७. मृदा इयत्ता सातवी भूगोल स्वाध्याय प्रश्न उत्तरे | Mruda swadhyay 7vi bhugol

इयत्ता सातवी भूगोल धडा 7 मृदा स्वाध्याय प्रश्न उत्तरे मृदा इयत्ता सातवी भूगोल स्वाध्याय प्रश्न उत्तरे Mruda swadhyay 7vi Bhugol 7th class bhugol
Admin

 Mruda swadhyay 7vi Bhugol | मृदा  इयत्ता सातवी भूगोल स्वाध्याय प्रश्न उत्तरे


इयत्ता सातवी भूगोल धडा 7 मृदा  स्वाध्याय प्रश्न उत्तरे  7th class bhugol swadhyay pdf  7th geography Maharashtra board question answers chapter 7 Marathi medium  Iyatta satavi bhugol swadhyay dhada 7


प्रश्न १. पुढील तक्ता पूर्ण करा.

उत्तर:

 

घटक

मृदानिर्मितीमधील भूमिका

मूळ खडक

मूळ खडकाचे विदारण होऊन मृदेचा प्रकार ठरतो.

प्रादेशिक हवामान

प्रदेशाचे हवामान विदारण प्रक्रियेची तीव्रता ठरवते. एकाच मूळ खडकापासून वेगवेगळ्या प्रकारची मृदा हवामानातील फरकामुळे तयार झालेली पाहायला मिळते.

सेंद्रिय खत

सेंद्रिय खताद्वारे समुचा तोल राखला जातो.

सूक्ष्म जीवाणू

सूक्ष्मजिवाणूंमार्फत मृत वनस्पती व प्राणी याच्या विघटनाची प्रक्रिया होऊन मृदेतील ह्युमसचे प्रमाण वाढते.

 


प्रश्न २. कशामुळे असे घडते?

 

(१) सह्याद्रीच्या पश्चिम भागात बेसाल्ट खडकापासून जांभी मृदा तयार होते.

उत्तर:

१) सह्याद्रीच्या पश्चिम भागात पावसाचे प्रमाण जास्त आहे.

२) सह्याद्रीच्या पश्चिम भागात हवामान दमट आहे.

३) त्यामुळे तेथे बेसाल्ट या खडकाचे अपक्षालन होऊन जांभी मृदा तयार होते.

 

(२) मृदेत ह्युमसचे प्रमाण वाढते.

उत्तर:

१) गांडूळखत, शेणखत, कंपोस्ट खत यांसारख्या सेंद्रिय खतांचा वापर केल्याने मृदेच्या सामुचा तोल राखला जातो.

२) सामुची योग्य पातळी असलेल्या मृदेमध्ये सूक्ष्मजीव अधिक संख्येने आढळतात.

३) या सूक्ष्मजिवांमुळे पालापाचोळा, वनस्पतींची मुळे, प्राण्यांचे मृतावशेष इत्यादींचे विघटन होते. या विघटीत झालेल्या जैविक पदार्थास ह्युमस म्हणतात.

४) अशा प्रकारे, सेंद्रिय खतांचा वापर वाढवला असता. मृदेत ह्युमसचे प्रमाण वाढते.

 

(३) विषुववृत्तीय हवामान प्रदेशात मृदानिर्मितीची प्रक्रिया जलद घडते.

उत्तर:

१) विषुववृत्तीय प्रदेशात वर्षभर सुमारे २७ अंश सेल्सिअस ते ३० अंश सेल्सिअस इतके तापमान असते.

२) या प्रदेशामाध्ये वर्षभर सरासरी २००० ते ३००० मिमी पाऊस पडतो.

३) जास्त तापमान व जास्त पाऊस यांमुळे विषुववृत्तीय  हवामान प्रदेशात मृदानिर्मितीची प्रक्रिया जलद घडते.

 

(४) मृदेत क्षारतेचे प्रमाण वाढते.

