मराठ्यांचा स्वातंत्र्यसंग्राम इयत्ता सातवी इतिहास नागरिकशास्त्र स्वाध्याय प्रश्न उत्तरे | Marathyancha Swatantrysangram swadhyay prashn uttare iyatta satavi etihas nagarikshastra
प्र. १. योग्य पर्याय निवडा.
(१) औरंगजेब यांच्या पराक्रमाने जेरीस आला होता.
(अ) शाहजादा
अकबर (ब) छत्रपती संभाजी महाराज (क) छत्रपती राजाराम महाराज
उत्तर: छत्रपती संभाजी महाराज
(२) बादशाहाच्या तंबूवरील सोन्याचा कळस कापणारे
(अ) संताजी
व धनाजी (ब) संताजी घोरपडे व विठोजी चव्हाण (क) खंडो बल्लाळ व रूपाजी भोसले
उत्तर:
संताजी
घोरपडे व विठोजी चव्हाण
(३) गोव्याच्या लढाईत पराक्रमाची शर्थ करणारा
(अ) येसाजी
कंक (ब) नेमाजी शिंदे (क) प्रल्हाद निळाजी
उत्तर:
येसाजी कंक
मराठ्यांचा स्वातंत्र्यसंग्राम या पाठाचा स्वाध्याय | पाठ नऊ मराठ्यांचा स्वातंत्र्यसंग्राम स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता सातवी
प्र. २. पाठात शोधून लिहा.
(१) संभाजी
महाराजांना जंजिन्याची मोहीम अर्धवट सोडून माघारी का फिरावे लागले ?
उत्तर:
१) मराठी
मुलखाला उपद्रव देणाऱ्या जंजिऱ्या सिद्दीविरुद्ध इ.स.१६८२ मध्ये मोहीम उघडली.
२) मराठी
सैन्याने त्याच्या ताब्यातील दंडाराजपुरी या किल्ल्याला वेढा घातला आणि जंजिऱ्यावर
तोफांचा भडीमार केला.
३) परंतु
त्याच वेळी मुघलांचे सैन्य स्वराज्यावर चालून आले.
त्यामुळे संभाजी महाराजांना जंजिन्याची मोहीम अर्धवट सोडून
माघारी फिरावे लागले.
(२) संभाजी
महाराजांनी पोर्तुगिजांना धडा शिकवण्याचे का ठरवले ?
उत्तर:
१) गोव्याचे
पोर्तुगीज हे शिवाजी महाराजांच्या काळापासूनच स्वराज्यविस्ताराच्या कार्यात अडथळा
आणत असत.
२)
महाराजांच्या मृत्यूनंतर मुघलांनी स्वराज्यावर आक्रमण केले.
३)
पोर्तुगीजांनी संभाजी महाराजांविरुद्ध औरंगजेब बादशाहाशी हातमिळवणी केली.
म्हणून संभाजी
महाराजांनी पोर्तुगिजांना धडा शिकवण्याचे ठरवले.
Itihas nagarikshastra swadhyay satavi pdf | Itihas nagarikshastra swadhyay satvi question answers
(३) राजाराम
महाराजांनी जिंजीला जाताना स्वराज्याच्या रक्षणाची जबाबदारी कोणावर सोपवली ?
उत्तर:
(४) महाराणी
ताराबाईंच्या पराक्रमाचे वर्णन देवदत्त या कवीने कोणत्या शब्दांत केले आहे?
उत्तर:
महाराणी ताराबाईंच्या पराक्रमाचे वर्णन देवदत्त या कवीने पुढील शब्दांत केले आहे.
ताराबाई रामराणी | भद्रकाली कोपली |
दिल्ली झाली दीनवाणी | दिल्लीसहाचे गेले
पाणी |
रामराणी भद्रकाली | रणरंगी क्रुद्ध झाली |
प्रयत्नाची वेळ आली | मुगल हो सांभाळा ||
याचा अर्थ पुढील प्रमाणे आहे:
“
राजारामांची पत्नी ताराबाई भद्रकाली प्रमाणे कोपायमान झाली.
त्यामुळे
दिल्लीच्या बादसहाची – औरंगजेबाची अवस्था दिनवाणी झाली, त्याचे तेज हरपले.
भद्रकाली प्रमाणे पराक्रमी असणारी राजारामांची राणी ताराबाई मुघलांशी युद्ध करायला सज्ज होऊन तिने रणरागिणीचे रूप धरण केले; म्हणून मुघालांनो, आता स्वतःला सांभाळा !”
प्र.३. का ते लिहा.
(१) औरंगजेबाने आपला मोर्चा आदिलशाही व कुतुबशाही राज्यांकडे वळवला.
उत्तर:
१)
मराठ्यांचे राज्य जिंकण्याच्या इराद्याने औरंगजेब दक्षिणेत आला.
२) पण,
संभाजी महाराजांच्या पराक्रमामुळे व युद्धकौशल्यामुले दीर्घकाळ प्रयत्न करूनही
त्याला हे राज्य जिंकता आले नाही त्यामुळे त्याने ही मोहीम स्थगित करून आपला
मोर्चा आदिलशाही व कुतुबशाही या राज्यांकडे वळवला.
(२) संभाजी महाराजांनंतर मुघलांशी निकराचा लढा देण्यासाठी मराठे सज्ज झाले.
उत्तर:
१)
औरंगजेबाने संभाजी महाराजांना अत्यंत निर्दयीपणे ठार केले.
२)
मराठ्यांच्या या छत्रपतीने स्वाभिमान न सोडता अतिशय धैर्याने मृत्यूला तोंड दिले.
३)
त्यांच्या बलिदानाची प्रेरणा घेऊन मुघलांशी निकराचा लढा देण्यासाठी मराठे सज्ज
झाले.
(३) महाराणी येसूबाईंच्या नेतृत्वाखाली रायगड लढवावा, असे धोरण ठरवण्यात आले.
उत्तर:
१) संभाजी
महाराजांच्या मृत्यूनंतर मराठ्यांचे राज्य जिंकण्यासाठी औरंगजेबाने झुल्फिकारखानाला
रायगडावर पाठवले.
२) झुल्फिकारखानाने
रायगडाला वेढा घातला त्या वेळी गडावर राजाराम महाराज, त्यांची पत्नी ताराबाई,
संभाजी महाराजांची पत्नी येसूबाई व पुत्र शाहू होते.
३) या
सर्वांचे एकत्र राहणे धोक्याचे होते.
४) म्हणून
राजाराम महाराजांनी या वेढ्यातून बाहेर पडावे व महाराणी येसूबाईंच्या नेतृत्वाखाली
रायगडलढवावा, असे धोरण ठरवण्यात आले.
*******