९. कृषी इयत्ता सातवी भूगोल स्वाध्याय प्रश्न उत्तरे | Mruda Swadhyay 7vi bhugol

इयत्ता सातवी भूगोल धडा 9 कृषी स्वाध्याय प्रश्न उत्तरे कृषी इयत्ता सातवी भूगोल स्वाध्याय प्रश्न उत्तरे Krushi swadhyay 7vi Bhugol 7th class bhugol
Admin

 Krushi swadhyay 7vi Bhugol | कृषी  इयत्ता सातवी भूगोल स्वाध्याय प्रश्न उत्तरे


प्रश्न   १. खालील विधानांसाठी योग्य पर्याय निवडा.


(१) या शेतीप्रकारात पीक बदल केला जातो.

(अ) सखोल शेती

(आ) मळ्याची शेती

(इ) व्यापारी शेती

(ई) फलोद्यान शेती


उत्तर: (अ) सखोल शेती

 

Krushi swadhyay 7vi Bhugol  7th class bhugol swadhyay pdf  7th geography Maharashtra board question answers chapter 9  Marathi medium  Iyatta satavi bhugol swadhyay dhada 9  Class 7 std geography solutions chapter 9 pdf

(२) शेतीसाठी खालीलपैकी योग्य पर्याय द्या.

(अ) फक्त नांगरणे.

(आ) प्राणी, अवजारे, यंत्र व मनुष्यबळाचा वापर.

(इ) फक्त मनुष्यबळ वापरणे.

(ई) फक्त पीक काढणे.


उत्तर: (आ) प्राणी, अवजारे, यंत्र व मनुष्यबळाचा वापर.

 

 Krushi swadhyay 7vi Bhugol


(३) भारतात शेतीचा वि कास झाला आहे, कारण...

(अ) भारतात शेतीचे दोन हंगाम आहेत.

(आ) बहुसंख्य लोक शेतीवर अवलंबून अाहेत.

(इ) भारतात पारंपरिक शेती केली जाते.

(ई) भारतात हवामान, मृदा, पाणी इत्यादी अनुकूल घटकांची उपलब्धताआहे.


उत्तर: (ई) भारतात हवामान, मृदा, पाणी इत्यादी अनुकूल घटकांची उपलब्धताआहे.

 

(४) भारतात शेतीमध्ये आधुनि क पद्धती व तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे, कारण ...

(अ) सुधारित बी-बियाण्यांचे कारखाने आहेत.

(आ) रासायनि क खतनिर्मिती उद्योग आहेत.

(इ) लोकसंख्यावाढ व शेतीवर आधारित उद्योग आहेत.

(ई) आधुनिक साधने व यंत्रे उपलब्ध आहेत.


उत्तर: (इ) लोकसंख्यावाढ व शेतीवर आधारित उद्योग आहेत.


प्रश्न   २. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.


(१) शेतीसाठी जलसिंचनाचे महत्त्व विशद करा.

उत्तर:

१) भारतात पाऊस हा हंगामी व अनियमित स्वरूपाचा आहे.

२) पिकांची पाण्याची गरज जेव्हा पावसाच्या पाण्यावर भागवली जात नाही, तेव्हा कृत्रिमरीत्या पाणीपुरवठा केला जातो यालाच जलसिंचन म्हणतात.

३) पावसाचे पाणी (भूजल) हे विहरी किंवा कूपनलिकांच्या माध्यमातून मिळवले जाते तर काही ठिकाणी शेततळी खोदून पावसाचे पाणी साठवले जाते.

४) काही ठिकाणी तुषारसिंचन, ठिबकसिंचन इत्यादी  तंत्रांचा वापर करून शेतीतून मोठ्या प्रमाणावर उत्पन्न घेतले जाते.


(२) जलसिंचनासाठी वापरल्या जाणाऱ्या कोणत्याही दोन पद्धतींची तुलनात्मक माहिती  लिहा.

उत्तर:

१) विहीर सिंचन :

१) विहीर खणण्यासाठी लहान क्षेत्र पुरेसे असते.

२) विहीर सिंचन हा स्त्रोत व्यक्तिगत किंवा सार्वजनिक स्वरूपाचा असतो.

३) विहीर सिंचन ही जलसिंचनाची कमी खर्चिक पद्धत आहे.

२) कालवे सिंचन :

१) धरणे बांधण्यासाठी मोठ्या क्षेत्राची आवश्यकता असते.

२) कालवे सिंचन हा स्त्रोत सार्वजनिक स्वरूपाचा असतो.

३) कालवे सिंचन ही जलसिंचनाची जास्त खर्चिक पद्धत आहे.

 

(३) शेतीचे प्रमुख प्रकार सांगा आणि सखोल व विस्तृत धान्यशेतीची माहिती लिहा.

उत्तर:

१) निर्वाह शेती आणि व्यापारी शेती हे शेतीचे प्रमुख प्रकार आहेत.

