18. ध्वनी : ध्वनीची निर्मिती प्रश्न उत्तरे सातवी सामान्य विज्ञान | Dhwani Dhwanichi Nirmiti Swadhyay Prashn Uttare ७vi

इयत्ता सातवी सामान्य विज्ञान स्वाध्याय धडा १८ ध्वनी ध्वनीची निर्मिती स्वाध्याय इयत्ता सातवी Dhwani Dhwanichi Nirmiti question answer in Marathi
Admin

इयत्ता सातवी सामान्य विज्ञान  ध्वनी : ध्वनीची निर्मिती स्वाध्याय प्रश्न उत्तरे | 7class science question answer Dhwani Dhwanichi Nirmiti



इयत्ता सातवी सामान्य विज्ञान धडा अठरावा स्वाध्याय प्रश्न उत्तरे  इयत्ता सातवी सामान्य विज्ञान गाईड pdf  इयत्ता सातवी सामान्य विज्ञान स्वाध्याय धडा १८  ध्वनी ध्वनीची निर्मिती स्वाध्याय इयत्ता सातवी  Dhwani Dhwanichi Nirmiti question answer in Marathi medium  ७vi vidnyan Dhwani Dhwanichi Nirmiti swadhyay

प्र.1. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.


अ. कोणत्या ही वस्तूच्या लयबद्ध .............ध्वनी  निर्माण होतो.

उत्तर: कोणत्या ही वस्तूच्या लयबद्ध  कंपनांमुळे ध्वनी  निर्माण होतो.


आ. ध्वनीची  वारंवारिता ........... मध्ये मोजतात.

उत्तर: ध्वनीची  वारंवारिता हर्टझ मध्ये मोजतात.


इ. ध्वनीचा ............. कमी झाल्या स त्या चा आवाजही कमी होतो.

उत्तर: ध्वनीचा आयाम कमी झाल्या स त्या चा आवाजही कमी होतो.


ई. ध्वनीच्या ............. साठी माध्यमाची आवश्यकता असते.

उत्तर: ध्वनीच्या प्रसारणा साठी माध्यमाची आवश्यकता असते.


 इयत्ता सातवी सामान्य विज्ञान धडा अठरावा स्वाध्याय प्रश्न उत्तरे | इयत्ता सातवी सामान्य विज्ञान गाईड pdf | इयत्ता सातवी सामान्य विज्ञान स्वाध्याय धडा १८


प्र.2. योग्य जोड्या जुळवा.

‘अ’ गट

‘ब’ गट (उत्तरे)

अ.बासरी

3. हवेतील कंपने

आ. वारंवारिता

4. Hz मध्ये मोजतात

इ.ध्वनीची पातळी

5. डेसिबेल

ई.श्राव्यातीत ध्वनी

2. वारंवारिता 20000 Hz पेक्षा जास्त

उ. अवश्राव्य ध्वनी

1. वारंवारिता20Hz पेक्षा कमी

 

प्र.3. शास्त्रीय कारणे लिहा.


अ. जुन्या काळी रेल्वे कधी येईल, हे पाहण्यासाठी रेल्वेच्या रुळांना कान लावून अंदाज घेत असत.

उत्तर:

१) रेल्वे गाडी रुळांवरून धावताना तिच्या चाकांचे रुळांवर होणारे आघात आणि घर्षण यांमुळे ध्वनी निर्माण होतो.

२) या ध्वनीच्या कंपनांचे प्रसारण रूळ या स्थायुरूप माध्यमातून दूरपर्यंत होते. म्हणजेच या रुळांच्या माध्यमातून ध्वनी दूरपर्यंत प्रवास करतो.

३) दूरवरच्या अंतरावर रुळांना कान लावल्यास हा ध्वनी स्पष्टपणे ऐकू आणि रेल्वेगाडी येत असल्याची कल्पना येते. म्हणूनच, जुन्या काळी रेल्वेगाडी कधी येईल, हे पाहण्यासाठी रेल्वेच्या रुळांना कान लावून अंदाज घेत असत.  

 

आ. तबला व सतार यांपासून निर्मा ण होणारा ध्वनी वेगवेगळा असतो.

उत्तर:

१) तब्ल्यामध्ये ताणलेल्या चामड्याच्या पडद्यावर आघात केल्याने त्या पडद्यात कंपने निर्माण होऊन ध्वनी उत्पन्न होतो.

२)सातारीमध्ये ताणलेल्या तारा छेद्ल्यामुळे त्या तारांमध्ये कंपने निर्माण होऊन ध्वनी उत्पन्न होतो.

३) अशा रीतीने कंपायमान होणाऱ्या वस्तू वेगवेगळ्या असल्याने निर्माण होणाऱ्या कंपनांची वारंवारिता आणि उच्चनीचता वेगवेगळी असते. म्हणून, तबला व सतार यांपासून निर्माण होणारा ध्वनी वेगवेगळा असतो.

