इयत्ता सातवी सामान्य विज्ञान नैसर्गिक साधनसंपत्ती स्वाध्याय प्रश्न उत्तरे | 7class science question answer Naisargik Sadhansanpatti
प्र.1. खाली दिलेल्या तीन प्रकारांच्या आधारे नैसर्गिक साधनसंपत्तीचे वर्णन लिहा.
अ. खनिजसंपत्ती
उत्तर:
पृथ्वीच्या भूगर्भातून खाणकामाद्वारे
खनिजे काढण्यात येतात. सोने, चांदी, तांबे, सोने,प्लॅटिनम आणि
बिस्मथ यांसारखे धातू हे निसर्गात मुक्त स्थितीत आढळतात. सोने, चांदी ,प्लॅटिनम
तसेच हिरा, माणिक, पाचू यांसारखी रत्ने हे देखील खनिजसंपत्तीचाच भाग आहेत. दगडी कोळसा, खनिज तेल, नैसर्गि क वायू यांसारख्या खनिजांपासून आपल्याला
उर्जा मिळते. भूगर्भात सैंधव मिठाचे साठेदेखील सापडतात. विद्युतनिर्मिती, दळणवळण तसेच
आपल्या विविध गरजा भागवण्यासाठी खनिजे अत्यंत उपयोगी ठरतात.
आ. वनसंपत्ती
उत्तर:
वनस्पतींच्या विविध जातींनी व्यापलेल्या सर्व
साधारण विस्तृत प्रदेशास जंगल म्हणतात. गेल्या काही
वर्षांपासून जंगलांचा भाग दिवसेंदिवस कमी होत आहे. जंगलांमुळेच आपले हवामान, ऋतुचक्र, पर्जन्यमान यांचे
नियमन आणि नियंत्रण होते. जमिनीची धूप रोखणे, वन्य जीवांचे संरक्षण करणे, पुरांवर
नियंत्रण ठेवणे, भूपृष्ठावरून वाहणाऱ्या पाण्याचा वेग कमी करणे, हवेतील वायूंचे
संतुलन राखणे यासाठी वनसंपत्ती उपयुक्त ठरते;
तसेच
वानासंपात्तीह्या माध्यमातून औषधे,
सौंदर्य प्रसाधने, फर्निचर, बांधकाम साहित्य, पेपर, साबण, वविध प्रकारची फळे यांसारखी अनेक उत्पादने आपल्याला वनसंपत्तीच्या माध्यमातून
मिळतात.
इ. सागरसंपत्ती
उत्तर:
सागरजलात, सागरतळावर व सागरतळाखाली विविध नैसर्गिक संपत्तींचे साठे आहेत. समुद्र व महासागरातून प्राप्त होणाऱ्या या संपत्तीला ‘सागरसंपत्ती ’ असे म्हणतात.
सागर आणि महासागराच्या
तळाशी कथील, क्रोमिअम, फॉस्फेट, तांबे, जस्त, लोखंड, शिसे, मँगनीज, गंधक, युरेनिअम इत्या दींचे साठे फार मोठ्या प्रमाणावर आहेत. सागरातून अनेक प्रकारची रत्ने , शंख, शिंपले, मोती मिळतात. खऱ्या मोत्यांची
किंमत सोन्या पेक्षासुद्धा अधिक असते. सागरतळामध्ये खनिज तेलाचा
व नैसर्गिक वायूचा साठा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. विहिरी
खोदून आपण तेल व वायू मिळवतो. थोरिअम, मॅग्नेशिअम , पोटॅशिअम,
सोडिअम, सल्फेट यांसारखी उपयुक्त खनिजे सागरातून मिळतात. तसेच प्रथिने व जीवनसत्वयुक्त
अन्न समुद्रातून मिळते.
प्र.2. खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा.
अ. जीवाश्म
इंधन म्हणजे काय? त्यांचे प्रकार कोणते?
उत्तर:
१) जीव म्हणजे सजीव सृष्टी आणि अश्म म्हणजे दगड या दोन
शब्दांपासून जीवाश्म हा शब्द तयार झाला आहे.
