4th standard Marathi Nimantran Patrika question answers | निमंत्रण पत्रिका स्वाध्याय प्रश्न उत्तरे
प्र. १. निमंत्रण पत्रिका काळजीपूर्वक वाचा. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
(अ) निमंत्रण
कोणी दिले आहे ?
उत्तर: जिल्हा
परिषद प्राथमिक शाळा , पाळंदूर या शाळेत शिकणाऱ्या इयत्ता चौथीच्या सर्व
विद्यार्थ्यांनी निमंत्रण दिले आहे.
(आ)
कार्यक्रमाचे स्वरूप काय आहे ?
उत्तर: इयत्ता
पहिली ते चौथी च्या मुलांनी बनवलेल्या विविध वासातुंचे तासेस्च भाज्या व फळांचे
प्रदर्शन भरवले जाणार आहे. कलाकुसरीच्या वस्तू बनवण्याचे प्रात्यक्षिक दाखवले
जाणार आहे.
(इ)
कार्यक्रमासाठी पाहुणे कोठून येणार आहेत ?
उत्तर:लाखनी
वरून कार्यक्रमासाठी पाहुणे येणार आहेत.
(ई) या
निमंत्रणाला 'जाहीर निमंत्रण' असे का म्हटले
आहे ?
उत्तर:हे
प्रदर्शन सर्व गावकऱ्यांसाठी खुले आहे
म्हणून या निमंत्रणाला ‘जाहीर निमंत्रण’ असे म्हटले आहे.
(उ) असा
कार्यक्रम पाळंदूरच्या शाळेत गेल्या वर्षी झाला असेल का ? ते कशावरून समजले ?
उत्तर:निमंत्राणातील
पहिलेच वाक्य ‘दरवर्षीप्रमाणे आपल्या शाळेत,’ असे आहे या वाक्यावरून कळते के असा
कार्यक्रम या शाळेत गेल्यावर्षी झाला असेल.
(ऊ) निमंत्रण
वाचून प्रियंकाची आई म्हणाली, "बरं झालं. दिवसभर शाळेत थकली,
तरी मुलांना दुसऱ्या दिवशी विश्रांती मिळेल." त्या असे का
म्हणाल्या असतील ?
उत्तर:
प्रदर्शनाचा दिवस हा शनिवार चा आहे. दुसऱ्या दिवशी रविवार हा सुट्टीचा दिवस
असल्यामुळे मुले घरी विश्रांती करू शकतात. म्हणून “दिवसभर शाळेत थकली, तरी मुलांना दुसऱ्या दिवशी विश्रांती मिळेल." असे प्रियांकाची आई
म्हणाली.
इयत्ता चौथी मराठी स्वाध्याय | इयत्ता चौथी निमंत्रण पत्रिका स्वाध्याय प्रश्न उत्तरे | चौथीचे प्रश्न उत्तरे दाखवा निमंत्रण पत्रिका
(ए) समजा, असे प्रदर्शन तुमच्या शाळेत भरवायचे आहे. त्यासाठी काय काय तयारी करावी
लागेल ? आपापसात तसेच शिक्षकांशी चर्चा करून उत्तर लिहा.
उत्तर:
१) प्रदर्शनाची
तारीख व वेळ निश्चित करणे.
२) मुलांचे गट
करून त्यांचे गटप्रमुख नेमणे व प्रत्येक गटाला त्याची कामगिरी वाटून देणे.
३)
प्रदर्शनासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू तयार करण्यासाठी मुलांना कालावधी देणे.
४)
प्रदर्शनासाठी प्रमुख पाहुणे बोलावणे त्यासाठी निमंत्रण पत्रिका तयार करून त्या
वाटणे.
५)
प्रदर्शनाच्या एक दिवस आधी सर्व वस्तूंची मांडणी करणे.
६)
कार्यक्रमाच्या दिवशी कार्यक्रम व्यवस्थिती पार पडणे.
(ऐ) तुम्हांला
असे निमंत्रण गावकऱ्यांना द्यायचे असेल, तर तुम्ही 'खास आकर्षण' म्हणून काय काय लिहाल ?
उत्तर: गेल्या
वर्षभरात शाळेने केल्याल्या वैशिष्ट्यपूर्ण कामगिरीचा फलक तयार करणे.
प्र. २.
प्रदर्शनामधील खालील प्रसंगांमध्ये मुले काय बोलत आहेत, याची कल्पना करून उत्तरे लिहा. गरज वाटल्यास शिक्षकांशी चर्चा करा.
(अ) प्रदर्शन पाहून आलेली रत्ना तिच्या आजीला प्रदर्शनाविषयी सांगते आहे.
उत्तर: आजी
प्रदर्शन अतिशय सुंदर होते. प्रदर्शनात मुलांनी मातीच्या वस्तू, चित्रे, भेटकार्ड,
तसेच भाज्या व फळे यांचे प्रदर्शन भरवले होते.
मुलांनी बनवलेल्या कलाकुसारीच्या वस्तू मला
खूप आवडल्या. तू देखील प्रदर्शन पहायला यायला हवं होत.
(आ) प्रदर्शन
सुरू झाल्यावर तासाभराने खूप गर्दी झाली. काही लोक मधेच घुसू लागले. त्यांनी
रांगेत येऊन प्रदर्शन पाहावे, म्हणून राकेश सूचना देतोय.
उत्तर:
प्रदर्शनासाठी उपस्थित असलेल्या सर्व
माननीय गावकऱ्यांना विनंती आहे की, आपल रांगेत येऊन प्रदर्शन पाहून आम्हांला
सहकार्य करावे.
(इ) सविता प्रमुख पाहुण्यांना प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यासाठी विनंती करते आहे.
उत्तर:
मी शाळेच्या वतीने आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांना विनंती करते की, प्रथम दीपप्रज्वलन करून व प्रदर्शन कक्षाची फीत कापून त्यांनी आजच्या प्रदर्शनाचे उद्घाटन करावे.
Nimantran Patrika 4th standard Marathi questions answers | Iyatta chouthi prashn uttare
(ई) कलाकुसरीच्या वस्तूंच्या प्रात्यक्षिकाच्या वेळी सुवर्णाताईंनी मुलांना सहा सहाचे गट करायची सूचना दिली.
उत्तर:
चला तर मग आता विद्यार्थ्यांनी सहा-सहा चे
गट करा, म्हणजे आपल्याला प्रात्यक्षिक घेता येईल.
*********