4th standard Marathi Vatadya question answers | वाटाड्या स्वाध्याय प्रश्न उत्तरे
प्र.१. एका वाक्यात उत्तरे लिहा.
(अ) मिनू कशाला घाबरत होती?
उत्तर: मिनू
रस्त्यावरच्या रहदारीला घाबरत होती.
(आ) मिनूला दररोज शाळेत कोण पोहोचवत असे?
उत्तर: मिनूला
तिचे बाबा रोज शाळेत पोहचवत असे
(इ) रस्त्यावरील पांढऱ्या पट्ट्यांना काय म्हणतात?
उत्तर: रस्त्यावरील
पांढऱ्या पट्ट्यांना झेब्रा क्रॉसिंगम्हणतात.
(ई) " मिनूला रस्ता ओलांडायला मदत करणाऱ्या काकांना दिसत नव्हते . ' हे पाठातील कोणत्या वाक्यावरून कळते ?
उत्तर: समोरच्या
माणसाला काका म्हणाले ‘मला दिसत नाही, पलीकडे पोहोचवता का?’ या वाक्यावरून काकांना
दिसत नव्हते, हे कळते.
प्र.२. गाळलेल्या जागी योग्य शब्द लिहा .
(अ) आई किंवा
बाबांचं बोट धरलं , की भीती ......
उत्तर: आई
किंवा बाबांचं बोट धरलं , की भीती गायब
(आ) माझं नाव
आहे .............पण सगळे मला मिनू म्हणतात .
उत्तर: माझं
नाव आहे मृणालिनी पण सगळे मला मिनू म्हणतात .
(इ) मिनूच्या
आवाजातल्या .......... काकांना गलबलून आले
उत्तर: मिनूच्या
आवाजातल्या काकांना आर्जवीपणामुळे गलबलून आले .
(ई) आता रस्ता
क्रॉस करताना मला नाही ...........वाटणार .
उत्तर: आता
रस्ता क्रॉस करताना मला नाही भीती वाटणार.
प्र .३ , कोण , कोणाला म्हणाले ?
(अ) " मग आज नाही आला तो ?
"
उत्तर: असे
काका मिनू ला म्हणाले.
(आ) " रस्त्यातून कधीही धावत सुटायचं नाही . "
उत्तर: असे काका मिनू ला म्हणाले.
(इ) "
तिकडे नाही हो . इकडे , या बाजूला . "
उत्तर: असे
मिनू काकांना म्हणाली.
प्र . ४. पाठात आलेल्या इंग्रजी शब्दांना मराठीत काय म्हणतात ते लिहा .
(अ) प्लीज
उत्तर: कृपया
(आ) क्रॉस
उत्तर: ओलांडणे
(इ) टीव्ही
उत्तर: दूरदर्शन
संच
प्र.५. स्वतःला दिसत नसूनही काकांनी मिनूला रस्ता ओलांडावला कशी मदत केली ते पाच - सहा वाक्यांत लिहा .
उत्तर:
मिनूने काकांचे बोट पकडले व काकांनी
मिनुला झेब्रा क्रॉसिंग जवळ जाऊन डाव्या-उजव्या बाजूंना येणारी वाहने नीट पाहायला
झान्गितली. वाहने दूर आहेत, हे विचारून काकांनी मिनूला रस्ता ओलांडायला मदत केली.
प्र. ६. खालील प्रश्नांची उत्तरे सांगा ,
(अ) काकांनी मिनूला मदत केली , तशी तुम्ही कोणाकोणाला मदत केली ? कशी मदत केली ?
उत्तर: काकांनी
मिनूला मदत केली, तशी मी एका आजीला तिच्या हातात असणारे ओझे रस्त्याच्या पलीकडे
नेऊन देण्यासाठी मदत केली.
(आ) अंध व्यक्ती , मुले - मुली स्वतःची कामे स्वतः करतात , म्हणजे ते स्वावलंबी असतात . तसे तुम्ही स्वावलंबी आहात का ? असल्यास- तुम्ही स्वतःची कोणकोणती कामे स्वतः करता ? नसल्यास - स्वावलंबी होण्यासाठी तुम्ही काय काय कराल ?
उत्तर: मी
माझे स्वतःचे काम स्वतःच करतो, म्हणजे मी स्वावलंबी आहे, मी माझे स्वतःचे अंथरून
घालणे व आवरणे तसेच स्वतःचे जेवण केलेले ताट स्वतः धुणे ही कामे करतो.
प्र. ७.
तुम्ही कधी भीतिदायक सिनेमा पाहिला आहे का ? चौथीतल्या जिग्नेशने
असा एक सिनेमा पाहिला . तो सिनेमा पाहताना त्याला काय वाटले ते त्याने लिहिले आहे
. कंसातील योग्य शब्द वापरून त्याचे लेखन पूर्ण करा .
(कानाचा , घसा , श्वास , डोळे , कानठळ्या , छाती , जीव ,
पाय)
सिनेमाच्या
सुरुवातीला अगदी शांत रस्त्यावर एक मुलगा चाललेला होता . सगळं इतकं शांत होतं की
आपल्या श्वास घेण्याचाही आवाज यावा आणि एकदम एक कानठळ्या
बसवणारी किंकाळी ऐकू आली . कानाचा
पडदा फाटतो की काय असं वाटलं . सिनेमात एक भली मोठ्ठी घार उडत आली आणि त्या छोट्या
मुलाच्या अगदी जवळून गेली . माझी छाती जास्त जोरात धडधडू लागली . आई
- बाबांच्या मधे बसून मी सिनेमा पाहत होतो , पण तरीही घसा
कोरडा पडला .
मध्यंतराआधीचे गुहेतल्या पाठलागाचे दृश्य पाहून तर पाय लटलटा कापू लागले . भीतीने डोळे पांढरे पडू लागले , पण सिनेमा पाहायचाच होता . हे सगळं पडदयावर चालतंय , काल्पनिक आहे हे माहिती होतं . तरीही मध्यंतर होईपर्यंत मी जीव मुठीत
घेऊन बसलो होतो .
प्र . ८.
खालील प्रसंग तुमच्यावर कधी आले होते का ? त्या वेळी तुम्हाला
काय वाटले ? तुम्ही काय केले ?
(अ) रस्त्यावरून चालताना एखादे वाहन पाठीमागून भर्रकन आले , जवळून गेले.
उत्तर: त्यावेळी
अचानक भीती वाटली, पण मी पटकन रस्त्याच्या एका बाजूला झालो.
(आ) रस्ता ओलांडताना एखादया अनोळखी माणसाने तुमचा हात पकडला . तुम्हाला त्याच्याबरोबर चालायला सांगितले .
उत्तर: सुरुवातीला
थोडी भीती वाटली, पण नंतर त्यांच्या चांगुलपणाची खात्री पटल्यावर मी
त्यांच्याबरोबर रस्ता ओलांडला.