उत्तर:

१) शेतीच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणावर जलसिंचनाचा वापर केला जातो.

२) अतिरिक्त जलसिंचनामुळे जमिनीतील क्षार वर येतात व जमीन क्षारयुक्त बनते.


इयत्ता सातवी भूगोल धडा 7 मृदा  स्वाध्याय प्रश्न उत्तरे

इयत्ता सातवी मृदा  स्वाध्याय | इयत्ता सातवी भूगोल प्रश्न उत्तरे धडा 7


(५) कोकणातील लोकांच्या आहारात तांदूळ (धान) जास्त असतो.

उत्तर:

१) कोंकणातील हवामान उष्ण व दमट आहे. येथे गाळाची मृदा असून येथे दरवर्षी भरपूर पाऊस पडतो. हे घटक तांदळाच्या पिकाच्या वाढीस उपयुक्त ठरतात. त्यामुळे कोकणात तांदळाचे (धान) मोठ्या प्रमाणात उत्पादन होते.

२) स्थानिक उत्पादनानुसार मानवाचा आहार निश्चित होतो. त्यामुळे कोकणातील लोकांच्या आहारात तांदूळ (धान)  जास्त असतो.

 

(६) मृदेची धूप होते.

उत्तर:

१) वाहत्या पाण्याबरोबर मृदेचा वरचा थर वाहून जातो.

२) वेगवान वाऱ्यामुळे देखील मृदेची झीज होते.

३) जमिनीचा तीव्र उतार देखील मृदेची धूप होण्यास कारणीभूत ठरतो.

अशा प्रकारे वाहते पाणी, वरा आणि प्रकृतीत रचनेतील विविधता व हवामान इत्यादी घटकांमुळे मृदेची धूप होते.

 

(७) मृदेची अवनती होते.

उत्तर:

१) शेतीतून अधिक उत्पन्न मिळविण्यासाठी रासायनिक खते, जंतुनासके, तणनासके व जलसिंचन इत्यादी बाबींचा वापर केला जातो.

२) रासायनिक द्रव्यांच्या अतिरिक्त वापरामुळे मृदेतील पोषक द्रव्ये कमी होतात. मृदेतील ह्यूमसचे प्रमाण कमी होते व मृदेचा सामू बिघडतो.

३) अतिरिक्त जलसिंचनामुळे मृदेतील क्षारांचे प्रमाण वाढते. त्यामुळे मृदेचे आरोग्य बिघडते.

अशा प्रकारे रसायने, खते व जलसिंचन यांच्या अतिरेकी वापरामुळे मृदेची अवनती होते.


Iyatta satavi bhugol swadhyay dhada 7 | Class 7 std geography solutions chapter 7

प्रश्न ३. माहिती लिहा.

 

(१) मृदा संधारणाचे उपाय.

उत्तर:

१) समतल चर : उतार असलेल्या जमिनीवर समतल चर खोदल्यामुळे उतारावरून येणाऱ्या पाण्याचा वेग कमी होतो व मृदेची धूप थांबते तसेच या चरांमुळे थांबलेले पाणी जमिनीत मुरण्यास मदत होते.

२) वृक्षलागवड : वनस्पतींची मुळेमाती धरून ठेवतात, त्यामुळेही मृदेची धूप थांबते.

३) पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम : पाणलोट क्षेत्र विकास अंतर्गत ग्रामीण भागात शेतात उताराच्या दिशेने बांधबंदिस्ती करणे, हा कार्यक्रम राबवला आहे; त्यामुळे मृदेची धूप होणेही कमी झाले आहे.

 ४) जलयुक्त शिवार योजना : या शासनाच्या योजनेअंतर्गत शेतांना बांध घालणे, लहान लहान नाल्यांचेपाणी अडवणे यांसारखी कामे केल्यामुळे मृदा संधारण झाले आहे.

