20. तारकांच्या दुनियेत प्रश्न उत्तरे सातवी सामान्य विज्ञान | Tarakanchya Duniyet Swadhyay Prashn Uttare

इयत्ता सातवी सामान्य विज्ञान  तारकांच्या दुनियेत स्वाध्याय प्रश्न उत्तरे | 7class science question answer Tarakanchya Duniyet


 

इयत्ता सातवी सामान्य विज्ञान धडा वीस स्वाध्याय प्रश्न उत्तरे  इयत्ता सातवी सामान्य विज्ञान गाईड pdf  इयत्ता सातवी सामान्य विज्ञान स्वाध्याय धडा २०  तारकांच्या दुनियेत स्वाध्याय इयत्ता सातवी  Tarakanchya Duniyet question answer in Marathi  ७vi vidnyan Tarakanchya Duniyet swadhyay

प्र.1. रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा.

(मध्यमंडळ, क्षितिज, बारा, नऊ, भासमान, वैषुविक, आयनिक)


अ. दूरवर पाहि ल्या स आकाश जमिनीला टेकल्या सारखे दिसते. त्या रेषेला ............. म्हणतात.

उत्तर: दूरवर पाहि ल्या स आकाश जमिनीला टेकल्या सारखे दिसते. त्या रेषेला क्षितिज म्हणतात.

 

आ. राशींची संकल्पना मांडताना .............वृत्त विचारात घेतले आहे.

उत्तर: राशींची संकल्पना मांडताना आयनिक वृत्त विचारात घेतले आहे.

 

इ. ऋतुमानानुसार वर्गीकरण केल्यास एका ऋतूत ............. नक्षत्रे येतात.

उत्तर: ऋतुमानानुसार वर्गीकरण केल्यास एका ऋतूत नऊ नक्षत्रे येतात.

 

उ. सूर्याचे पूर्वेस उगवणे व पश्चिमेस मावळणे हे सूर्याचे .............भ्रमण आहे.

उत्तर: सूर्याचे पूर्वेस उगवणे व पश्चिमेस मावळणे हे सूर्याचे भासमान भ्रमण आहे.

 

प्र.2. आज आठ वाजता उगवलेला तारा एका महिन्याने किती वाजता उगवलेला दिसेल? का?

उत्तर:

        तारे हे रोज चार मिनिटे लवकर उगवतात. त्यामुळे ३० दिवसांनी तो आजच्यापेक्षा १२० मिनिटे लवकर म्हणजेच २ तास लवकर उगवलेला दिसेल. आज आठ वाजता उगवलेला तर एका महिन्याने सहा वाजता आकाशात उगवलेला दिसेल.  प्रत्येक महिन्यात तर आधीच्या महिन्यापेक्षा दोन तास लवकर उग्माला असे भासते. प्रत्यक्षात पृथ्वी भ्रमण करत असते अ आणि तारे स्थिर असतात.

 

इयत्ता सातवी सामान्य विज्ञान गाईड pdf | इयत्ता सातवी सामान्य विज्ञान स्वाध्याय धडा २० | तारकांच्या दुनियेत स्वाध्याय इयत्ता सातवी


प्र.3. ‘नक्षत्र लागणे’ म्हणजे काय? पावसाळ्यात ‘मृग नक्षत्र लागले,’ म्हणतात याचा अर्थ काय?

उत्तर:

            पृथ्वी सूर्याभोवती फिरत असते. परंतु आपण पृथ्वीवरच असल्याने आपल्याला सूर्य फिरतो आहे असा भास होतो. या भ्रमणाला सूर्याचे भासमान भ्रमण असे म्हणतात. पृथ्वीवरून आकाश पाहताना निरनिराळ्या ताऱ्यांवरून आणि तारकासमूहांवरून आपल्याला हे ताऱ्यांचे भ्रमण दिसत असते. जेव्हा पृथ्वी आपले स्थान बदलते तेव्हा सूर्याच्या पार्श्वभूमीवरील रास बदलते, आला आपण सूर्याने संक्रमण केले असे म्हणतो. प्रत्येक राशीमध्ये सव्वादोन नक्षत्रे येतात. या काळात पृथ्वीवरून पहिले असता सूर्याच्या पाठीमागे ठराविक रास व त्यातील ठराविक नक्षत्र असते. जेव्हा सूर्य त्या त्या ठराविक रास व नक्षत्रासमोर येतो, तेव्हा त्या वेळेला ‘नक्षत्र लागणे’ असे म्हणतात. पावस्लायात म्हणजे जून महिन्यात ७ किंवा ८ तारखेस मृग नक्षत्र लागते असे म्हणतात.

