Swatantrya Ladhyachi Paripurti Swadhyay Iyatta 8vi | स्वातंत्र्यलढ्याची परिपूर्ती स्वाध्याय इयत्ता ८वी इतिहास
प्र.१. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा.
(१) भारतात लहान-मोठी अशी सहाशेच्या वर ........... होती.
(अ) राज्ये
(ब) खेडी
(क) संस्थाने
(ड) शहरे
उत्तर: भारतात
लहान-मोठी अशी सहाशेच्या वर संस्थाने होती.
(२) जुनागड, .......... व काश्मीर या संस्थानाचा अपवाद
वगळता सर्व संस्थाने भारतात विलीन झाली.
(अ) औंध
(ब) झाशी
(क) वडोदरा
(ड)हैदराबाद
उत्तर: जुनागड, हैदराबाद व काश्मीर या संस्थानाचा अपवाद
वगळता सर्व संस्थाने भारतात विलीन झाली.
प्र.२. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.
(१) जुनागड भारतात विलीन झाले.
उत्तर:
१) जुनागड हे
सौराष्ट्रातील एक संस्थान होते. तेथील प्रजेला भारतात सामील व्हायचे होते.
२) जुनागडचा
नवाब मात्र पाकिस्तानात सामील होण्याच्या विचारात होता.
३) त्याच्या
या निर्णयाला प्रजेने कसून विरोध केला, तेव्हा नवाब पाकिस्तानात
निघून गेला.
४) त्यानंतर
१९४८ च्या फेब्रुवारीमध्ये जुनागड भारतात विलीन झाले.
8vi Swatantrya Ladhyachi Paripurti prashn uttare | Itihas swadhyay 8th Swatantrya Ladhyachi Paripurti swadhyay
(२) भारत सरकारने निजामाविरुद्ध पोलीस कारवाई सुरू केली.
उत्तर:
१) निजामाच्या
पाठींब्याने ‘रझाकार’ नावाची संघटना स्थापन झाली.
२) या संघटनेने
हिंदूंवरच नव्हे, तर लोकशाहीवादी चळवळीला पाठिंबा
देणाऱ्या मुस्लिमांवरही अत्याचार केले. त्यामुळे सर्वत्र लोकमत भडकू लागले.
३) निजामाशी
सामोपचाराने बोलणी करण्याचा प्रयत्न भारत सरकार करत होते, परंतु निजाम दाद देत नव्हता.
४) अखेरीस
भारत सरकारने १३ सप्टेंबर १९४८ रोजी निजामाविरुद्ध पोलीस कारवाई सुरू केली.
(३) भारतात सामील होण्याच्या करारावर हरिसिंगाने स्वाक्षरी केली
उत्तर:
१) काश्मीर
संस्थानचा राजा हरिसिंग याने स्वतंत्र राहण्याचे ठरवले होते. २) काश्मीर पाकिस्तानात सामील करून घेण्याचा
पाकिस्तानचा मानस होता. यासाठी पाकिस्तान हरिसिंगावर दडपण आणू लागले.
३) १९४७ च्या ऑक्टोबरमध्ये पाकिस्तानच्या चिथावणीने सशस्त्र घुसखोरांनी काश्मीरवर हल्ला केला, तेव्हा भारतात सामील होण्याच्या करारावर हरिसिंगाने स्वाक्षरी केली.
स्वाध्याय प्रश्न उत्तरे | इयत्ता आठवी स्वातंत्र्यलढ्याची परिपूर्ती धडा तेराव स्वाध्याय
प्र.३. थोडक्यात उत्तरे लिहा.
(१) संस्थानांच्या विलीनीकरणातील सरदार वल्लभभाई पटेल यांचे योगदान स्पष्ट करा.
उत्तर:
१) वल्लभभाई
पटेल यांनी संस्थानिकांना विश्वासात घेऊन सर्वांना मान्य होईल असा ‘सामीलनामा’
तयार केला.
२) भारतात
सामील होणे संस्थानिकांच्या कसे हिताचे आहे, हे सरदार पटेलांनी
संस्थानिकांना पटवून दिले.
३) त्यांच्या
या आवाहनाला संस्थानिकांनी चांगला प्रतिसाद दिला आणि आपली संस्थाने भारतात विलीन केली.
(२) हैदराबाद मुक्तिसंग्रामातील स्वामी रामानंद तीर्थ यांचे योगदान स्पष्ट करा.
उत्तर:
१) १९३८ मध्ये
स्वामी रामानंदतीर्थ यांनी हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना केली. निजामाने या
संघटनेवर बंदी घातली.
२) हैदराबाद
स्टेट काँग्रेसला मान्यता मिळवण्यासाठी व लोकशाही हक्कांसाठी लढा सुरू झाले.
३) या लढ्याचे
नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ या झुंजार सेनानीने केले.