Swatantryaprapti Swadhyay Iyatta 8vi | स्वातंत्र्यप्राप्ती स्वाध्याय इयत्ता ८वी इतिहास
प्र.१. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा.
(१) हंगामी सरकारचे ........... हे प्रमुख होते.
(अ) वल्लभभाई पटेल
(ब) महात्मा
गांधी
(क) पं.जवाहरलाल नेहरू
(ड) बॅ.जीना
उत्तर: हंगामी
सरकारचे पं.जवाहरलाल नेहरू हे प्रमुख होते.
(२) भारत व पाकिस्तान या दोन स्वतंत्र राष्ट्रांची निर्मिती करण्याची योजना
.......... यांनी तयार केली.
(अ) लॉर्ड वेव्हेल
(ब) स्टॅफर्ड
क्रिप्स
(क) लॉर्ड माउंटबॅटन
(ड) पॅथिक
लॉरेन्स
उत्तर: भारत व
पाकिस्तान या दोन स्वतंत्र राष्ट्रांची निर्मिती करण्याची योजना लॉर्ड
माउंटबॅटन यांनी तयार केली.
प्र.२. पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.
(१) बॅ.जीना यांनी कोणत्या मागणीचा आग्रहाने पुरस्कार केला ?
उत्तर: व्हॉइसरॉयच्या
कार्यकारी मंडळात मुस्लीम प्रतिनिधींची नावे सुचवण्याचा अधिकार केवळ मुस्लीम लीगला
असावा,
या मागणीचा बॅ.जीनांनी आग्रहाने पुरस्कार केला.
(२) त्रिमंत्री योजनेत सहभागी मंत्र्यांची नावे लिहा.
उत्तर: पॅथिक
लॉरेन्स,
स्टॅफर्ड क्रिप्स आणि ए.व्ही. अलेक्झांडर ही त्रीमंत्री योजनेत सहभागी
मंत्र्यांची नावे आहेत.
प्र.३. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.
(१) राष्ट्रीय सभेने फाळणीस मान्यता दिली.
उत्तर:
१) व्हॉइसरॉय,
लॉर्ड माउंटबॅटन यांनी भारतातील प्रमुख नेत्यांसोबत विचारविनिमय केला. त्यानंतर भारत
व पाकिस्तान या दोन स्वतंत्र राष्ट्रांची निर्मिती करण्याची योजना तयार केली.
२) राष्ट्रीय सभेचा
या फाळणीस विरोध होता.
३) देशाचे ऐक्य
हा राष्ट्रीय सभेच्या भूमिकेचा आधार होता. परंतु मुस्लीम लीगने पाकिस्तानच्या निर्मितीचा
अट्टाहास धरला.
त्यामुळे राष्ट्रीय
सभेने फाळणीस मान्यता दिली.
इयत्ता आठवी इतिहास स्वाध्याय pdf | स्वातंत्र्यप्राप्ती स्वाध्याय प्रश्न उत्तरे| इयत्ता आठवी स्वातंत्र्यप्राप्ती धडा बारा स्वाध्याय
(२) हंगामी सरकारचा कारभार सुरळीत चालू शकला नाही.
उत्तर:
१) देशात हिंसाचाराचा
डोंब उसळला असताना व्हॉइसरॉय वेव्हेल यांनी हंगामी सरकारची स्थापना केली.
२) पं.जवाहरलाल
नेहरू हे या सरकारचे प्रमुख होते.
३) हंगामी सरकारमध्ये
सामील न होण्याचा निर्णय सुरुवातीच्या काळात मुस्लीम लीगने घेतला होता.
४) काही काळानंतर
मुस्लीम लीग हंगामी सरकारमध्ये सामील झाले.
५) परंतु मुस्लीम
लीगच्या नेत्यांनी अडवणूकीची भूमिका घेतल्यामुळे
हंगामी सरकारचा कारभार सुरळीत चालू शकला नाही.
(३) वेव्हेल योजना यशस्वी होऊ शकली नाही.
उत्तर:
१) जून १९४५
मध्ये भारताचे व्हाईसरॉय लॉर्ड वेव्हेल यांनी एक योजना तयार केली.
२) या योजनेत
विविध तरतुदी होत्या. यात केंद्रीय व प्रांतिक विधिमंडळात मुस्लीम, दलित व अल्पसंख्याकांना योग्य ते प्रतिनिधित्व देण्यात येईल, व्हाईसरॉयच्या कार्यकारी मंडळात हिंदू व मुस्लीम सदस्यांची संख्या समान
राहील, अशा काही प्रमुख तरतुदी होत्या.
३) या योजनेवर
विचार करण्यासाठी सिमला येथे भारतातील प्रमुख राजकीय पक्षांची बैठक आयोजित करण्यात
आली होती.
४) व्हाईसरॉय कार्यकारी मंडळात मुस्लीम
प्रतिनिधींची नावे सुचवण्याचा अधिकार केवळ मुस्लीम लीगला असावा, असा बॅ.जीनांनी आग्रह धरला.
५) राष्ट्रीय सभेने
त्यास विरोध केला. त्यामुळे वेव्हेल योजना यशस्वी होऊ शकली नाही.
प्र.४. दिलेल्या कालरेषेवर घटनाक्रम लिहा.
उत्तर:
पूर्ण table दिसत नसल्यास मोबाईल आडवा करा ( Tilt) करा.
