4th standard Marathi Aabhalmaya questions answers | आभाळमाया स्वाध्याय प्रश्न उत्तरे
प्र. १. एका वाक्यात उत्तरे लिहा.
(अ) पावसाचे
ढग होऊन कोठे कोसळावे असे कवीला वाटते ?
उत्तर:
पावसाचे ढग होऊन डोंगरात, दरीत व शेतात कोसळावे असे कवीला वाटते.
(आ)
शेतकऱ्याला बरकत केव्हा येते ?
उत्तर: जेव्हा
शेतात पिके येतात, तेव्हा शेतकऱ्याला बरकत येते.
(इ) कबीला
उजेड कोठे न्यायचा आहे ?
उत्तर: कवीला गरिबांच्या
झोपडीत उजेड न्यायाचा आहे.
(ई)
पक्ष्याकडे पाहून कवीला काय वाटते ?
उत्तर:
पक्ष्याकडे पाहून कवीला वाटते की, त्याला चोच व पंख फुटावेत.
(उ) आभाळमाया
मिळावी,
असे कवी का म्हणतो ?
उत्तर:
आनंदाने नाचगाण्यासाठी सर्वांना आभाळमाया मिळावी, असे कवी म्हणतो.
इयत्ता चौथी मराठी स्वाध्याय | इयत्ता चौथी आभाळमाया स्वाध्याय प्रश्न उत्तरे चौथीचे प्रश्न उत्तरे दाखवा आभाळमाया
प्र. २. कवीला
खालील गोष्टी पाहून काय व्हावेसे वाटते ?
(अ) पाऊस
उत्तर: कवीला पाऊस
होऊन डोंगर, दरी व शेतात कोसळावे वाटते.
(आ) पणती
उत्तर: कवीला पणती
होऊन झोपडीत प्रकाश द्यावासा वाटतो.
प्र. ३. खालील गोष्टींचा वापर कशासाठी होतो ते सांगा.
(अ) अंगण
उत्तर:
बागडण्यासाठी.
(आ) मैदान
उत्तर:
खेळण्यासाठी
(इ) शेत
उत्तर: धान्य पिकवण्यासाठी
(ई) फुले
उत्तर: सुवास घेण्यासाठी
(उ) दिवा
उत्तर: उजेड करण्यासाठी
प्र. ४.
तुम्ही कोणासाठी काय द्याल ?
(अ)
मित्रांसाठी
उत्तर: मित्राच्या
अडचणीच्या वेळी त्याच्या सोबत राहीन.
(अ) शाळेसाठी
उत्तर:
फुलझाडांच्या कुंड्या
(इ) घरासाठी
उत्तर:
स्वच्छता व टापटीपपणा
(ई) शेतासाठी
उत्तर: पाणी,
बी, खते.
(उ) आईसाठी
उत्तर: प्रेम व
कामात मदत.
(ऊ) बाबांसाठी
उत्तर: सेवा,
आनंद मदत.
प्र. ५. तुम्ही
पक्षी झाला आहात, अशी कल्पना करून पाच-सहा ओळी लिहा.
उत्तर:
पक्ष्यांना आकाशात
उडताना पाहून माझ्या मनात नेहमी विचार यायचा की मी पक्षी झालो तर .... मी पक्षी झालो
तर मी माझ्या मनाप्रमाणे स्वैरपणे संचार करीन. रोज नवीन नवीन झाडांवर खेळेन.
झाडावरच छानसे घरटे बांधून इतर पक्ष्यांसारखे झाडावरच राहीन. झाडावरील इतर पक्ष्यांशी मैत्री करेन.
पक्ष्यांची भाषा शिकून घेईन. सारे जग भ्रमण करण्याचा प्रयत्न करेन.