Samochha Resha Nakasha aani Bhurupeswadhyay 7vi Bhugol | समोच्च रेषा नकाशा आणि भूरूपे इयत्ता सातवी भूगोल स्वाध्याय प्रश्न उत्तरे
प्रश्न १. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
(१)
समोच्चतादर्शक नकाशाचा वापर कोणाकोणाला होतो?
उत्तर:
पर्यटक, गिर्यारोहक, संरक्षण दलातील अधिकारी, सैनिक, भटकंती करणार इत्यादी व्यक्तीना
समोच्चतादर्शक नकाशाचा वापर होतो.
(२) समोच्च
रेषांच्या निरीक्षणावरून काय लक्षात येते?
उत्तर:
समोच्च रेषांच्या निरीक्षणावरून पुढील बाबी लक्षात येतात:
१) सुमुद्रसपाटीपासून
एखाद्या ठिकाणाची उंची
२) संबंधित ठिकाणाला
वेगवेगळ्या दिशांनी असलेल्या उतारांचे स्वरूप
(३)
शेतकऱ्यांना समोच्च रेषा नकाशांचा उपयोग कसा होईल?
उत्तर:
शेतकऱ्यांना सामोच्च रेषा नकाशांचा उपयोग खालीलप्रमाणे होईल:
१) सखोल शेती
करण्यासाठी कमी उंचीवरील जागा निवडण्यासाठी.
२) मळ्याची शेतीसाठी
डोंगरउतारावरील योग्य त्या जागेची निवड करण्यासाठी .
३) उंचावरील
प्रदेशातून पावसाचे पाणी कोणत्या दिशेने संथ गतीने खाली येईल व कोणत्या दिशेने वेगाने
खाली येईल याचा अंदाज बांधण्यासाठी.
(४) प्रदेशातील
भूरूपाचे व उंचीचे वितरण कशाच्या साहाय्याने दाखवता येते?
उत्तर:
प्रदेशातील भूरूपाचे व उंचीचे वितरण समोच्चता दर्शक नकाशाच्या सहाय्याने दाखवता येते.
Iyatta satavi bhugol swadhyay dhada 11 | Class ७ std geography solutions chapter 11 pdf
प्रश्न २. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.
(१) समोच्च
रेषा एकमेकींच्या जवळ असतील, तर तेथील उतार ...............
असतो.
उत्तर: समोच्च
रेषा एकमेकींच्या जवळ असतील, तर तेथील उतार तीव्र
असतो.
(२) नकाशावर
समोच्च रेषा ............... चे प्रतिनिधित्व करतात.
उत्तर: नकाशावर
समोच्च रेषा समान उंचीच्या ठिकाणां चे प्रतिनिधित्व करतात.
(३)
............... तील अंतरावरून उताराची कल्पना करता येते.
उत्तर: सामोच्च रेषां तील
अंतरावरून उताराची कल्पना करता येते.
(४) दोन
समोच्च रेषांतील अंतर कमी असते तेथे ............... तीव्र असतो.
उत्तर: दोन
समोच्च रेषांतील अंतर कमी असते तेथे उतार तीव्र असतो.
इयत्ता सातवी समोच्च रेषा नकाशा आणि भूरूपे स्वाध्याय | इयत्ता सातवी भूगोल प्रश्न उत्तरे धडा 11
प्रश्न ३. खालील नकाशातील भूरूपे ओळखा.
उत्तर:
१) नदी
खोऱ्याचा मैदानी प्रदेश
२) डोंगराळ/पर्वतीय
प्रदेश
३) शिखर
✏ ✏ ✏ ✏ ✏ ✏ ✏ ✏ ✏ ✏ ✏