Rutunirmiti Bhag 2 swadhyay 7vi Bhugol | ॠतुनिर्मिती (भाग-२) इयत्ता सातवी भूगोल स्वाध्याय प्रश्न उत्तरे
प्रश्न १. अचूक पर्याय निवडून उत्तरे लिहा. विधाने पूर्ण करा.
(१) सूर्याचे भासमान भ्रमण होते, म्हणजेच ......
(अ) सूर्य
वर्ष भरात पृथ्वीभोवती फिरतो.
(आ) सूर्य
वर्ष भरात उत्तरेकडे व दक्षिणेकडे सरकत असल्याचा भास होतो.
(इ) पृथ्वी
सतत जागा बदलते.
उत्तर:
(आ) सूर्य
वर्ष भरात उत्तरेकडे व दक्षिणेकडे सरकत असल्याचा भास होतो.
(२) पृथ्वीचा
आस कललेला नसता, तर......
(अ) पृथ्वी
स्वतःभोवती फिरलीच नसती.
(आ) पृथ्वी सूर्याभोवती
जास्त वेगाने फिरली असती.
(इ) पृथ्वीवर वेगवेगळ्या अक्षवृत्तांच्या भागात वर्षभर हवामान तेच राहिले असते.
उत्तर:
(इ) पृथ्वीवर वेगवेगळ्या अक्षवृत्तांच्या भागात वर्षभर हवामान तेच राहिले असते.
(३) २१ जून व
२२ डि सेंबर हे अयनदिन आहेत, कारण ......
(अ) २१ जून या
दिवशी सूर्य कर्कवृत्तावरून दक्षिणेकडे , तर २२ डिसेंबरला
मकरवृत्तावरून
उत्तरेकडे मार्गस्थ होतो.
(आ) सूर्याचे दक्षिणयान २१ जून ते २२ डिसेंबर या काळात होते.
(इ) पृथ्वीचे
उत्तरायण २१ जून ते २२ डिसेंबर या काळात होते.
उत्तर:
(अ) २१
जून या दिवशी सूर्य कर्कवृत्तावरून दक्षिणेकडे , तर २२
डिसेंबरला मकरवृत्तावरून उत्तरेकडे मार्गस्थ होतो.
(४) पृथ्वीचे
सूर् याभोवती परिभ्रमण व कललेला आस यांच्या एकत्रित परिणामामुळे पुढील ॠतूंची
निर्मिती होते ......
(अ) उन्हाळा, पावसाळा, परतीचा माॅन्सू न,
हिवाळा.
(आ) उन्हाळा, हिवाळा, व संतॠतू.
(इ) उन्हाळा, हिवाळा
उत्तर:
(इ) उन्हाळा, हिवाळा
Iyatta satavi bhugol swadhyay dhada 8 Class 7 std geography solutions chapter 8 pdf
प्रश्न २. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा.
(१) उत्तर
गोलार्धात ॠतूंची निर्मिती कशामुळे होते?
उत्तर:
१) २३
सप्टेंबर ते २२ डिसेंबर पृथ्वीचा उत्तर ध्रुव सूर्यापासून अधिकाधिक दूर जाऊ लागतो.
त्यामुळे पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात तापमान कमी होत जाते.
२) २२ डिसेंबर
या दिद्वाशी पृथ्वीचा दक्षिण ध्रुव सूर्याकडे जास्तीत जास्त कललेला असतो म्हणजेच
या दिवशी पृथ्वीचा उत्तर ध्रुव सूर्यापासून जास्तीत जास्त दूर असतो.
३) डिसेंबर हा
दिवस उत्तर गोलार्धातील सर्वात लहान दिनमानाचा व सर्वात मोठ्या रात्रमनाचा असतो.
४) २२ डिसेंबर
ते २१ मार्च कालावधीत उत्तर गोलार्धात दिन्मानाचा कालावधी १२ तासांपेक्षा कमी
कालावधींचा व रात्र्मानाचा कालावधीत १२ तासांपेक्षा जास्त कालावधीचा सातो. अशा
प्रकारे , उत्तर गोलार्धात ऋतूंची निर्मिती होते.
(२) संपात
स्थितीत पृथ्वीवरील दिनमान कसे असते?
उत्तर:
१) २१ मार्च व
२३ सप्टेंबर रोजी पृथ्वीचे उत्तर व दक्षिण हे दोन्ही ध्रुव सूर्यापासून समान
अंतरावर असतात.
२) पृथ्वीच्या
या स्थितीला पृथ्वीची संपात स्थिती म्हणतात.
३) संपात दिनी
पृथ्वीवर सर्वत्र दिनमान व रात्रमान सारखेच ( १२-१२) तासांचे असते.या स्थितीत तयार
होणारे प्रकाशवृत्त रेखावृत्तावर स्थिरावते.
(३) विषुववृत्तीय
भागात ॠतूंचा प्रभाव का जाणवत नाही?
उत्तर:
१) विषुववृत्तीय
भागात वर्षातील बहुतांश दिवशी सूर्यकिरणे लंबरूप पडतात व दिनमान व रात्रमान जवळजवळ
सारखेच असते ( म्हणजे १२ – १२ तासांचे) असते
२) विषुववृत्तीय
प्रदेशात वर्षभरातील विविध काळांत सूर्यापासून मिळणाऱ्या उष्णतेचा विशेष फारक पडत
नसल्यामुळे हवामानाच्या स्थितीत फारसा फरक होत नाही. त्यामुळे विषुववृत्तीय भागात
ऋतूंचा प्रभाव जाणवत नाही.
