१५. आनंदाच झाड स्वाध्याय प्रश्न उत्तरे चौथी मराठी | Aanadacha Zaad Swadhyay 4th Marathi

आनंदाच झाड स्वाध्याय प्रश्न उत्तरे प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी. 4th standard Marathi Aanadacha Zaad questions answers 4th Marathi Aanadacha Zaad
Admin

4th standard Marathi Aanadacha Zaad questions answers | आनंदाच झाडस्वाध्याय प्रश्न उत्तरे 


प्र. १. एका वाक्यात उत्तरे लिहा.          

 

(अ) शेवग्याच्या झाडावर कोणत्या रंगाच्या फुलांचे घोस लोंबत होते?

उत्तर: शेवग्याच्या झाडावर पांढर्या रंगाच्या फुलांचे घोस लोंबत होते.

 

(आ) हिरव्यागार पसरलेल्या फांद्यांवर कोणाचा मेळा भरत असे?

उत्तर: हिरव्यागार पसरलेल्या फांद्यांवर रंगीबेरंगी पक्षांचा मोठा मेळा भरत असे.

 

(इ) पशुपक्षी, कीटक-किड्यांचे माहेर कोणते?

उत्तर: लेखिकेचे शेवग्याचे झाड इह पशुपक्षी, कीटक-किड्यांचे माहेर होते.

 

प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी. 4th standard Marathi Aanadacha Zaad questions answers 4th standard Marathi Aanadacha Zaad answers Aanadacha Zaad 4th class question answers

प्र. २. तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.

 

(अ) झाडे आपल्याला काय काय देतात?

उत्तर:

१) आपल्याला फळे, फुले देतात.

२) झाडे सावली देतात.

३) झाडे पक्ष्यांना घरे देतात.

 

(आ) शेवग्यामुळे लेखिकेला पक्ष्यांच्या कोणकोणत्या गोष्टींची ओळख झाली?

उत्तर:

१) शेवग्याच्या पांढऱ्याशुभ्र फुलांच्या घोसावर भुंगे गुंजारव करीत रुंजी घालतात. मधमाश्या आणि फुलचुख्या फुलातला मध अलगत चोखतात.

२) तांबट पक्षी टणत्कार करतो. कोकीळ पक्षी शांतपणे झुलतो.

३) पोपटांचे थवे परागकेशर फस्त करतात. इत्यादी पक्ष्यांच्या गोष्टींची ओळख लेखिकेला झाली.

 

(इ) लेखिकेला शेवग्याने काय काय दिले?

उत्तर:

१)  शेवगा लेखिकेचा आवडता मित्र झाला. शेवग्याने लेखिकेचे मनोरंजन केले. ज्ञान व आनंद दिला. कितीतरी पक्षांची, किड्यांची व कीटकांची ओळख करून दिली. शेवग्याच्या रंगाने व फुलोऱ्याने लेखिकेला नवीन उत्साह दिला.


इयत्ता चौथी मराठी स्वाध्याय| इयत्ता चौथी आनंदाच झाड स्वाध्याय प्रश्न उत्तरे | चौथीचे प्रश्न उत्तरे दाखवा आनंदाच झाड


प्र. ३. कोण, कोणास म्हणाले ?

 

(अ) "दारात कधीही शेवगा लावू नये. घरात भांडणं होतात. हे झाड तुम्ही तोडून टाका."

उत्तर:

असे शेजारच्या काकू लेखिकेला व त्यांच्या आईला म्हणाल्या.


(आ) "मी हे झाड लावलं ते जोपासण्यासाठी, तोडण्यासाठी नाही."

उत्तर:

असे लेखिकेची आई शेजारच्या काकूंना म्हणाली.


(इ) "अहो, लोक शेंगा तोडून नेतील, तेव्हा नाही का भांडणार तुम्ही ?"

उत्तर:

असे, शेजारच्या काकू लेखिकेच्या आईला म्हणाल्या.

