१८. जननायक बिरसा मुंडा स्वाध्याय प्रश्न उत्तरे चौथी मराठी | Jannayak Birasa Munda Swadhyay 4th Marathi

4th standard Marathi Jannayak Birasa Munda questions answers | वाटाड्या स्वाध्याय प्रश्न उत्तरे 

 

प्र. १. एका वाक्यात उत्तरे लिहा.


(अ) बिरसा मुंडा यांचा जन्म केव्हा व कोठे झाला ?

उत्तर: बिरसा मुंडा यांचा जन्म १५ नोव्हेंबर १८७५ रोजी रांचीमधील उलिहातू या गावी झाला.

 

(आ) बिरसा मुंडा यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण कोणत्या शाळेत झाले ?

उत्तर: बिरसा मुंडा यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मिशनरी शाळेत झाले

 

इयत्ता चौथी मराठी स्वाध्याय  इयत्ता चौथी जननायक बिरसा मुंडा स्वाध्याय प्रश्न उत्तरे  चौथीचे प्रश्न उत्तरे दाखवा जननायक बिरसा मुंडा  जननायक बिरसा मुंडा स्वाध्याय प्रश्न उत्तरे  प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी.  4th standard Marathi Jannayak Birasa Munda answers  Jannayak Birasa Munda 4th class question answers

(इ) बिरसा मुंडा यांना कोणकोणत्या गोष्टींत विशेष रस होता ?

उत्तर: संगीत व नृत्यकला या गोष्टींत बिरसा मुंडा यांना विशेष रस होता.

 

(ई) तुरुंगात असताना बिरसा मुंडा यांनी कोणता संकल्प केला ?

उत्तर: तुरुंगात असताना बिरसा मुंडा यांनी इंग्रजी सत्ता मुळासकट उखडून टाकण्याचा संकल्प केला.


(उ) बिरसा मुंडा यांना लोकांनी कोणता किताब बहाल केला ?

उत्तर: बिरसा मुंडा यांना ‘जननायक’ हा किताब बहाल केला.

 

इयत्ता चौथी मराठी स्वाध्याय | इयत्ता चौथी जननायक बिरसा मुंडा स्वाध्याय प्रश्न उत्तरे | चौथीचे प्रश्न उत्तरे दाखवा जननायक बिरसा मुंडा


प्र. २. गाळलेल्या जागी योग्य शब्द लिहा.


(अ) संपूर्ण देशाला..........गुलाम बनवून ठेवले होते.

उत्तर: संपूर्ण देशाला इंग्रजांनी गुलाम बनवून ठेवले होते.

 

(आ) १८९५ मध्ये बिरसा मुंडा यांना.........वर्षांची सक्तमजुरी शिक्षा ठोठावली.

उत्तर: १८९५ मध्ये बिरसा मुंडा यांना दोन वर्षांची सक्तमजुरी शिक्षा ठोठावली.

 

(इ) बिरसा मुंडा यांना..............तुरुंगात डांबण्यात आले.

उत्तर: बिरसा मुंडा यांना हजारीबाग तुरुंगात डांबण्यात आले.

 

प्र. ३. वाक्प्रचार व त्यांचा अर्थ यांच्या जोड्या जुळवा.


'' गट

'' गट (उत्तरे)

(१) रस असणे.

 (उ) रुची असणे, आवड असणे.

(२) असंतोष निर्माण होणे.

 (ऊ) चीड निर्माण होणे.

(३) कारावास ठोठावणे.

 (अ) तुरुंगवासाला पाठवणे.

(४) संकल्प करणे.

 (आ) एखादी गोष्ट करण्याचा निश्चय करणे.

(५) टिकाव लागणे.

(इ) टिकणे.

(६) वीरगती प्राप्त होणे.

(ई) देशासाठी लढताना मरण येणे.

 

प्र. ४. 'जननायक' हा किताब जसा बिरसा मुंडा यांना मिळाला, तसे खालील किताब कोणाला मिळाले ?


(अ) महात्मा

उत्तर: १) मोहनदास करमचंद गांधी २) जोतीबा फुले.


(आ) लोकमान्य

उत्तर: बाळ गंगाधर टिळक.


(इ) स्वातंत्र्यवीर

उत्तर: विनायक दामोदर सावरकर


(ई) नेताजी

उत्तर: सुभाषचंद्र बोस.


(उ) क्रांतिसिंह

उत्तर: नाना पाटील.


(ऊ) लोकनायक

उत्तर:  जयप्रकाश नारायण


Jannayak Birasa Munda 4th standard Marathi questions answers | Iyatta chouthi prashn uttare


प्र. ५. पाठात आलेल्या सनांची व घटनांची यादी करा.

उदा., १५ नोव्हेंबर १८७५ - बिरसा मुंडा यांचा जन्म.

उत्तर:

१) १८९४ – बिहारमध्ये भीषण दुष्काळ.

२) १८९५ – बिरसा मुंडा यांना दोन वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा

३) १८९७ – बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखाली आदिवासींनी केलेल्या लढाया.

४) १८९८ – नदीकाठी झालेल्या लढाईत सुमारे ४०० आदिवासी क्रांतीकारक शहीद.

५) १९०० – बिरसा मुंडा आदिवासींना मार्गदर्शन करीत असताना ब्रिटीश सैन्याचा हल्ला.

६) ९ जून १९००- बिरसा मुंडा यांना कारागृहात वीरगती प्राप्त झाली.

**********

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.