4th standard Marathi Zuluk Mi Vhave question answers | झुळूक मी व्हावेस्वाध्याय प्रश्न उत्तरे
प्र. १. एका वाक्यात उत्तरे लिहा.
(अ) कवीला काय व्हावेसे वाटते ?
उत्तर: कवीला एखादी मंद झुळूक
व्हावेसे वाटते.
(आ) कळीला कसे बोट लावावे, असे कवीला वाटते ?
उत्तर: कळीला हळुवारपणे बोट
लावावे असे कवीला वाटते.
(इ) दिशादिशांतून कवी काय उधळून
देतो ?
उत्तर: दिशादिशांतून कवी
फुलांचा सुगंध उधळून देतो.
(ई) कवीने शेताला कशाची उपमा
दिली आहे ?
उत्तर: कवीने शेताला पाचूची
उपमा दिली आहे.
(उ) तुम्हांला काय व्हावेसे
वाटते ?
उत्तर: मला खळखळणारा झरा
व्हावेसे वाटते.
प्र. २. खालील अर्थाला अनुरूप कवितेतील ओळी लिहा.
(अ) जिकडे मन आकर्षले जाईल, तिकडे अगदी मोकळेपणाने जावे.
उत्तर: घेईल मन ओढ तिकडे स्वैर
झुकावे.
(आ) जाता जाता सुगंध उधळत जावे.
उत्तर: परि जाता जाता सुगंध
संगे न्यावा,
तो दिशादिशांतुनि फिरता उधळूनि
द्यावा.
(इ) झऱ्याचे झुळझुळ गाणे
सर्वत्र पसरावे.
उत्तर: झुळझुळ झऱ्याची पसरावी
चौफेर
(ई) हिरव्यागार शेतात किंवा
निळ्याशार नदीच्या काठावर जावे.
उत्तर: शेतांत पाचूच्या, निळ्या
नदीवर शांत,
खुलवीत मखमली तंग जावे गात.
इयत्ता चौथी मराठी स्वाध्याय| इयत्ता चौथी झुळूक मी व्हावे स्वाध्याय प्रश्न उत्तरे | चौथीचे प्रश्न उत्तरे दाखवा झुळूक मी व्हावे
प्र. ३. कंसातील योग्य शब्द वापरून वाक्ये लिहा.
(पसार झाले, झुकली, कानोसा घेतला, भरारी
घेतली)
(अ) घरात कोणी आहे का याचा मी.......
उत्तर: घरात कोणी आहे का याचा
मी कानोसा घेतला.
(आ) मांजरीला पाहून उंदीर.......
उत्तर: मांजरीला पाहून उंदीर पसार
झाले.
(इ) नदीतल्या पाण्यावर झाडाची
फांदी.......
उत्तर: नदीतल्या पाण्यावर
झाडाची फांदी झुकली.
(ई) पक्ष्याने आकाशात........
उत्तर: पक्ष्याने आकाशात भरारी
घेतली.
प्र.४. रिकाम्या जागी तुमच्या मनाने शब्द भरून कविता पूर्ण करा.
वाटते मला........ ..........मी
व्हावे.
घेईल ओढ मन......... .......झुकावे.
कधी.........तर कधी..........काठी
.............कधी वा ............ .......... पाठी
उत्तर:
वाटते मला पक्षी एक
मी व्हावे.
घेईल ओढ मन तिकडे स्वैर
झुकावे.
कधी आकाशी तर कधी
नदी काठी
राईत कधी वा कधी झाडां पाठी
Zuluk Mi Vhave 4th standard Marathi questions answers| Iyatta chouthi prashn uttare
***********