११. समतेचा लढा स्वाध्याय इयत्ता आठवी इतिहास | Samatecha Ladha Swadhyay

मतेचा लढा स्वाध्याय दाखवा स्वाध्याय समतेचा लढा ८वी इतिहास 8th std history digest pdf Maharashtra board 8vi Maharashtra Samatecha Ladha prashn uttare
Admin

Samatecha Ladha Swadhyay Iyatta 8vi  | समतेचा लढा  स्वाध्याय इयत्ता ८वी  इतिहास


प्र.१. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने  पुन्हा लिहा.

(लाला लजपतराय, साने गुरुजी, रखमाबाई जनार्दनसावे)


(१) राजकोट येथे रेडक्रॉस सोसायटीची स्थापना यांनी केली.

उत्तर: राजकोट येथे रेडक्रॉस सोसायटीची स्थापना रखमाबाई जनार्दनसावे यांनी केली.


(२) अंमळनेरच्या गिरणी कामगार युनियनचे अध्यक्ष हे होते.

उत्तर: अंमळनेरच्या गिरणी कामगार युनियनचे अध्यक्ष साने गुरुजी होते.


(३) आयटकच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते.

उत्तर: आयटकच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष लाला लजपतराय होते.

 

इयत्ता आठवी इतिहास स्वाध्याय pdf  समतेचा लढा स्वाध्याय प्रश्न उत्तरे  इयत्ता आठवी समतेचा लढा धडा अकरा स्वाध्याय  समतेचा लढा स्वाध्याय दाखवा  स्वाध्याय समतेचा लढा ८वी इतिहास  8th std history digest pdf Maharashtra board


प्र.२. टीपा लिहा.


(१) महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे सामाजिक कार्य

उत्तर:

1) महर्षी विठ्‍ठल रामजी शिंदे यांनी दलितांच्या प्रगतीसाठी १९०६ मध्ये ‘डिप्रेस्ड क्लासेस मिशन’ ही संस्था सुरू केली.

२) दलितांना स्वाभिमानी, सुशिक्षित आणि उद्योगी बनवणे हा त्यांच्या कार्याचा महत्त्वाचा भाग होता.

३)  तर उच्चवर्णीयांच्या मनातील दलितविषयक भ्रामक समजुती नष्ट करणे हा त्या कार्याचा दुसरा भाग होता.

४) त्यासाठी त्यांनी मुंबईत परळ, देवनार या भागात मराठी शाळा उद्योगशाळा सुरु केल्या.

५) पर्वती मंदिरामध्ये प्रवेशासाठी सत्याग्रह,शेतकी परिषद संयुक्त मतदारसंघ यात दलितांचा  सहभाग व त्यांचे हित यासाठी ते सक्रीय असत.

 

(२) राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात केलेल्या सुधारणा

उत्तर: राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात पुढील सुधारणा केल्या:

१) राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात आरक्षणाचा क्रांतिकारी जाहीरनामा काढला. मोफत व सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला.

२) त्यांनी जातिभेद निर्मूलनासाठी भरीव कार्य केले.

३) रोटीबंदी, बेटीबंदी व व्यवसायबंदी असे तीन निर्बंध जाति-व्यवस्थेत होते. यासंदर्भात सभा, परिषदांमधून दलित लोकांच्या हातचे अन्न घेऊन शाहू महाराजांनी रोटीबंदी जाहीरपणे धुडकावून लावली.

४) त्यांनी आपल्या संस्थानात आंतरजातीय विवाहास कायदेशीर मान्यता देणारा कायदा मंजूर केला.

५) कोल्हापूर संस्थानातील ‘बलुतेदारी पद्‍धती’ नष्ट करण्यात आली. कोणताही व्यवसाय कोणालाही करण्याची परवानगी देण्यात आली.

६)  शाहू महाराजांनी व्यवसाय स्वातंत्र्य देऊन एक प्रकारच्या सामाजिक गुलामगिरीतून लोकांची मुक्तता केली.


प्र.३. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.


(१) सरकारने साम्यवादी चळवळ चिरडण्याचे ठरवले.

उत्तर:

१) १९२५ साली भारतात साम्यवादी पक्षाची स्थापना झाली.

२) कामगारांच्या व शेतकऱ्यांच्या लढाऊ संघटना उभारण्याचे कार्य साम्यवादी तरुणांनी केले.

३) सरकारला साम्यवादी चळवळीचा धोका वाटू लागला.

त्यामुळे सरकारने ही चळवळ चिरडण्याचे ठरवले.

 

(२) डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक, बहिष्कृत भारत यांसारखी वृत्तपत्रे सुरू केली

उत्तर:

१) स्वातंत्र्य, समता व बंधुता या तत्त्वांवर समाजाची उभारणी करण्याचे

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ध्येय होते.

२) स्वाभिमानावर  आधारलेली चळवळ करणे त्यांना अभिप्रेत होते.

३) वृत्तपत्रे हे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचे अविभाज्य अंग होते.

