मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार इयत्ता सातवी इतिहास नागरिकशास्त्र स्वाध्याय प्रश्न उत्तरे | Marathyanchya Sattecha Vistarswadhyay prashn uttare iyatta satavi etihas nagarikshastra
प्र. १. म्हणजे काय ?
(१) चौथाई –
उत्तर:
कोणत्याही
सत्तेला अन्य प्रदेशातून महसुली उत्पन्नाच्या एक-चतुर्थांश भाग गोळा करण्याचा जो
हक्क असतो, त्याला ‘चौथाई’ असे म्हणतात.
(२) सरदेशमुखी –
उत्तर:
कोणत्याही सत्तेला अन्य प्रदेशात जो महसूल
जमा होतो, त्या महसुली उत्पन्नाच्या एक-दशांश भाग वसूल करण्याच्या अधिकाराला ‘सरदेशमुखी’
असे म्हणतात.
प्र.२. एका शब्दात लिहा.
(१) बाळाजी मूळचा कोकणातील या गावचा होता....
उत्तर: श्रीवर्धन
(२) बुंदेलखंडात याचे राज्य होते....
उत्तर:
छत्रसाल राजाचे
(३) या ठिकाणी बाजीरावाचा मृत्यू झाला....
उत्तर:मध्यप्रदेशातील
रावेरखेडी
(४) पोर्तुगिजांचा पराभव यांनी केला....
उत्तर:
चिमाजी आप्पा
प्र. ३. लिहिते व्हा .
(१) कान्होजी आंग्रे
उत्तर:
१) कान्हाजी
आंग्रे हा मराठ्यांच्या आरमाराचा प्रमुख होता.
२) त्याने
महाराणी ताराबाईंची बाजू घेऊन शाहू महाराजांच्या मुलखावर हल्ले केले.
३) त्यामुळे
त्याच्यासमोर कठीण परिस्थिती निर्माण झाली. या परिस्थितीमध्ये शाहू महाराजांनी
बाळाजीला कान्होजी आंग्रेविरुद्ध पाठवले.
४) बाळाजीने
युद्ध टाळून उत्सद्देगिरीने कान्होजीस शाहू महाराजांकडे वळवले.
(२) पालखेडची लढाई
उत्तर:
१) मुघल
बादशाहा फार्रुखसियर याने निअजाम-उल-मुल्क याची दख्खन चा सुभेदार म्हणून नेमणूक
केली.
२) बादशाहाने
मराठ्यांना दक्षिणेतील मुघल सुभ्यांतून चौथाई-सरदेशमुखी वसूल करण्याचे अधिकार दिले
होते. याला निजामाचा विरोध होता.
३) निजामाने
पुणे परगण्याचा काही भाग जिंकून घेतला.
४) बादशाहाने
निजामाला शह देण्याचे ठरवले. त्याने निजामाच्या औरंगाबादजवळ पालेखेद येथे पराभव
केला. तेव्हा त्याने मराठ्यांचा चौथाई-सरदेशमुखी वसूल करण्याचा हक्क मान्य केला.
हीच पालखेडची
लढाई होय.
(३) बाळाजी विश्वनाथ
उत्तर:
1)
शाहू महाराजांची मुघलांच्या कैदेतून
मुक्तता झाल्यावर त्यांनी बाळाजी विश्वनाथ भट याला पेशवा केले.
2)बाळाजी
मूळचा कोकणातील श्रीवर्धन गावचा. तो कर्तृत्ववान व अनुभवी होता.
3)शाहू
महाराज हेच मराठ्यांच्या राज्याचे खरे वारस आहेत, हे पटवून
देऊन अनेक
4)अनेक सरदारांना त्याने शाहू
महाराजांकडे वळवले.
5) इ.स.१७२० मध्ये बाळाजी विश्वनाथ
यांचा मृत्यू झाला.
(४) पहिला बाजीराव
उत्तर:
१) शाहू
महाराजांनी बाळाजीविश्वनाथ यांच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा बाजीराव (पहिला) याची
इ.स. १७२० मध्ये पेशवेपदी नेमणूक केली.
२)पेशवेपदाच्या
२० वर्षांच्या कालावधीत त्याने मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार घडवून आणला.
३) त्याने
निजामाचा पालखेडच्या लढाईत पराभव करुन्न माळव्याच्या सुभेदाराची सनद मिळवली.
४) बुंदेलखंडावर
वर्चस्व मिळवले व वसईचा किल्ला जिंकून घेतला.
प्र.४. कारणे लिहा.
(१) मराठेशाहीत स्वतंत्र दोन राज्ये निर्माण झाली.
उत्तर:
१)
मुघलांच्या कैदेतून सुटलेल्या शाहूमहाराजांनी मागणी केलेला छत्रपतीपदावरील हक्क
ताराबाईंनी अमान्य केला.
२) त्यामुळे
शाहू महाराजांनी खेड येथे त्यांचा पराभव करून सातारा जिंकला व स्वतःस राज्याभिषेख
करून घेतला.
३) ताराबाईंनी
शाहू महाराजांशी असलेला आपला विरोध पुढे चालू ठेवून पुन्हा पन्हाळगडावर आपला मुलगा
दुसरा शिवाजी यास छत्रपती म्हणून घोषित केले व दुसरी स्वतंत्र गादी निर्माण केली.
त्यामुळे मराठेशाहीत स्वतंत्र दोन राज्ये निर्माण झाली.
(२) आझमशाहाने छत्रपती शाहू महाराजांची कैदेतून सुटका केली.
उत्तर:
१) औरंगजेबाच्या
मृत्यूमुळे दिल्लीच्या गाडीसाठी त्याच्या मुलांमध्ये संघर्ष सुरु झाला.
२) दक्षिणेत
असलेला शाहाजादा आजमशाहा गादी मिळवण्यासाठी उत्तरेकडे निघाला.
३) आझमशाहला
असे वाटले की, कैदेत असलेल्या शाहू महाराजांना मुक्त केल्यास महाराणी ताराबाई व
शाहूमहाराज यांच्यात छत्रपतींच्या गादीसाठी कलह होईल.
४) यांच्यातील
संघर्षामुले मराठ्यांचे सामर्थ्य कमी होईल; म्हणून आझमशाहाने छत्रपती शाहू
महाराजांची कैदेतून सुटका केली.
(३) दिल्ली दरबाराला मराठ्यां च्या साहाय्याची गरज होती.
उत्तर:
१) औरंगजेबाच्या
मृत्यूनंतर दिल्लीची मुघल सत्ता कमकुवत झाली होती.
२) तिमुघल
सत्तेला वायव्येकडून होणाऱ्या इराणी व अफगाणी आक्रमणांची भीती होती.
३)
आसपासच्या पठाण, राजपूत, जाट, रोहिले या स्थानिक सत्ताधीशांचाही धोका मुघल सत्तेला
होता.
४) दरबारात
चालणारी स्पर्धा व संघर्ष यांमुळेही ही सत्ता आतून पोखरली गेली होती, म्हणून
दिल्ली दरबाराला मराठ्यांच्या साहाय्याची गरज होती.