७. स्वराज्याचा कारभार स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता सातवी इतिहास नागरिकशास्त्र | Swarajyacha Karbhar Swadhyay Iyatta Satavi Itihas

स्वराज्याचा कारभार इयत्ता सातवी इतिहास नागरिकशास्त्र स्वाध्याय प्रश्न उत्तरे  | SwarajyachaKarbhar swadhyay prashn uttare iyatta satavi etihas nagarikshastra

स्वराज्याचा कारभार भारत धडा सातवा स्वाध्याय इतिहास नागरिकशास्त्र स्वाध्याय सातवी Swarajyacha Karbhar swadhyay 7vi Swarajyacha Karbhar swadhyay prashn


प्र. १. ओळखा पाहू.


(१) आठ खात्यांचे मंडळ -

उत्तर: अष्टप्रधान मंडळ


(२) बहिर्जी नाईक या खात्याचे प्रमुख होते -

उत्तर: हेर खाते


(३) महाराजांनी बांधलेला मालवणजवळील जलदुर्ग-

उत्तर: सिंधुदुर्ग


(४) किल्ल्याव र युद्धसाहित्या ची व्यवस्था पाहणारा -

उत्तर: कारखानीस



स्वराज्याचा कारभार या पाठाचा स्वाध्याय | पाठ  सातवा  स्वराज्याचा कारभार स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता सातवी | इयत्ता सातवी इतिहास गाईड


प्र. २. तुमच्या शब्दांत लिहा.


(१) शिवाजी महाराजांचे शेतीविषयक धोरण

उत्तर:

१) अण्णाजी दत्तो या कर्तबगार आणि अनुभवी अधिकाऱ्यावर जमीन महसुलाची व्यवस्था सोपवली.

२)ठरवून दिलेल्या महसूल रकमेपेक्षा अधिक महसूल गोळा करू नये अशी सक्त ताकीद त्यांनी अधिकाऱ्यांना दिली.

३) पडीक जमिनी लागवडीखाली आणण्यासाठी उत्तेजन दिले.

४) अतिवृष्टी ,अवर्षण यामुळे पीक हातचे गेले किंवा शत्रुसैन्याने गावाचा प्रदेश उद्ध्वस्त केला, तर अशा सर्व प्रसंगी गावकऱ्यांना शेतसारा व इतर कर यांमध्ये सूट देणे तसेच अशा प्रसंगी अशा प्रसंगी  शेतकऱ्यांना बैलजोड्या, नांगर आणि पेरणीसाठी चांगले बी-बियाणे पुरवण्याची आज्ञा त्यांनी अधिकाऱ्यांना  केली.

 

(२) शिवराय एक प्रजाहितदक्ष राज्यकर्ते

उत्तर:

१) प्रजेला स्वतंत्र बनवणे हा शिवरायांचा मुख्य उद्देश होता.

२) शेतीबरोबरच व्यापार-उद्योगाची भरभराट होईल याकडे त्यांनी लक्ष दिले.

३) प्रजेला स्वातंत्र्याचा खरा आनंद मिळावा यासाठी शिस्तबद्ध राज्यकारभार प्रजेच्या हिताची सर्वांगीण काळजी याकडे लक्ष दिले.

४) प्रजेवर अन्याय करणाऱ्या अधिकाऱ्यांना शिक्षा दिल्या.

५) शिवरायांनी शत्रूच्या ताब्यातील प्रदेश मिळवून त्या प्रदेशाचे संरक्षण केले.

महाराज केवळ सत्ताधीश नव्हते, तर प्रजाहितदक्ष राज्यकर्ता होते, हे त्यांच्या राज्यकारभारावरून स्पष्ट होते.

 

प्र. ३. का ते सांगा.


(१) शिवाजी  महाराजांनी अष्टप्रधान मंडळ स्थापले.

उत्तर:

        शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली, मोठा प्रदेश मिळवला.

१) या मोठ्या प्रदेशाचा कारभार सुरळीत पणे चालण्यासाठी तसेच स्वराज्यातील लोकांचे कल्याण साधता यावे. यासाठी शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळ स्थापन केले.


(२) शिवाजी  महाराजांनी आरमार उभे केले.

उत्तर:

१) भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील गोव्याचे पोर्तुगीज, जंजिऱ्याचे सिद्दी तसेच सुरत व राजापूर येथील इंग्रज वखारवाले हे शत्रू स्वराज्यविस्ताराच्या कार्यात अडथळा आणत होते.

 २) या अडथळ्यास पायबंद घालणे आणि पश्‍चिम किनारपट्टीचे रक्षण करणे याची आवश्यकता होती.

म्हणून शिवाजी  महाराजांनी आरमार उभे केले.


प्र.४. ओघतक्ता पूर्ण करा.

उत्तर:

प्रश्न उत्तरे इयत्ता सातवी  स्वराज्याचा कारभार या पाठाचा स्वाध्याय  पाठ  सातवा  स्वराज्याचा कारभार स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता सातवी  इयत्ता सातवी इतिहास गाईड

*******

Itihas nagarikshastra swadhyay satavi pdf | Itihas nagarikshastra swadhyay satvi question answers

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.