घरी डबा विसरली. त्या
वेळी अनुजाने स्वत:च्या डब्यातील पोळीभाजी तिला दिली. |
योग्य |
(आ) राजेंद्र सतत बाहेरचे जंकफूड खातो. |
अयोग्य |
(इ) यास्मिन टीव्ही बघत जेवण करते. |
अयोग्य |
(ई) आनंद जेवण करण्यापूर्वी हात स्वच्छ धुतो. |
योग्य |
(उ) पीटर जेवताना खूपच बडबड करतो. |
अयोग्य |
(ऊ) रूपाली सर्व प्रकारच्या भाज्या खाते. |
योग्य |