१९४५ |
|
१९४६ |
|
१९४७ |
|
१९४८ |
|||||
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
भारताचे व्हाईसरॉय लॉर्ड वेव्हेल यांची वेव्हेल योजना
|
|
त्रिमंत्री योजना व मुस्लीम लीगने प्रत्यक्ष कृतीदिन
पाळला. |
|
भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्यानुसार भारताला स्वातंत्र्य मिळाले. |
|
नथुराम गोडसे यांने गांधीजींची निर्घुण हत्या केली.
|
|||||
प्र.५. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा.
(१) ब्रिटिशांनी भारताला स्वातंत्र्य देण्याच्या दृष्टीने पावले का उचलली ?
उत्तर:
१) दुसऱ्या महायुद्धाच्या
काळात भारतीय स्वातंत्र्यलढा व्यापक झाला होता. भारताच्या स्वातंत्र्याच्या मागणीचा
जोर वाढत होता.
२) त्यांची गंभीर
दखल घेणे आवश्यक आहे, याची जाणीव ब्रिटीश राज्यकर्त्यांना झाली. त्या दृष्टीने भारताला
स्वातंत्र्य देण्यासाठी ब्रिटीश सरकार विविध योजना तयार करू लागले.
३) राष्ट्रीय
आंदोलनात सर्व जाती-धर्मांचे लोक सामील झालेले होते. ही चळवळ कमकुवत करण्यासाठी
ब्रिटिशांनी ‘फोडा आणि राज्य करा’ या नीतीचा अवलंब केला. त्याचा परिणाम ‘मुस्लीम लीग’ची
स्थापना होण्यात झाला.
४) सर्व देशभर
मारामाऱ्या,जाळपोळ, लुटालूट सुरु झाली
सरकारला कायदा व सुव्यवस्था टिकवण्यात अपयश आले. यात हजारो निरअपराध लोक मारले
गेले.
५) ९ डिसेंबर १९४६
ला डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली राज्यघटना बनविण्यासाठी समिती स्थापन
झाली.
६) मुस्लीम लीगने
या घटना समितीवर बहिष्कार घातला. सर्व देशभर दंगली, अत्याचार चालूच ठेवले.
७ ) या अस्थिर
अस्थिर परीसाठीतीमध्ये इंग्लंडचा पंतप्रधान ॲटली यांनी “ जून १९४८ पूर्वी
हिंदुस्तानची सत्ता सोडणार” अशी घोषणा केली.
८) याची गंभीर
दखल घेणे आवश्यक आहे याची जाणीव ब्रिटीश राज्यकर्त्यांना झाली. त्या दृष्टीने भारताला
स्वातंत्र्य देण्यसाठी ब्रीतीशांणाई भारताला स्वातंत्र्य देण्याच्या दृष्टीने पावले
उचलली.
8vi Maharashtra Swatantryaprapti prashn uttare | Itihas swadhyay 8th Swatantryaprapti swadhyay
(२) माउंटबॅटन योजनेविषयी माहिती लिहा.
उत्तर:
१) इंग्लंडचे
पंतप्रधान ॲटली यांनी जून १९४८ पूर्वी इंग्लंड भारतावरील आपली सत्ता सोडून देईल
असे घोषित केले.
२) भारतातील सत्तांतराच्या
पार्श्वभूमीवर लॉर्ड माउंटबॅटन यांची भारताचे व्हाईसरॉय म्हणून नियुक्ती केली
गेली. लॉर्ड माउंटबॅटन यांनी भारतातील प्रमुख नेत्यांसोबत विचारविनिमय केला. त्यानंतर
भारत व पाकिस्तान या दोन स्वतंत्र राष्ट्रांची निर्मिती करण्याची योजना त्यांनी
तयार केली.
३) राष्ट्रीय
सभेचा फाळणीस विरोध होता. देशाचे ऐक्य हा राष्ट्रीय सभेच्या भूमिकेचा मूळ आधार
होता.
४) परंतु
मुस्लीम लीगने पाकिस्तानच्या निर्मितीचा अट्टहास धरला.
५) त्यामुळे
फाळणीशिवाय दुसरा पर्याय उरला नव्हता. राष्ट्रीय सभेने अत्यंत नाइलाजाने फाळणीच्या
निर्णयाला मान्यता दिली.
(३) १६ ऑगस्ट हा दिवस प्रत्यक्ष कृतिदिन म्हणून पाळण्याचे मुस्लीम लीगने का जाहीर केले? त्याचे कोणते परिणाम झाले
उत्तर:
१) त्रिमंत्री
योजनेत मुस्लीम लीगने मुस्लिमांचे स्वतंत्र राज्य स्थापन करण्यची मागणी केली होती.
२) परंतु मुस्लिमांचे
स्वतंत्र राज्य स्थापन करण्याची तरतूद त्रिमंत्री योजनेत नव्हती.
३) पाकिस्तान ची
मागणी पूर्ण होत नसल्याचे पाहून मुस्लीम लीगने प्रत्यक्ष कृती करण्याचे ठरवले.
त्यानुसार १६ ऑगस्ट हा दिवस प्रत्यक्ष कृतिदिन म्हणून पाळण्याचे मुस्लीम लीगने जाहीर
केले.
४) या दिवशी मुस्लीम लीगच्या अनुयायांनी हिंसक मार्गाचा अवलंब केला. देशामध्ये विविध ठिकाणी हिंदू मुस्लीम दंगली झाल्या. बंगाल प्रांतात नोआखली येथे भीषण कत्तली झाल्या.