4th standard Marathi Jannayak Birasa Munda questions answers | वाटाड्या स्वाध्याय प्रश्न उत्तरे
प्र. १. एका वाक्यात उत्तरे लिहा.
(अ) बिरसा
मुंडा यांचा जन्म केव्हा व कोठे झाला ?
उत्तर: बिरसा
मुंडा यांचा जन्म १५ नोव्हेंबर १८७५ रोजी रांचीमधील उलिहातू या गावी झाला.
(आ) बिरसा
मुंडा यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण कोणत्या शाळेत झाले ?
उत्तर: बिरसा
मुंडा यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मिशनरी शाळेत झाले
(इ) बिरसा
मुंडा यांना कोणकोणत्या गोष्टींत विशेष रस होता ?
उत्तर: संगीत
व नृत्यकला या गोष्टींत बिरसा मुंडा यांना विशेष रस होता.
(ई) तुरुंगात
असताना बिरसा मुंडा यांनी कोणता संकल्प केला ?
उत्तर: तुरुंगात असताना बिरसा मुंडा यांनी इंग्रजी सत्ता मुळासकट उखडून टाकण्याचा संकल्प केला.
(उ) बिरसा
मुंडा यांना लोकांनी कोणता किताब बहाल केला ?
उत्तर: बिरसा
मुंडा यांना ‘जननायक’ हा किताब बहाल केला.
इयत्ता चौथी मराठी स्वाध्याय | इयत्ता चौथी जननायक बिरसा मुंडा स्वाध्याय प्रश्न उत्तरे | चौथीचे प्रश्न उत्तरे दाखवा जननायक बिरसा मुंडा
प्र. २. गाळलेल्या जागी योग्य शब्द लिहा.
(अ) संपूर्ण
देशाला..........गुलाम बनवून ठेवले होते.
उत्तर: संपूर्ण
देशाला इंग्रजांनी गुलाम बनवून ठेवले होते.
(आ) १८९५
मध्ये बिरसा मुंडा यांना.........वर्षांची सक्तमजुरी शिक्षा ठोठावली.
उत्तर: १८९५
मध्ये बिरसा मुंडा यांना दोन वर्षांची सक्तमजुरी शिक्षा ठोठावली.
(इ) बिरसा
मुंडा यांना..............तुरुंगात डांबण्यात आले.
उत्तर: बिरसा
मुंडा यांना हजारीबाग तुरुंगात डांबण्यात आले.
प्र. ३. वाक्प्रचार व त्यांचा अर्थ यांच्या जोड्या जुळवा.
'अ' गट |
'ब' गट (उत्तरे) |
(१) रस असणे. |
(उ) रुची असणे, आवड असणे. |
(२) असंतोष निर्माण होणे. |
(ऊ) चीड निर्माण होणे. |
(३) कारावास ठोठावणे. |
(अ)
तुरुंगवासाला पाठवणे. |
(४) संकल्प करणे. |
(आ) एखादी गोष्ट करण्याचा निश्चय करणे. |
(५) टिकाव लागणे. |
(इ) टिकणे. |
(६) वीरगती प्राप्त होणे. |
(ई) देशासाठी लढताना मरण येणे. |
प्र. ४. 'जननायक' हा किताब जसा बिरसा मुंडा यांना मिळाला,
तसे खालील किताब कोणाला मिळाले ?
(अ) महात्मा
उत्तर: १) मोहनदास
करमचंद गांधी २) जोतीबा फुले.
(आ) लोकमान्य
उत्तर: बाळ
गंगाधर टिळक.
(इ)
स्वातंत्र्यवीर
उत्तर: विनायक
दामोदर सावरकर
(ई) नेताजी
उत्तर: सुभाषचंद्र
बोस.
(उ)
क्रांतिसिंह
उत्तर: नाना
पाटील.
(ऊ) लोकनायक
उत्तर: जयप्रकाश नारायण
Jannayak Birasa Munda 4th standard Marathi questions answers | Iyatta chouthi prashn uttare
प्र. ५. पाठात आलेल्या सनांची व घटनांची यादी करा.
उदा., १५ नोव्हेंबर १८७५ - बिरसा मुंडा यांचा जन्म.
उत्तर:
१) १८९४ – बिहारमध्ये
भीषण दुष्काळ.
२) १८९५ – बिरसा
मुंडा यांना दोन वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा
३) १८९७ – बिरसा
मुंडा यांच्या नेतृत्वाखाली आदिवासींनी केलेल्या लढाया.
४) १८९८ – नदीकाठी
झालेल्या लढाईत सुमारे ४०० आदिवासी क्रांतीकारक शहीद.
५) १९०० – बिरसा
मुंडा आदिवासींना मार्गदर्शन करीत असताना ब्रिटीश सैन्याचा हल्ला.
६) ९ जून १९००- बिरसा मुंडा यांना कारागृहात वीरगती प्राप्त झाली.
**********