 

प्र.4. खालील प्रश्नां ची उत्तरे लिहा.

अ. तारकासमूह म्हणजे काय?

उत्तर: 

    खगोलाच्या एका लहान भागात असलेल्या ताऱ्यांच्या गटाला तारकासमूह असे म्हणतात.


आ. आकाश निरीक्षण करण्यापूर्वी कोणती काळजी घ्यावी असे तुम्हांला वाटते?

उत्तर: 

        आकाश निरीक्षण करण्यापूर्वी पुढील काळजी घ्यावी असे मला  वाटते,

चांगल्या दर्जाची दुर्बीण, आकाश नकाशा आणि दिशा दाखवणारे होकायंत्र या साधनांची व्यवस्था करून शहरापासून दूरवर  अमावस्येच्या ( रात्री) आकाश निरीक्षण केले पाहिजे.


इ. ‘ग्रह – तारे – नक्षत्र ’ यांचा मानवी जीवनावर प्रभाव पडतो, असे म्हणणे योग्य आहे का?का?

उत्तर:

         ‘ग्रह – तारे – नक्षत्र ’ यांचा मानवी जीवनावर प्रभाव पडत नाही. वैज्ञानिक युगात अनेक पद्धतीने अवकाश संशोधन केले गेले आहे. मानवाने चंद्रावर पाऊल ठेवले आहे आणि मंगळावरदेखील जाण्याची त्याची तयार आहे. कोणत्याही संशोधनाद्वारे ‘ग्रह – तारे – नक्षत्र’ यांचा मानवी जीवनावर प्रभाव पडतो हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेले नाही. म्हणून ‘ग्रह – तारे – नक्षत्र’ यांचा प्रभाव मानवी जीवनावर पडतो असे म्हणणे योग्य ठरणार नाही.

 

प्र.5. आकृती 20.1 अनुसार ताऱ्यांची निर्मिती व वनप्रवासासंदर्भात परिच्छेद लिहा.

20. तारकांच्या दुनियेत प्रश्न उत्तरे सातवी सामान्य विज्ञान |  Tarakanchya Duniyet Swadhyay Prashn Uttare

उत्तर:

        धूळ व हायड्रोजन वायुने बनलेल्या तेजोमेघांपासून ताऱ्यांची निर्मिती होते. तेजोमेघांमध्ये गुरुत्वाकर्षण असते. यामुळे तेजोमेघांतील कणांमध्ये आकर्षण निर्माण होऊन, आकुंचनाने हे ढग दाट व गोलाकार होतात. या वेळी ढगाच्या मधल्या भागात वायूचा दाब वाढतो. तसेच त्याच्या ताप्मानामाधेही प्रचंड वाढ होते. तेथे  उर्जानिर्मिती होऊ लागते या अवस्थेला तारा म्हणतात. तेजोमेघापासून सर्वसाधारण तारा बनतो पण तो जर आकाराने मोठा असला तर त्यापासून भव्य तारा तयार होतो. या ताऱ्यांच्या तापमानात वाढ झाली तर त्यांच्यापासून तांबडा राक्षसी तारा निर्माण होतो. जर यात प्रसारण क्रिया झाली तर बिंबाभ्रिका आणि अतिदिप्त तारा तयार होतात. याउलट जर आकुंचन झाले तर श्वेतबटूची निर्मिती होते. अतिदिप्त तारा एक  तर कृष्णविवराकडे जातो किंवा त्याचा न्यूट्रॉन तर बनतो.

 

 ******

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.