८. आदर्श राज्यकर्ता स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता सातवी इतिहास नागरिकशास्त्र | Aadarsh Rajyakarta Swadhyay Iyatta Satavi Itihas

आदर्श राज्यकर्ता इयत्ता सातवी इतिहास नागरिकशास्त्र स्वाध्याय प्रश्न उत्तरे | Aadarsh Rajyakarta swadhyay prashn uttare iyatta satavi etihas nagarikshastra


प्र.१. पाठात शोधून लिहा.


() शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील जोखमीचे प्रसंग कोणते होते ?

उत्तर:

अफजलखान भेटीचा प्रसंग, पन्हाळ्याचा वेढा, शायिस्ताखानावरील छापा, आग्ऱ्यातून करून घेतलेली सुटका हे सर्व प्रसंग शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील जोखमीचे होते.

 

आदर्श राज्यकर्ता भारत धडाआठ स्वाध्याय इतिहास नागरिकशास्त्र स्वाध्याय सातवी Aadarsh Rajyakarta swadhyay 7vi Aadarsh Rajyakarta swadhyay prashn uttar

() शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेप्रसंगी जोखीम पत्करणारे कोण ?

उत्तर:

        शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेप्रसंगी जोखीम पत्करणारे हिरोजी फर्जंद आणि मदारी मेहतर हे होते.


() रोहिडखोऱ्या च्या देशमुखास शिवाजी महाराजांनी कोणती ताकीद दिली?

उत्तर:

१) शायिस्ताखानाच्या स्वारीच्या वेळी महाराजांनी रोहिडखोऱ्याच्या देशमुखास रयतेसंबंधी आपले कर्तव्य पार पाडण्याविषयी ताकीद दिली.

२) त्यांनी त्या देशमुखास गावोगाव हिंडून घाटाखाली जेथे सुरक्षित जागा असेल तेथे लोकांना नेण्यास सांगितले.

३) या कार्यास ‘एका घडीचा दिरंग न करणे’ असे त्यास बजावले.

४) जर रयतेची अशी काळजी घेतली नाही तर मुघल सैन्य येईल, लोकांना कैद करेल आणि त्याचे पाप तुमच्या माथी बसेल.’ अशी सक्त ताकीद शिवाजी महाराजांनी रोहिडखोऱ्या च्या देशमुखास दिली.


() शिवाजी महाराजांची कोणती प्रेरणा भावी पिढ्यांना आदर्श राहील?

उत्तर:

        शिवाजी महाराजांनी केलेले स्वराज्यकार्य आणी स्वराज्याचे सुराज्यात केलेले रुपांतर यांची प्रेरणा भावी पिढ्यांना सतत आदर्श राहील.

आदर्श राज्यकर्ता प्रश्न उत्तरे इयत्ता सातवी ,| आदर्श राज्यकर्ता या पाठाचा स्वाध्याय

पाठ  आठवा  आदर्श राज्यकर्ता स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता सातवी | इयत्ता सातवी इतिहास गाईड

प्र. . लिहिते व्हा .


() रयतेचे नुकसान होऊ नये म्हणून शिवरायांनी सैनिकांना कोणती ताकीद दिली ?

उत्तर:

१) शेतकऱ्याच्या शेतातील भाजीदेखील जबरदस्तीने घेता कामा नये.

२) सैनिकांच्या युद्ध हालचाली पेरणीच्या आड येता कामा नयेत.

३) शेतातील उभी पिके कापू नयेत.

४) शेतकऱ्याची घरे लुटू नयेत.

 

() शिवाजी महाराजांचे धार्मिक धोरण सहिष्णू होते, हे कोणत्या बाबीवरून दिसून येते?

उत्तर:

१) इस्लामी सत्तांशी संघर्ष करताना मात्र महाराजांनी स्वराज्यातील मुसलमनांना आपले प्रजाजन मानले.

२) शत्रूकडून एखादा प्रदेश जिंकून घेतला असता, तेथील मुस्लिम धर्मस्थळांना आधीपासून प्राप्त असलेल्या सोई-सवलती ते तशाच चालू ठेवत असत.

३) मोहिमेवर असताना माशिदिना धक्का लागू नये , कुराणाची प्रत हाती पडल्यास, ती सन्मानाने मुसलमान व्यक्तीच्या ताब्यात द्यावी असा सैनिकांसाठी सक्त नियम केला होता.

४) महाराजांनी आपल्या लष्करात अनेक मुसलमान सहभागी करून घेतले होते.


() शिवाजी महाराजांचे लष्करविषयक धोरण स्पष्ट करा.

उत्तर:

१)   महाराज्यांच्या लष्कराची शिस्त कडक होती.

२)   शिवाजी महाराजांनी सैनिकांना जहागीर देण्याची पद्धत बंद करून वेतन रोख रकमेत व वेळच्या वेळी देण्याची व्यवस्था केली.

३)   मोहिमेत पराक्रम गाजवणाऱ्या सैनिकांचा मानसन्मान केला जाई.

४)   लढाईममध्ये जे सैनिक मृत्यू पावत, त्यांच्या कुटुंबियांच्या उदरनिर्वाहाची काळजी घेत असत.

५)   लढाईत शरण आलेल्या किंवा कैद झालेल्या शत्रू सैनिकांना ते चांगली वागणूक देत असत.


प्र.. एका शब्दात लिहा.


() स्वराज्या च्या आरमारातील महत्त्वा चा अधि कारी -

उत्तर: दौलतखान


() शिवाजी महाराजांवर काव्य रचणारा तमीळ कवी -

उत्तर: सुब्रमण्यम भारती


() बुंदेलखंडात स्वतंत्र राज्य निर्माण करणारा -

उत्तर: छत्रसाल


() पोवाड्याद्वारे शिवाजी महाराजांची महती सांगणारे

उत्तर: महात्मा जोतीराव फुले.

******

Aadarsh Rajyakarta swadhyay prashn uttar | Itihas nagarikshastra swadhyay satavi pdf | Itihas nagarikshastra swadhyay satvi question answers

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.