२)लाखो वर्षांपूर्वी
नैसर्गिक घडामोडींमुळे जंगले जमिनीत गाडली गेली. त्यांच्यावर मातीचे
थर जमा होत गेले. वरून प्रचंड दाब व पृथ्वी च्या पोटातील उष्णता
यांचा परिणाम होऊन गाडल्या गेलेल्या वनस्पतींचे रूपांतर हळूहळू इंधनात झाले.
३) त्या वनस्पतींच्या
अवशेषांपासून दगडी कोळसा तयार झाला, त्यामुळे कोळशाला जीवाश्म
इंधन असे म्हणतात.
४) दगडी
कोळसा, खनिज तेल आणि नैसर्गिक वायू हे जीवाश्म इंधनाचे प्रकार आहेत.
आ. खनिज
तेलापासून कोणकोणते घटकपदार्थ मिळतात, त्यांची यादी करा.
उत्तर:
1) जमिनीखाली गाडल्या गेलेल्या सेंद्रिय
पदार्थांच्या विघटन क्रियेतून तयार झालेले
द्रवरूप इंधन म्हणजे खनिज तेल होय.
2) पेट्रोलि अम हे प्रामुख्याने हायड्रोकार्बन
याप्रकारच्या अनेक संयुगांचे मिश्रण असून त्यामध्ये ऑक्सिजन, नायट्रोजन तसेच गंधकाची संयुगेही असतात.
3) खनिज तेलापासून पेट्रोल, डिझेल, केरोसीन, नॅप्था,
वंगण, डांबर हे घटक मिळतात.
इयत्ता सातवी सामान्य विज्ञान गाईड pdf | इयत्ता सातवी सामान्य विज्ञान स्वाध्याय धडा १६
इ. जंगलातून
आपणांस काय काय मिळते?
उत्तर:
१) जंगलातून
मजबूत व टिकाऊ तसेच जळाऊ लाकूड मिळते. याचा उपयोग घरातील लाकडी सामान, शेतीची अवजारे,
विवि ध वस्तू तयार करण्या साठी, तसेच बांधकामात
केला जातो.
२) जंगलसंपत्ती
पासून धागे, कागद, रबर, डिंक, सुगंधी द्रव्ये मिळतात.
३) लेमन ग्रास, व्हॅनिला, केवडा, खस, निलगिरी यांपासून सुगंधी व अर्कयुक्त तेले तयार केली जातात.
४) साबण, सौंदर्य प्रसाधने, अगरबत्ती बनवण्या साठी चंदन लाकूड,
निलगिरीचे
तेल वापरतात.
५) विवध फळे, कंदमुळे, मध, लाख, कात, रंग असे अनेक पदार्थ मिळतात.
ई.
सागरसंपत्तीमध्ये कशाकशाचा समावेश होतो? त्याचा आपल्याला काय
उपयोग आहे?
उत्तर:
१) जैविक
सागरसंपत्ती आणि अजैविक सागरसंपत्ती अशा दोन प्रकारांत सागरसंपत्तीचे वर्गीकरण
केले गेले आहे.
२)
जैविकसागरसंपत्तीमध्ये कोळंबी, सुरमई, पापलेट,
सुकट, बोंबील यांची भुकटी , शिंपले , बुरशी ,शार्क , कॉड मासे, समुद्रकाकडी यांसारखे सागरी जीव येतात.
३) जैविकसागरसंपत्तीचा
उपयोग आपल्याला अन्न मिळविण्यासाठी , उत्तम प्रकारचे खत, औषधे, अलंकार, शोभेच्या वस्तू
तसेच जीवनसत्व मिळविण्यासाठी केला जातो.
४) अजैविक
साधन संपत्तीमध्ये पाण्यात विरघळलेल्या स्थितीत कथील, क्रोमिअम, फॉस्फेट, तांबे,
जस्त, लोखंड, शिसे, मँगनीज, गंधक, युरेनिअम इत्यादींचे
साठे फार मोठ्या प्रमाणावर आहेत.