 

इ. चंद्रावर गेल्यानंतर सोबतच्या मित्राला तुम्ही हाक मारली, तर त्याला ती ऐकू येणार नाही.

उत्तर:

१) ध्वनीचे प्रसारण होण्यासाठी माध्यमाची आवश्यकता असते.

२) चंद्रावर पृथ्वीप्रमाणे वातावरण नसते. माध्यमाचा अभाव असल्याने चंद्रावर आपण बोलताना ध्वनीचे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रसारण होत नाही. म्हणूनच चंद्रावर गेल्यानंतर सोबतच्या मित्राला हाक मारली, तर त्याला ती ऐकू येणार नाही.

 

ई. डासाच्या पंखांची हालचाल आपल्याला ऐकू येते, परंतु आपल्या हातांची हालचाल आपल्याला ऐकू येत नाही.

उत्तर:

१) डासांच्या पंखांची खालीवर अशी हालचाल अत्यंत वेगाने होते. त्याच्या पंखांची हालचाल एका सेकंदात ३०० ते ६०० एवढी असते. म्हणजेच पंखांच्या हालचालीची वारंवारिता ३०० Hz  ते ६००Hz इतकी असते.

२) त्यामुळे श्राव्य ध्वनी निर्माण होतो व आपण ती हालचाल ऐकू शकतो.

३) परंतु आपण आपल्या हातांची हालचाल इतक्या वेगाने करू शकत नाही. हातांच्या हालचालीमुळे होणारा ध्वनी हा २० Hz पेक्षा कमी वारंवारितेचा असतो.

४) असा अवश्राव्य ध्वनी आपण ऐकू शकत नाही म्हणून आपल्या हातांची हालचाल आपल्याला ऐकू येत नाही.

 

प्र.4. खालील प्रश्नां ची उत्तरे लिहा.


अ. ध्वनीची निर्मिती कशी होते?

उत्तर:

१) कोणत्याही वस्तूवर आघात झाला की, त्या वस्तूमध्ये कंपने निर्माण होतात.

२) कंप पावणारी वस्तू ध्वनीचे उगमस्थान असते.

३) वस्तूच्या कंपनांमुले ध्वनीची निर्मिती होते.


ध्वनी ध्वनीची निर्मिती स्वाध्याय इयत्ता सातवी | Dhwani Dhwanichi Nirmiti question answer in Marathi medium | vi vidnyan Dhwani Dhwanichi Nirmiti swadhyay

आ. ध्वनीची तीव्रता कशावर अवलंबून असते?

उत्तर:

ध्वनीची तीव्रता पुढील गोष्टींवर अवलंबून असते:

१) ध्वनीच्या कंपनांचा आयाम : ध्वनीची तीव्रता ही ध्वनीच्या कंपनांच्या आयामाच्या वर्गाच्या प्रमाणात असते.

२) ध्वनीच्या कंपनांची वारंवारिता : वारंवारिता जास्त असेल तर ध्वनीची तीव्रता जास्त असते.

३) ध्वनीच्या उगमस्थानापासूनचे अंतर : ऐकणाऱ्या ध्वनीच्या उगमस्थानापासूनचे अंतर कमी असेल, तर ध्वनीची तीव्रता अधिक जाणवते.

 

इ. दोलकाच्या वारंवारितेचा संबंध दोलकाची लांबी व आयाम यांच्याशी कसा असतो ते स्पष्ट करा.

उत्तर:

१) दोलकाची लांबी वाढली की दोलकाची वारंवारिता कमी होते. म्हणजेच लांबी वाढली की त्या डोलकाची एका सेकंदात होणारी दोलने कमी होतात.

२)डोलकाच्या वारंवारितेवर त्याच्या आयामाचा फारसा परिणाम होत नाही. म्हणजेच आयाम वाढला किंवा कमी झाला तरी त्या दोलकाची वारंवारिता विशेष बदलत नाही, ती जवळजवळ तेवढीच राहते.


ई. ताणून बसवलेल्या तारेतून निर्माण होणाऱ्या ध्वनीची उच्चनीचता कोणत्या दोन मार्गांनी  बदलता येते, ते स्पष्ट करा.

उत्तर:

१) तारेचा ताण वाढवला की वारंवारिता वाढते आणि निर्माण होणारा ध्वनी उच्चतम असतो. ताण कमी केला की वारंवारिता कमी होते आणि ध्वनी नीचतम होतो.

२) तारेची लांबी कमी केली की वारंवारिता वाढते, त्यामुळे निर्माण होणारा ध्वनी हा उच्चतम असतो. तारेची लांबी वाढवली की वारंवारिता कमी होते आणि निर्माण होणारा ध्वनी नीचतम असतो.

 

*******

Post a Comment

प्रिय मित्रांनो आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडल्यास, उपयोगी पडल्यास आम्हाला नक्की comment करून सांगा. धन्यवाद.