4th standard Marathi He Kon Ge Aaye questions answers | हें कोण गे आई स्वाध्याय प्रश्न उत्तरे
प्र. १. एका वाक्यात उत्तरे लिहा.
(अ)
पाखरांसारखी शीळ कोण वाजवत आहे ?
उत्तर: पाखरांसारखी शीळ वारा वाजवत आहे.
(आ) कवी
घाबरून का पळाला ?
उत्तर: कवीने नदीच्या
थरथरत्या पाण्याला हाका मारल्या, तेव्हा त्याला प्रतिध्वनी ऐकू आल्यामुळे तो तिथून
घाबरून पळाला.
(इ) कवितेत
घडलेल्या सर्व घटना कोणामुळे घडल्या ?
उत्तर: कवितेत
घडलेल्या सर्व घटना वाऱ्यामुळे घडल्या.
(ई) कबीने
वाकुल्या केव्हा ऐकल्या ?
उत्तर:
झाडाच्या सावल्या नदीच्या पाण्यात थरथरताना कवीने हाका मारल्या, तेव्हा त्याने वाकुल्या
ऐकल्या.
प्र. २. खालील
गोष्टींसाठी कवीने कोणते शब्द वापरले आहेत ?
(अ) वडाच्या
पारंब्या.
उत्तर:
वडाच्या दाढ्यांना
इयत्ता चौथी मराठी स्वाध्याय | इयत्ता चौथी हें कोण गे आई स्वाध्याय प्रश्न उत्तरे
चौथीचे प्रश्न उत्तरे दाखवा हें कोण गे आई
(आ) दाट
झाडांतून-पानांतून वारा वेगाने वाहतो तेव्हा येणारा आवाज.
उत्तर:
कोण गे
जोरानें। मोठ्यानें मोठ्यानें
शीळ गे वाजवी ? पांखरां लाजवी ?
(इ)वावटळ.
उत्तर:
वाळलीं
सोनेरी। पानें गे चौफेरीं
मंडळ धरोनी।
नाचती ऐकोनी !
प्र. ३.
तुम्ही कधी एखाद्या गोष्टीला घाबरला होतात का ? त्या वेळी तुम्हांला
काय अनुभव आला ?
उत्तर: मी वाऱ्यामुळे
येणाऱ्या झाडाच्या सळसळ आवाजाला घाबरलो होतो.
********