५) सागरातून
अनेक प्रकारची रत्ने, शंख, शिंपले,
मोती मिळतात.
६) सागरतळामध्ये
खनिज तेलाचा व नैसर्गि क वायूचा साठा मोठ्या
प्रमाणावर उपलब्ध
आहे.
विहिरी खोदून आपण तेल व वायू मिळवतो.
उ.
वाहनांसाठी वापरल्या जाणाऱ्या इंधनाचा अपव्यय का टाळावा?
उत्तर:
१) झपाट्याने वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे इंधनांची मागणी वाढली
आहे. मात्र जीवाश्म इंधनाचे साठे मर्यादित आहेत.
२) या
जीवाश्म इंधनाच्या ज्वलनाने वाहनांतून खूप मोठ्या प्रमाणावर कार्बनडायऑक्साईड वायू
बाहेर पडून मोठ्या प्रमाणावर हवा प्रदूषण होते.
३) हे
इंधनाचे साठे दिवसेंदिवस संपत चालले आहेत. म्हणून आपण वाहनांसाठी वापरल्या
जाणाऱ्या इंधनाचा अपव्यय टाळणे आवश्यक आहे.
ऊ. वनस्पती
व प्राणी यांचे जंगलातील वैविध्य का कमी होत चालले आहे?
उत्तर:
१) झपाट्याने वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे वास्तव्यासाठी
अधिकाधिक जमिनीची आवश्यकता भासू लागली आहे.
२) शहरीकरण आणि
औद्योगिकीकरण यांमुळे मोठ्या प्रमाणावर जंगलतोड झाली आहे. शिवाय विविध प्रकारची
उत्पादने मिळविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जंगल तोड करण्यात आली आहे.
३)
शिकारीमुळे जंगलातील प्राण्यांची संख्या कमी झाली आहे.
४)
मानवाच्या हस्तक्षेपामुळे वनस्पती व प्राणी यांचे जंगलातील वैविध्य कमी होत चालले
आहे.
ए. पाच खनिजांची नावे व त्यांपासून मिळणारे उपयुक्त पदार्थ लिहा.
उत्तर:
1. लोहखनिज :
अशुद्ध
स्वरूपात सापडणाऱ्या लोखंडास लोहखनिज म्हणतात. टाचणीपासून ते अवजड उद्योगधंद्यांपर्यंत
विविध साहित्यनिर्मितीमध्ये लोखंड वापरले जाते. उदा. शेतीची अवजारे,
रेल्वे रूळ इत्यादी.
मॅग्नेटाईट, हेमॅटाईट, लि मोनाईट, सिडेराईट
ही चार प्रमुख लोहखनिजे आहेत.
2. मँगनीज :
मँगनीजची
खनिजे कार्बोनेट, सिलिकेट, ऑक्साइड
या स्वरूपात आढळतात. मँगनीजच्या संयुगाचा वापर औषधे तयार करण्या
साठी तसेच काचेला गुलाबी रंगछटा देण्यासाठी केला जातो. विद्युत
उपकरणांमध्ये ही मँगनीज वापरले जाते.
3. बॉक्साईट :
बॉक्साईट
हे ॲल्युमि निअमचे प्रमुख धातुक आहे. हे प्रामुख्याने ॲल्युमिनिअम
ऑक्साइडपासून बनलेले असते.ॲल्युमि निअम हा उत्तम वीजवाहक व उष्ण
तावाहक आहे. त्याची घनता कमी आहे, त्यामुळे
विमाने, वाहतुकीची साधने, विद्युत तारा
यांमध्ये त्या चा प्रामुख्यानने वापर केला जातो.
4. तांबे :
तांबे
हे लोह व इतर खनिजांच्या सान्निध्यात अशुद्ध स्वरूपात सापडते. तांबे हे शीघ्र वि द्युतवाहक आहे , त्यामुळे विजेच्या
तारा, रेडिओ, टेलिफोन, वाहने तसेच भांडी व मूर्ती निर्मि तीमध्ये तांब्याचा वापर केला जातो.
