१२. साम्राज्याची वाटचाल स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता सातवी इतिहास नागरिकशास्त्र | Samrajyachi vatchal Swadhyay Iyatta Satavi Itihas

साम्राज्याची वाटचाल इयत्ता सातवी इतिहास नागरिकशास्त्र स्वाध्याय प्रश्न उत्तरे  | Samrajyachi vatchal swadhyay prashn uttare iyatta satavi etihas nagarikshastra

Samrajyachi vatchal swadhyay prashn uttar  Itihas nagarikshastra swadhyay satavi pdf  Itihas nagarikshastra swadhyay satvi question answers


प्र. १. एका शब्दात लिहा.


(१) इंदौरच्या राज्यकाराभाची सूत्रे सांभाळणाऱ्या -

उत्तर: अहिल्याबाई होळकर


(२) नागपूरकर भोसले घराण्यातील सर्वांत कर्तबगार व पराक्रमी पुरुष -

उत्तर: रघुजी भोसले.


(३) दिल्लीच्या गादीवर बादशाहाला पुनःस्थापना करणारे -

उत्तर: महादजी शिंदे


(४) दक्षिणेतील राजकारणाची सूत्रे सांभाळणारे -

उत्तर: नानाफडणवीस

 

प्र. २. घटनाक्रम लिहा.

(१) आष्टीची लढाई

(२) मराठ्यांचे ओडिशावर प्रभुत्व

(३) इंग्रजांनी पुण्यात युनियन जॅक फडकवला.


उत्तर:

१) मराठ्यांचे ओडिशावर प्रभुत्व

२) इंग्रजांनी पुण्यात युनियन जॅक फडकवला.

३) आष्टीची लढाई

 

प्र. ३. लिहिते व्हा .

 

(१) अहिल्याबाई होळकर यांनी केलेली कामे

उत्तर:

१) अहिल्याबाई होळकर यांनी त्यां नी नवे कायदे  करून शेतसारा, करवसुली अशा गोष्टींची घडी बसवली.

२) पडीक जमिनी लागवडीखाली आणणे, शेतकऱ्यांना विहिरी खोदून

देणे, व्यापार-उद्योगाला प्रोत्सा हन देणे, तलाव-तळी निर्माण करणे यासाठी त्या झटल्या.

३) भारतात चारी दिशांना असलेल्या महत्त्वाच्या धर्मस्थळांवर त्यांनी मंदिरे, घाट, मठ, धर्म शाळा, पाणपोया यांची उभारणी केली.

४) त्यांनी सुमारे अठ्ठावीस वर्षे समर्थपणे राज्याचा कारभार करून उत्तरेत मराठ्यांच्या सत्तेची प्रतिमा उंचावली.

५) राज्यात शांतता व सुव्यवस्था निर्माण करून प्रजेला सुखी केले.

 

(२) महादजी शिंदेंचा पराक्रम

उत्तर:

१) पानिपतच्या पराभवानंतर उत्तर भारतात मराठ्यांचे वर्चस्व आणि प्रतिष्ठा

निर्माण करण्याची कामगिरी महादजी शिंदें यांनी केली.

२) फ्रेंच लष्करी तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखाली आपली फौज प्रशिक्षित करून या फौजेच्या बळावर त्यांनी रोहिले, जाट, राजपूत, बुंदेले इत्यादींना नमवले.

३) इंग्रजांवर मात करून मुघल बादशाहाला पुन्हा गादीवर बसवले आणि इ.स. १७८४ ते १७९४ या काळात दिल्लीचा कारभार पहिला.

४) गनिमी काव्याची युद्धनीती वापरून वडगावच्या लढाईत इंग्रजांचा पराभव केला.

 

(३) गुजरातमधील मराठी सत्ता

उत्तर:

१) गुजरातमध्ये मराठी सत्तेचा पाया सेनापती खंडेराव व त्यांचा मुलगा त्रिंबकराव दाभाडे यांनी घातला.

२) खंडेरावांच्या निधनानंतर त्यांची पत्नी उमाबाई हिने अहमदाबादच्या मुघल सरदाराचा पराभव करून तेथील किल्ला जिंकून घेतला.

३) त्यानंतरच्या काळात गायकवाडांनी वडोदरा जिंकून तेथेच आपल्या सत्तेचे मुख्य ठाणे बनवले.

 

प्र. ४. मराठी सत्ता संपुष्टात येण्यामागची कारणे-चर्चा करा.

उत्तर: मराठी सत्ता संपुष्टात येण्यामागची कारणे खालीलप्रमाणे आहेत:

१) महादेव शिंदे यांच्यासारखा पराक्रमी सरदार आणि नाना फडणवीस यांच्यासारखा मुत्सद्दी कारभारी यांचा मृत्यू झाला.

२) नेतृत्वगुण नसणारा दुसरा बाजीराव पेशवा मराठा सरदारांमध्ये ऐक्य निर्माण करू शकला नाही.

३) मराठा सरदारांमध्ये दुही माजून मराठ्यांची सत्ता आतून पोखरली गेली.

४) उत्तर व दक्षिणेत मराठ्यांचा प्रभाव कमी होत गेला.

५) याच काळात भारतात सर्वत्र इंग्रजांचा प्रभाव वाढला आणि त्यांनी आष्टीच्या लढाईत मराठ्यांचा पराभव केला.

**********

साम्राज्याची वाटचाल या पाठाचा स्वाध्याय | पाठ  बारावा  साम्राज्याची वाटचाल स्वाध्याय | साम्राज्याची वाटचाल भारत धडा बारावा स्वाध्याय

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.