Sashastra Krantikari chalval Swadhyay Iyatta 8vi | सशस्त्र क्रांतिकारी चळवळ स्वाध्याय इयत्ता ८वी इतिहास
प्र.१. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा.
(पं.श्यामजी कृष्ण वर्मा, मित्रमेळा,
रामसिंह कुका)
(१) स्वा.सावरकर यांनी ...... ही क्रांतिकारकांची गुप्त संघटना स्थापन केली.
उत्तर: स्वा.सावरकर यांनी मित्रमेळा ही
क्रांतिकारकांची गुप्त संघटना स्थापन
केली.
(२) पंजाबमध्ये.... यांनी सरकार विरोधी उठावाचे आयोजन केले.
उत्तर: पंजाबमध्ये रामसिंह
कुका यांनी सरकार विरोधी उठावाचे आयोजन केले.
(३) इंडिया हाउसची स्थापना ..... यांनी केली.
उत्तर: इंडिया हाउसची स्थापना पं.श्यामजी कृष्ण
वर्मा यांनी केली.
प्र.२. पुढील तक्ता पूर्ण करा.
उत्तर:
क्रांतिकारक |
संघटना |
१) स्वातंत्र्यवीर
सावरकर
|
अभिनव
भारत |
२) बारींद्रकुमार
घोष |
अनुशीलन
समिती
|
३) चंद्रशेखर
आझाद |
‘हिंदुस्थान
सोशॅलिस्ट रिपब्लिकन आर्मी’ |
४) लाला
हरदयाळ
|
गदर
|
सशस्त्र क्रांतिकारी चळवळ स्वाध्याय दाखवा | स्वाध्याय सशस्त्र क्रांतिकारी चळवळ ८वी इतिहास
प्र.३. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.
(१) चाफेकर बंधूंनी रँडचा वध केला.
उत्तर:
१) १८९७ साली पुण्यात प्लेगची साथ येतून त्यात लोकांचे बळी
जाण्याचे प्रमाण वाढले होते.
२) प्लेगचा बंदोबस्त करण्यासाठी रँड याची प्लेग कमिशनर म्हणून
नियुक्ती करण्यात आली.
३) पुणे प्लेग्पासून मुक्त करण्यासाठी रँडने स्वच्छता मोहीम राबवून लोकांवर
जुलूम जबरदस्ती केली.
४) याचा बदला घेण्यासाठी चाफेकर बंधूंनी रँडचा वध केला.
(२) खुदीराम बोस यांना फाशी देण्यात आली.
उत्तर:
१) ब्रिटीशांची सत्ता सशस्त्र मार्गाने उखडून टाकायची या
उद्देशाने बंगाल प्रांत्तात अनुशीलन समिती काम करीत होती.
२) या समितीचे सदस्य खुदिरामबोस आणि प्रफुल्ल चाकी यांनी
किंग्जफोर्ड या न्यायाधीशाला ठार मारण्याची योजना तयार केली.
३) किंग्जफोर्डची गाडी सामून त्यांनी बॉम्ब टाकला परंतु ती
गाडी किंग्जफोर्ड ची नव्हती.
४) यामध्ये त्या गाडीतील दोन ब्रिटीश महिला ठार झाल्या.
त्यामुळे पोलिसांच्या हाती लागलेल्या खुदिराम बोस यांना फाशी
देण्यात आली.
(३) भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी मध्यवर्ती विधिमंडळात बाँब फेकले.
उत्तर:
१) सरकारने मध्यवर्ती विधिमंडळात दोन विधेयके मांडली होती.
२) जर ही विधेयके मजूर झाली तर लोकांच्या नागरी हक्कांची
पायमल्ली होणार होती.
३) या विधेयकाचा निशेष करण्यासाठी भगतसिंग आणि बटूकेश्वर
दत्त यांनी मध्यवर्ती विधीमंडळात बॉम्ब फेकले.
8vi Sashastra Krantikari chalval prashn uttare |Itihas swadhyay 8th Sashastra Krantikari chalval swadhyay
प्र.४. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.
(१) चितगाव शस्त्रागारावरील हल्ल्याचा वृत्तान्त लिहा.
उत्तर:
१) सूर्यसेन यांनी आपल्या साथीदारांच्या मदतीने चीत्गावर
शस्त्रगारावर हल्ला करण्याची योजना आखली.
२) या क्रांतीकारकांनी १८ एप्रिल १९३० रोजी चीतगावमधील दोन
शस्त्रगारांवर हल्ला करून शस्त्रास्त्रे ताब्यात घेतली.
३) टेलिफोन व टेलिग्राफ यांच्या यंत्रणा तोडून टाकल्या.
४) संदेशवहन यांत्र्र्ण ठप्प करण्यात त्यांना यश मिळाले चितगाव
शस्त्रागारावरील हल्ल्यानंतर लवकरच या सर्व क्रांतीकार्कांना पकडून त्यांना फाशी देण्यात
आली.
(२) स्वा.सावरकरांचे सशस्त्र क्रांतीतील योगदान स्पष्ट करा
उत्तर:
१) ब्रिटीश साम्राज्याविरुद्ध लढण्यासाठी ज्या विविध मार्गांचा
अवलंब केला होता त्यात सशस्त्र क्रांतीचा मार्ग ही समाविष्ट होता. हाच मार्ग स्वातंत्र्यवीर
सावरकरांनी स्वीकारला होता.
२) इ.स. १९०० मध्ये त्यांनी मित्रमेळा ही क्रांतीकारकांची
गुप्त संघटना स्थापन केली जिला पुढे ‘अभिनव भारत’ असे नाव देण्यात आले.
३) इंडिया हाउस ची शिष्यवृत्ती मिळवून सावरकर उच्च शिक्षण
घेण्याच्या निमित्ताने इंग्लंडला गेले.
४) भारतीय तरुणांना प्रेरणा मिळावी म्हणून त्यांनी इटालियन
क्रांतिकारक जोसेफ मॅझिनी यांचे चरित्र तसेच १८५७ चे स्वातंत्र्य समर ही पुस्तके लिहिली.
५) सरकारने जॅक्सन वधाचा संबंध सावरकारांशी लावून
त्यांच्यावर खटला भरला.
६) न्यायालयाने त्यांना
पन्नास वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा देऊन अंदमान येथे ठेवले.