5. अभ्रक :
अभ्रक
हे विद्युतरोधक आहे. औषधे, रंग, विद्युतयंत्रे
व उपकरणे, बिनतारी संदेश यंत्रणा अशा अनेक ठिकाणी अभ्रकाचा वापर
करण्यात येतो.
ऐ. धातुकांपासून धातू मिळवण्याच्या प्रक्रियेमधील दोन महत्त्वाचे टप्पे लिहा.
उत्तर:
१)
धातुकांपासून धातू मिळवण्याच्या प्रक्रियेमधील निष्कर्षण आणि शुद्धीकरण हे दोन
महत्वाचे टप्पे आहेत.
२)भूगर्भातून
धातू शोधणे व तेथून बाहेर काढण्याची प्रक्रिया म्हणजे धातू निष्कर्षण होय.
३) भूगर्भातून
शोधलेल्या धातूंवर प्रक्रिया करून त्यांपासून शुद्ध धातू मिळविण्याची प्रक्रिया
म्हणजे शुधीकरण होय.
नैसर्गिक साधनसंपत्ती स्वाध्याय इयत्ता सातवी | Naisargik Sadhansanpatti question answer | ७vi vidnyan Naisargik Sadhansanpatti swadhya
प्र.3. नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन व संवर्धन करण्याचे उपाय कोणते आहेत?
उत्तर:
नैसर्गिक
साधनसंपत्तीचे जतन व संवर्धन करण्यासाठी पुढील उपाय करता येतील:
१) नैसर्गिक
साधनसंपत्तीचा वापर जपून करण्याबाबत सर्वांना जागरूक करणे.
२) नैसर्गिक
साधनसंपत्तीच्या वापरावर नियंत्रण ठेवणे.
३) नैसर्गिक
समतोल राखण्यासाठी नैसर्गिक साधनसंपत्ती वाढीसाठी प्रयत्न करणे. उदा. वृक्ष लागवड,
वनीकरण मोहिमा.
४) पर्यायी
उर्जा स्त्रोतांचा वापर करणे.
५)
प्रदूषणाला आळा घालणे.
प्र.4. खालील ओघतक्ता पूर्ण करा.
उत्तर:
|
|
|
इंधने |
|
|
|
|||
|
|
|
|
|
|
|
|
||
|
|
|
जीवाश्म इंधने |
|
|
|
|||
|
|
|
|
|
|
|
|
||
|
|
|
|
|
|
|
|
||
स्थायूरूप |
|
द्रवरूप |
|
वायुरूप |
|||||
|
|
|
|
|
|
|
|
||
दगडी कोळसा |
|
खनिज तेल |
|
नैसर्गिक वायू |
|||||
|
|
|
|
|
|
|
|
||
पीट, लिग्नाईट |
|
पेट्रोल, डीझेल, केरोसीन, वंगण, डांबर |
|
मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन |
|||||
प्र.5. देशाची आर्थिक स्थिती नैसर्गिक साधनसंपत्तीवर कशी अवलंबून आहे?
उत्तर:
नैसर्गिक
साधनसंपत्तीवर राष्ट्रीय उत्पन्न अवलंबून असते. आपल्या देशाच्या मातीतून खनिजे आणि
जीवाश्म इंधने, नैसर्गिक वायू इत्यादी मिळाल्यामुळे आपल्या देशाला संपत्ती
मिळते. अशी संपदा निर्यात झाल्यास आपल्याला अमुल्य असे परकीय चलन मिळते. आपली
निर्यात वाढल्यामुळे देशाची आर्थिक स्थिती चांगली होण्यास मदत मिळते.
प्र.6. तुमच्या शाळेच्या परिसरात, घराशेजारी कोणकोणत्या
औषधी वनस्पती लावाल? का?
उत्तर:
आम्ही आमच्या शाळेच्या परिसरात, घराशेजारी कडूनिंब, शतावरी, अश्वगंधा, आवळा, हिरडा, दुर्वा , तुळस, यांसार्द्ख्या वनस्पती लावू . या वनस्पतींमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत आणि या वनस्पतींची लागवड करून त्यांचे जतन करणे सोपे आहे.
********