§     सखोल धान्य शेती:

१) कमीत कमी जागेमध्ये जास्तीत जास्त उत्पादन काढण्याच्या शेतीप्रकाराला सखोल शेती म्हणतात.

२) सखोल शेती हा निर्वाह शेतीचा उपप्रकार आहे.

३) सखोल शेतीतून मिळणारे उत्पन्न हे कुटुंबाची अन्नधान्याची गरज भागवण्यास पुरेल इतके असते.

४) सखोल शेतीमध्ये प्राणिज उर्जेचा जास्त वापर होतो.

५) या प्रक्रचेई शेती प्रामुख्याने विकसनशील प्रदेशात आढळते.

§     विस्तृत धान्य शेती:

१) मोठ्या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पादन काढण्याचा शेतीप्रकार म्हणजे विस्तृत शेती होय.

२) विस्तृत शेती हा व्यापारी शेतीचा उपप्रकार आहे.

३) विस्तृत शेतीतील शेताचे क्षेत्र २०० हेक्टर किंवा अधिक असते.

४) मोठे क्षेत्र व विरळ लोकसंख्या यांमुळे ही शेती प्रामुख्याने अत्याधुनिक यंत्रांचा वापर करून केली जाते.

 इयत्ता सातवी कृषी भूगोल स्वाध्याय प्रश्न उत्तरे | इयत्ता सातवी भूगोल प्रश्न उत्तरे धडा 9


(४) मळ्याच्या शेतीची वैशिष्ट्ये लिहा.

उत्तर: मळ्याच्या शेतीची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत:

१) माळ्याच्या शेतीचे क्षेत्र ४० हेक्टर किंवा त्यापेक्षा अधिक असते.

२)  शेतीचे क्षेत्र डोंगरउतारावर असल्याने यंत्रांचा वापर फारसा करता येत नाही. त्यामुळे माळ्याच्या  शेतीत स्थानिक मनुष्यबळाचेमहत्त्व अधिक असते.

३)  या प्रकारच्या शेतीमध्ये अन्नधान्याचे उत्पादन होत नाही, केवळ व्यापारी पिकांचेच उत्पादन घेतले जाते. उदा., चहा, रबर, कॉफी, नारळ, कोको, मसाल्याचे पदार्थ इत्यादी.

४) या प्रकारच्या शेतीची सुरुवात व विस्तार विशेषतः वसाहतकाळात () झाला. बहुतांशी मळ्याची शेती ही उष्ण कटिबंधातच केली जाते.

५) दीर्घकालिक पिके, शास्त्रशुद्ध पद्धतीचा अवलंब, निर्यातक्षम उत्पादने, प्रक्रिया करणेइत्यादींमुळे या शेतीसाठीही मोठी भांडवल गुंतवणूक करावी लागते.

६) या प्रकारची शेती भारतासह दक्षिण आशियातील देश, आफ्रिका, दक्षिण व मध्य अमेरिका इत्यादी प्रदेशांत केली जाते.

 

(५) तुमच्या जवळच्या भागात कोणकोणती पिके होतात? त्याची  भौगोलिक कारणे कोणती?

उत्तर:

१) माझ्या जवळच्या भागात १) तांदूळ २) नाचणी ३) काजू ४) आंबा ५) नारळ ६) सुपारी इत्यादी उत्पादने घेतात.

भौगोलिक कारणे :

१) तांदळाच्या पिकासाठी जास्त तापमान व भरपूर पर्जन्य तसेच जांभी वालुकामय मृदा आवश्यक्त असते. कोकणातील हवामान व जमीन ही तांदळाच्या तसेच नाचणी च्या पिकाच्या वाढीसाठी अनुकूल आहे.

२) नारळ, काजू, फणस, सुपारी या पिकांना काही काल पर्जन्य , जास्त तापमान व काही काल कोरडा ऋतू अशी हवामानविषयक स्थिती अनुकूल ठरते. कोकणात अशा प्रकारचे हवामान आढळत असल्याने या पिकांसाठी कोकणातील हवामान पोषक ठरते.

 

(६) भारतातील शेतीचे स्वरूप हंगामी असण्याचे कारण काय? बारमाही शेती करण्यात कोणत्या अडचणी आहेत?

उत्तर:

अ) भारतातील शेतीचे स्वरूप हंगामी असण्याचे कारण :

        भारतातील बहुतांश शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे भारतातील शेतीचे स्वरूप हंगामी आहे.

आ) बारमाही शेती करण्यात येणाऱ्या अडचणी :

१) वर्षभर शेतीसाठी पुरेसा पाण्याचा पुरवठा उपलब्ध नसणे.

२) हवामानात सातत्याने बदल होणे.

३) विपणन व्यवस्था पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही.

४) पुरेसे भांडवल उपलब्ध नसणे.

✒ ✒ ✒ ✒ ✒ ✒ ✒ ✒

Post a Comment

प्रिय मित्रांनो आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडल्यास, उपयोगी पडल्यास आम्हाला नक्की comment करून सांगा. धन्यवाद.