(४) दक्षिणायनात अंटार्क्टिकवृत्तापासून दक्षिण ध्रुवाच्या दरम्यान सूर्य २४ तासांपेक्षा अधिक काळ का पाहता येतो.
उत्तर:
१) कवृत्तापासून
दक्षिण ध्रुव यांच्यादरम्यान सूर्य किरणे कधीच लंबरूप पडत नाहीत.
२) २३
सप्टेंबर ते २१ मार्च या कालावधीत पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धात अंटार्क्टिक वृत्त
ते दक्षिण ध्रुव यांच्यादरम्यानचा प्रदेश २४
तास किंवा त्यांहून अधिक काळ सातत्याने सूर्यासमोर येतो. त्यामुळे दक्षिणायनात
अंटार्क्टिकवृत्तापासून दक्षिण ध्रुवाच्या दरम्यान सूर्य २४ तासांपेक्षा अधिक काळ
पाहता येतो.
(५) पेंग्विन
ही प्रजाती उत्तर ध्रुवावर नसण्याचे कारण ,काय असेल?
उत्तर:
१) दक्षिण या
ध्रुवावरचे वातावरण पेंग्विन या प्रजातीला जगण्यासाठी पोषक आहे.
२)वर्षभर
बर्फाच्छादित असलेला दक्षिण धृवावरील वार्षिक तापमान सुमारे -६० अंश सेल्सिअस
असते. किनारी भागात हे तापमान गोठण बिंदूच्या वर असते. पेंग्विनसाठी हे वातावरण
पोषक असते.
३) उत्तर
धृवावरील वातावरण हे थंड असले तरीही पेंग्विन ला जगण्यासाठी पोषक असे नाही . म्हणून
पेंग्विन ही प्रजाती उत्तर ध्रुवावर आढळत नाही .
इयत्ता सातवी ॠतुनिर्मिती (भाग-2) स्वाध्याय | इयत्ता सातवी भूगोल प्रश्न उत्तरे धडा 8
प्रश्न ३. खालील विधानांतील चुका दुरुस्त करून विधाने पुन्हा लिहा.
(१)
पृथ्वीच्या परिभ्रमण कालानुसार गती कमी- अधिक होत असते.
उत्तर: हे
विधान बरोबर आहे.
(२) आपण उत्तर
गोलार्धातून पाहिले असता आपणांस सूर्याचे भासमान भ्रमण झालेले दिसते.
उत्तर: हे
विधान चूक आहे.
आपण उत्तर
तसेच दक्षिण यापैकी कोणत्याही गोलार्धातून पहिले असता, आपणांस सूर्याचे भासमान
भ्रमण झालेले दिसते.
(३) विषुवदिनाच्या
तारखा प्रत्येक वर्षी बदलत असतात.
उत्तर: हे
विधान बरोबर आहे.
(४) उत्तर
कॅनडामध्ये सप्टेंबर ते मार्च हा उन्हाळ्याचा कालावधी असतो.
उत्तर: हे
विधान चूक आहे.
उत्तर
कॅनडामध्ये सप्टेंबर ते मार्च हा हिवाळ्याचा कालावधी असतो.
(५) दक्षिण
आफ्रिकेत जेव्हा उन्हाळा असतो, तेव्हा ऑस्ट्रेलियात हिवाळा असतो.
उत्तर: हे
विधान चूक आहे.
दक्षिण
आफ्रिकेत जेव्हा उन्हाळा असतो, तेव्हा ऑस्ट्रेलियात देखील उन्हाळा
असतो.
(६) वसंत
संपात व शरद संपात स्थितीत दिनमान लहान असते.
उत्तर: हे विधान
चूक आहे.
वसंत संपात व
शरद संपात स्थितीत दिनमान व रात्रमान समान असते.( १२-१२ तास)
प्रश्न ४. खालील आकृतीतील चुका सांगा.
उत्तर:
१) उत्तर
गोलार्धात उन्हाळ्यातील अयनस्थिती २२ डिसेंबर रोजी दर्शवली आहे. ( प्रत्यक्षात ती
२१ जून ने दर्शवणे आवश्यक आहे. )
२) उत्तर
गोलार्धात हिवाळ्यातील अयनस्थिती २१ जून रोजी दर्शवली आहे. ( प्रत्यक्षात ती २२
डिसेंबर ने दर्शवणे आवश्यक आहे.)
३) दक्षिण
गोलार्धात उन्हाळ्यातील अयनस्थिती चुकीची दर्शवली आहे ( प्रत्यक्षात ती दक्षिण
गोलार्धातील हिवाळ्यातील अयनस्थिती आहे)
४) दक्षिण गोलार्धात
हिवाळ्यातील अयनस्थिती चुकीची दर्शवली आहे. ( प्रत्यक्षात ती दक्षिण गोलार्धात
उन्हाळ्यातील अयनस्थिती आहे.)
प्रश्न ५. दक्षिण गोलार्धातील ॠतुचक्र दर्शवणारी आकृती काढा.
उत्तर: