4th standard Marathi Mhaninchya Gamati questions answers| वाटाड्या स्वाध्याय प्रश्न उत्तरे
खालील चौकटींत लपलेल्या म्हणी शिक्षकांच्या मदतीने शोधा व त्यांचा अर्थ समजून घ्या.
१) लहान तोंडी
मोठा घास :
अर्थ : लहान
माणसाने मोठ्या माणसांना उपदेश करणे.
२) हातच्या काकणाला
आरसा कशाला:
अर्थ : जी
गोष्ट प्रत्यक्ष दिसते तीपाह्ण्यासाठी आरसा वापरण्याची गरज नाही.
३) अति तिथे
माती :
अर्थ : कोणत्याही
गोष्टीचा अतिरेक केल्याने ती नाश पावते.
४) दिव्याखाली
अंधार :
अर्थ : दुसऱ्याला मार्गदर्शन करताना त्याप्रमाणे
स्वतःचे आचरण असतेच असे नाही.
५) गर्वाचे घर
खाली :
गर्विष्ठ माणसाचे काठीतरी गर्वहरण होतेच.
६) एक न धड
भाराभर चिंध्या :
अर्थ : सर्व
कामे अर्धवट ठेवल्यामुळे एकही काम पूर्णत्वास जात नाही.
इयत्ता चौथी मराठी स्वाध्याय | इयत्ता चौथी म्हणींच्या गमती स्वाध्याय प्रश्न उत्तरे | चौथीचे प्रश्न उत्तरे दाखवा म्हणींच्या गमती
प्राण्यांची चित्रे पाहा. योग्य प्राण्याचे नाव गाळलेल्या जागी लिहून म्हणी पूर्ण करा.
§ आयत्या
बिळात नागोबा.
§ वासरात
लंगडी गाय शहाणी
§ गाढवाच्या
हाती कोलीत.
§ पाण्यात
राहून माशाशी वैर करू नये.
§ सरड्याची
धाव कुंपणापर्यंत .
§ बैला
गेला नि झोपा केला.
§ कुत्र्याचे
शेपूट नळीत घातले, तरी वाकडे ते वाकडेच.
§ गाढवाला गुळाची चव काय .