 

 (२) सेंद्रिय पदार्थ

उत्तर:

१) गांडूळखत, शेणखत, कंपोस्ट खते ही सेंद्रिय खते होत.

२) शेणखत, गांडू्ळखत, कंपोस्ट खत यांचा वापर केल्यास मृदेतील सामूचा तोल राखला जातो. त्यामुळे मृदेतील ह्युमसचेप्रमाण वाढण्यास मदत होते व मृदेची

सुपीकता टिकून राहते.

३) त्यामुळे शेतीसाठी सेंद्रिय खतांचा वापर करणे आवश्यक आहे.

 

(३) विशिष्ट पिके घेण्यासाठी शेतातील मृदा सक्षम आहे का, याची  माहिती मिळण्याचे ठिकाण.

उत्तर:

        विशिष्ट पिके घेण्यासाठी शेतातील मृदा सक्षम आहे का याची महाराष्ट्र शासन-कृषी विभाग, जिल्हा मृदा परीक्षण केंद्र, महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठे या ठिकाणी माहिती मिळू शकते.

 

(४) वनस्पती जीवनातील मृदेचे महत्त्व.

उत्तर:

१) सुपीक मृदा व वनस्पती जीवन : सुपीक मृदेत वनस्पतींच्या वाढीसाठी आवशकत पोषक द्रव्ये मोठ्या प्रमाणावर असतात. त्यामुळे सुपीक जमिनीत वनस्पती जीवन मोठ्या प्रमाणावर समृद्ध होते. उदा: विषुववृत्तीय प्रदेश

२) नापीक मृदा व वनस्पती जीवन :  नापीक मृदेमध्ये वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक असणारी पोषकद्रव्ये कमी प्रमाणात असतात. त्यामुळे नापीक जमिनीत वनस्पती जीवन कमी प्रमाणात आढळते. उदा: वाळवंटी प्रदेश.

३) मृदेची कमतरता: मृदेची काम्तारतात असणार्या प्रदेशात वनस्पती जीवनाचा अभाव आढळतो. उदा. ध्रुवीय प्रदेश.

 

प्रश्न ४. मृदेच्या संदर्भात तक्ता पूर्ण करा.

उत्तर:

 

क्रिया

परिणाम

सुपीकता वाढते / कमी होते.

बांधबंदिस्ती करणे.

सुपीक मृदा पावसाच्या पाण्यासोबत वाहून जात नाही

सुपीकता कमी होते.

वृक्ष लागवड

वाऱ्याचा वेग कमी झाला.

सुपीकता वाढते

काही काळ जमीन

पडीक ठेवणे.

मृदेची सुपीकता टिकून राहते.

सुपीकता वाढते

सेंद्रिय खतांचा वापर.

ह्युमसचे प्रमाण वाढले.

सुपीकता वाढते.

उताराच्या दिशेने आडवे चर खोदणे.

उतारावरील येणाऱ्या पाण्याचा वेग कमी होऊन मृदेची झीज थांबते.

सुपीकता वाढते.

शेतात पालापाचोळा जाळणे.

मृदेतील राखेचे प्रमाण वाढते.

सुपीकता कमी होते.

सेंद्रिय खतांचा वापर

सूक्ष्मजीवांना पोषक ठरले.

सुपीकता वाढते.

अतिरिक्त जलसिंचन

क्षारतेचे प्रमाण वाढले.

सुपीकता कमी होते.

रासायनिक खतांचा अतिवापर करणे.

जमिनीतील सूक्ष्मजीवांचे प्रमाण व परिणामी ह्युमसचे प्रमाण कमी होणे.

सुपीकता कमी होते.

✒ ✒ ✒ ✒ ✒ ✒ ✒ ✒ ✒ ✒

Post a Comment

प्रिय मित्रांनो आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडल्यास, उपयोगी पडल्यास आम्हाला नक्की comment करून सांगा. धन्यवाद.