४) समाजात जागृती निर्माण करण्यासाठी आणि दुःखांना वाचा फोडण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘मूकनायक’, ‘बहिष्कृत भारत’, ‘जनता’, ‘समता’ अशी वृत्तपत्रे सुरू केली.


(३) राष्ट्रव्यापी कामगार संघटनेची आवश्यकता भासू लागली.

उत्तर:

१) एकोणिसाव्या शतकात कापड गिरण्या- रेल्वे यांसारख्या उद्योगांची सुरुवात झाली. त्यावेळी कामगारांची संख्या कमी होती.

२)  कामगारांच्या संघटना नसल्याने कामगार संघटीत नव्हते.

३) पहिल्या महायुद्‍धानंतर भारतात औद्योगिकीकरणामुळे कामगार वर्गाची वाढ झाली.

४) तेव्हा मात्र राष्ट्रव्यापी कामगार संघटनेची आवश्यकता भासू लागली.


प्र. ४. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.

 

(१) आधुनिक भारताच्या जडणघडणीत समतेचा लढा महत्त्वाचा का ठरतो ?

उत्तर:

१) स्वातंत्र्य लढ्यामुळे लोकांना राजकीय स्वातंत्र्य मिळाले; पणतू स्वातंत्र्याप्रमाणेच समतेचा लढा ही महत्वपूर्ण होता.

२) या लढ्यामुळे सरंजामशाहीला धक्का बसून शेतकऱ्यांना प्रश्नांकडे लक्ष दिले जाऊ लागले.

३) स्त्रियांची दयनीय स्थिती सुधारण्यासाठी पुरुषांबरोबरच स्त्रियांचे नेतृत्व पुढे येऊन स्त्री-पुरुष समानतेचा आग्रह धरला जाऊ लागला.


समतेचा लढा स्वाध्याय प्रश्न उत्तरे | इयत्ता आठवी समतेचा लढा धडा अकरा स्वाध्याय


(२) पूर्व खानदेशात साने गुरुजींनी केलेले कार्य लिहा.

उत्तर:

१) १९३८ साली पूर्व खानदेशात अतिवृष्टी होऊन पीक बुडाले.

२) शेतकऱ्यांची स्थिती हलाखीची झाली. शेतसारा माफ करून घेण्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांना संघटीत केले.

३) साने गुरुजींनी जागोजागी सभा घेतल्या, मिरवणुका काढल्या. कलेक्टर कचेरीवर मोर्चे काढले.


8vi Samatecha Ladha  prashn uttare | Itihas swadhyay 8th Samatecha Ladha swadhyay


(३) कामगारांनी उभे केलेले लढे राष्ट्रीय चळवळीस पूरक कसे ठरले?

उत्तर:

१) भारतात विसाव्या शतकाच्या पूर्वाधात उद्योगधंदे सुरु झाल्याने कामगारांचा मोठा वर्ग उदयाला आला. आपल्या समस्यांसाठी हा वर्ग लढू लागला. कामगारांच्या या लढ्याने स्वातंत्र्य चळवळीला पाठबळ मिळाले.

२) वंगभंग आंदोलनाच्या काळात स्वदेशीचा पाठीमाब देण्यासाठी कामगारांनी वेळोवेळी संप केले.

३) १९२८ साली मुंबईत गिरणी कामगारांनी सहा महिने संप केला. रेल्वे कामगार, ताग कामगार, आसामातील चहामळे कामगार अशा अनेक ठिकाणच्या कामगारांनी तीव्र लढे दिले.

४) कामगार चळवळीच्या वाढत्या शक्तीने सरकारही अस्वस्थ होते. अशा रीतीने कामगारांचे हे लढे राष्ट्रीय चळवळीस पूरक व उपयुक्त ठरले.


(४) स्त्रीविषयक सुधारणा चळवळीचे स्वरूप स्पष्ट करा

उत्तर:

१) भारतातील समाजव्यवस्थेत स्त्रियांना दुय्यम स्थान होते.

२) अनेक दुष्ट चालीरितींमुळे त्यांच्यावर अन्याय होत असे; परंतु आधुनिक युगात याविरुद्ध जागृती होऊ लागली.

३) स्त्रियांचे नेतृत्व पुढे येऊन त्या स्वतंत्र संस्था आणि संघटना स्थापन करू लागल्या.

४) वारसा हक्क, मतदानाचा हक्क इत्यादी प्रश्नांबाबत संघ्त्नानाच्या माध्यमातून स्त्रिया संघर्ष करू लागल्या.

५) सार्वजनिक जीवनात स्त्रियांचा सहभाग वाढला. राष्ट्रीय चळवळीत व क्रांतीकार्यातही त्यांचा मोलाचा सहभाग होता. स्त्रीविषयक सुधारणा चळवळीमुले स्त्रियांना प्रांतिक मंत्रिमंडळातही स्थान मिळाले.

*******

Post a Comment

प्रिय मित्रांनो आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडल्यास, उपयोगी पडल्यास आम्हाला नक्की comment करून सांगा. धन्यवाद.