 

प्र. ४. गाळलेल्या जागी योग्य शब्द लिहा.

 

(अ) हिरव्यागार पसरलेल्या फांद्यांवर पक्ष्यांचा..........अखंड मेळा भरत होता.

उत्तर: हिरव्यागार पसरलेल्या फांद्यांवर पक्ष्यांचा रंगीबेरंगी अखंड मेळा भरत होता.

 

(आ) अलगत हवेत तरंगत इवल्या इवल्या चपळ............ झुंबड मला दिसली.

उत्तर: अलगत हवेत तरंगत इवल्या इवल्या चपळ फुलचुख्यांची झुंबड मला दिसली.

 

(इ) वेगवेगळ्या ऋतूंमध्ये वेगवेगळी रूपं घेत आमचा............ उभा आहे.

उत्तर: वेगवेगळ्या ऋतूंमध्ये वेगवेगळी रूपं घेत आमचा शेवगा उभा आहे.

 

प्र. ५. शेवग्याच्या झाडावर येणाऱ्या विविध पक्ष्यांची नावे पाठात आली आहेत. त्यांची यादी करा.

उत्तर: कोकीळ, मधमाश्या, फुलचुख्या, बुलबुल, चिमण्या, खंड्या, राघू, साळुंक्या.

 

प्र. ६. 'कार' प्रत्यय जोडून नवीन शब्द बनवा.

उदा., गीत - गीतकार.


उत्तर: 

(अ) संगीत – संगीतकार

(आ) गीत – गीतकार

(इ) चित्र – चित्रकार

(ई) कला – कलाकार

(उ) नाटक – नाटककार

 

Aanadacha Zaad 4th standard Marathi questions answers | Iyatta chouthi prashn uttare

प्र. ७. खालील शब्दसमूहांचा वाक्यात उपयोग करा.


(अ) परोपकार करणे.

उत्तर: प्रत्येकाने आपल्या आयुष्यात परोपकार करणे आवश्यक आहे.


(आ) आधार देणे.

उत्तर: संकटात संपलेल्या महेश ला रामू काकांनी आधार दिला.


(इ) फन्ना उडवणे.

उत्तर: डब्यात ठेवलेल्या चकल्यांचा राजू ने फन्ना उडवला.


(इ)  रुंजी घालणे.

उत्तर: बागेतील फुलांवर फुलपाखरे रुंजी घालत होती.


(उ) सुळकी मारणे.

उत्तर: राजूने नदीच्या डोहात सुळकी मारली.

 

प्र. ८. शेवग्याच्या शेंगांपासून कोणकोणते पदार्थ बनवतात ? त्यांतल्या कोणत्याही एका पदार्थाची कृती आई- बाबांना विचारून लिहा. उदा., शेवग्याचं पिठलं.

उत्तर:

शेवग्याच्या शेंगापासून बनवले जाणारे पदार्थ : पिठलं, भाजी, आमटी, सांबर.

शेवग्याची आमटी

१) शेवग्याच्या शेंगा धुवून त्यांचे छोटे छोटे तुकडे करा.

२) कांदा, खोबरे कापून भाजून घेवून त्यामध्ये आले, कोथिंबीर आणि कढीपत्ता टाकून सर्व मिश्रण वाटून घ्या.

३) कढईत तेल ओतून तेल तापल्यावर जिरे, मोहरी घालून फोडणी द्या. त्यामध्ये मसाला व वाटलेले मिश्रण घालून चांगले हलवा.

४) त्यात शेवग्याच्या शेंगाचे तुकडे आणि पाणी घाला.

५) चवीनुसार मीठ घाला.

६) अतिशय छान रुचकर शेवग्याची आमटी तयार होईल.

 **********

Post a Comment

प्रिय मित्रांनो आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडल्यास, उपयोगी पडल्यास आम्हाला नक्की comment करून सांगा. धन्यवाद.